Jump to content

कीर्ति कुल्हारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कीर्ति कुल्हारी
कीर्ति कुल्हारी (२०१४)
जन्म

कीर्ति कुल्हारी
३० मे, १९८५ (1985-05-30) (वय: ३९)

[][]
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००९ - आजतागायत
भाषा हिंदी
पती
साहिल सेहगल
(ल. २०१६; घ. २०२१)

कीर्ति कुल्हारी (जन्म:३० मे, १९८५) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने २०१० मध्ये खिचडी: द मूव्ही आणि त्यानंतर जून, २०११ मध्ये शैतान या बॉलीवूड चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली.[] त्यानंतर तिने जल (२०१३), पिंक (२०१६), इंदू सरकार (२०१७), ब्लॅकमेल (२०१८), उरी: द सर्जिकल स्ट्राइक (२०१९), मिशन मंगल (२०१९) आणि शादीस्थान (२०२१) यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटात काम केले आणि समीक्षकांकडून प्रशंसा देखील प्राप्त केली. २०१८-१९ पासून कीर्ति कुल्हारी ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आघाडीच्या नावांपैकी एक म्हणून समोर आली आहे.

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

कुल्हारी चा जन्म महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे झाला असून तिचे कुटुंब मूळचे राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्यातील आहे.[] तिचे वडील भारतीय नौदलात कमांडर होते.[] कुल्हारीने २०१६ मध्ये अभिनेता साहिल सेहगलशी लग्न केले.[] परंतु १ एप्रिल २०२१ रोजी हे जोडपे विभक्त झाले.[]

अभिनय सूची

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका नोट्स
2010 खिचडी: द मुव्ही परमिंदर
2011 शैतान तान्या शर्मा
2013 सूपर से ओपर गुलाबो (गुल)
राईझ ऑफ द झोम्बी विनी
2014 जल केसर
2016 क्यूट कमीना अवंतिका
पिंक फलक अली
2017 इंदू सरकार इंदू सरकार
2018 ब्लॅकमेल रीना कौशल
2019 मिशन मंगल नेहा सिद्दीकी
उरी:द सर्जिकल स्ट्राइक फ्लाइट लेफ्टनंट सीरत कौर
2021 द गर्ल ऑन द ट्रेन दलबीर कौर बग्गा नेटफ्लिक्स चित्रपट
शादिस्तान साशा हॉटस्टार चित्रपट

वेब सिरीज

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका नोट्स
2019-सध्याचे फोर मोर शॉट्स प्लिज! अंजना मेनन ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ मालिका
2019 बार्ड ऑफ ब्लड जन्नत नेटफ्लिक्स मालिका
2020 क्रिमिनल जस्टीस: बिहाइंड द डोर अनुराधा चंद्रा हॉटस्टार मालिका
2022 ह्युमन डॉ सायरा सभरवाल हॉटस्टार मालिका

पुरस्कार आणि नामांकन

[संपादन]
चित्रपट पुरस्कार श्रेणी निकाल Ref.
शैतान स्क्रीन अवॉर्ड्स २०१२ बेस्ट एन्सेम्बल कास्ट नामांकन
पिंक ६२वे फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन []
जागरण चित्रपट महोत्सव विशेष ज्युरी पुरस्कार विजयी
स्क्रीन अवॉर्ड्स २०१७ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) नामांकन
इंदू सरकार स्क्रीन अवॉर्ड्स २०१८ नामांकन
माया ६४ वा फिल्मफेर पुरस्कार लघुपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विजयी []
फोर मोर शॉट्स प्लिज! इंडियन दूरचित्रवाणी अकादमी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - वेब सिरीज नामांकन
फोर मोर शॉट्स प्लिज! सीझन २ २०२० फिल्मफेर ओटीटी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता मालिका: नाटक (स्त्री) नामांकन [१०]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Kirti Kulhari's on a self love trip this birthday". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 29 May 2020. 19 March 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Kirti Kulhari to don khaki in her next". The New Indian Express. 3 January 2022. 19 March 2022 रोजी पाहिले. The 36-year-old actor wrote
  3. ^ Awaasthi, Kavita (2 August 2012). "Eyes are the most important". Hindustan Times. 5 August 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ "Coming Soon: Aapno Zombie". DNA. 12 July 2012. 29 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 December 2012 रोजी पाहिले.
  5. ^ Bora, Sugandha (April 1, 2021). "Kirti Kulhari: 10 Things To Know About The Versatile Actor". SheThePeople. 9 May 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Kirti Kulhari Says Marriage To Saahil Sehgal Has Affected Her Career in 'the Best Possible Way'". News18 (इंग्रजी भाषेत). 26 August 2020. 31 December 2020 रोजी पाहिले.
  7. ^ Raghuvanshi, Aakanksha (1 April 2021). "Actress Kirti Kulhari Announces Separation From Husband Saahil Sehgal: "Not On Paper But In Life"". NDTV. 1 April 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "62nd Jio Filmfare Awards 2017 Nominations". Filmfare. 10 January 2017.
  9. ^ "Filmfare Awards 2019: List Of Winners". NDTV. 23 March 2019.
  10. ^ "Nominees for the Flyx Filmfare OTT Awards". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 17 December 2020 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]