Jump to content

अमृता फडणवीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमृता फडणवीस

जन्म ९ एप्रिल १९७९
राष्ट्रीयत्व भारतीय
पती देवेंद्र फडणवीस
धर्म हिंदू

अमृता देवेंद्र फडणवीस (née रानडे ; जन्म ९ एप्रिल १९७९) या एक भारतीय बँकर, अभिनेत्री, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तिचे लग्न महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी २००५ साली झाले. तिच्याकडे ॲक्सिस बँकेचे उपाध्यक्षपद आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय शांतता उपक्रम, नॅशनल प्रेयर ब्रेकफास्ट २०१७ मध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.