पंढरपूर रेल्वे स्थानक
पंढरपूर पंढरपूर रेल्वे स्थानक मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
मुख्य प्रवेशद्वार, पंढरपूर रेल्वे स्थानक (२०२०) | |
स्थानक तपशील | |
पत्ता | स्टेशन रोड, पंढरपूर, सोलापूर |
गुणक | 17°43′42″N 75°19′04″E / 17.72833°N 75.31778°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ५०६ मीटर |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
उद्घाटन | अज्ञात |
विद्युतीकरण | होय |
संकेत | PVR |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
स्थान | |
|
पंढरपूर रेल्वे स्थानक हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका आणि इतर जवळच्या गावांना सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मध्य झोनमधील सोलापूर रेल्वे विभागांतर्गत येते.[१]
विठ्ठलाचे तीर्थक्षेत्र असल्याने हे स्थानक नेहमी व्यस्त असते. पंढरपूरच्या वाऱ्यांसाठीही अनेक विशेष गाड्या सुरू कराव्या लागतात.[२] मुंबई आणि सातारा यांना जोडणारी सातारा - दादर एक्स्प्रेस ही गाडी पर्यटकांची संख्या लक्षात घेऊनच सुरू करण्यात आली होती. इतर अनेक महत्त्वाच्या गाड्यांनी हे स्थानक पंढरपूरला महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांशी जोडते.[३][४]
इमारत
[संपादन]मंदिराच्या शैलीत स्थानकाचे प्रवेशद्वार तयार केले आहे. तसेच स्थानकाच्या समोर एक छोटी बाग आहे. या बागेत ब्रिटिशकालीन रेल्वेचे इंजिनचा नमुना पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवले आहे. हे इंजिन पर्यटकांना नेहमी आकर्षित करते.
वेळापत्रक
[संपादन]- १६५३६ गोल घुमट एक्सप्रेस
संदर्भ
[संपादन]- ^ "Pandharpur Railway Station News - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2022-01-31 रोजी पाहिले.
- ^ ब्युरो, सरकारनामा. "कार्तिकी यात्रा : लालपरीनं पाठ फिरविल्याने वारकऱ्यांसाठी रेल्वे आली धावून!". Sarkarnama. 2022-01-31 रोजी पाहिले.
- ^ "पंढरपूरसाठी १४ जुलैला धावणार विशेष रेल्वे". Maharashtra Times. 2022-01-31 रोजी पाहिले.
- ^ "Good News : बहुचर्चित फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु; रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद". eSakal - Marathi Newspaper. 2022-01-31 रोजी पाहिले.