Jump to content

श्रीवल्ली (तेलुगू गीत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
"श्रीवल्ली"
गीत by सिड श्रीराम
from the album पुष्पा: द राइज
भाषा तेलुगू
इंग्रजी नाव Srivalli
Released २०२१
Studio आदित्य म्युझिक
रेकॉर्डिंग कंपनी आदित्य म्युझिक
Composer(s) श्री देवीप्रसाद

श्रीवल्ली हे पुष्पा: द राइज (२०२१) या तेलुगू चित्रपटातील एक गीत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे आणि यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[]

हे गाणे देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केले तर चंद्रबोस यांनी ते लिहिले आहे. चित्रपटाचे मूळ गाणे तेलुगूमध्ये आहे, जे सिड श्रीराम यांनी गायले. मल्याळम, तमिळ, हिंदी आणि कन्नडमध्ये या भाषांमध्येही हे गाणे तयार केले गेले. हे गाणे सिड श्रीराम यांनी चार भाषांमध्ये तर जावेद अली यांनी हिंदीत गायले. या सर्वच भाषांमध्ये हे गाणे प्रचंड गाजले.[][]

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे. हे गाणे म्हणजे पुष्पाराज या नायकाच्या श्रीवल्ली या नायिकेबद्दल असणाऱ्या भावनांची अभिव्यक्ती आहे.

हे गाणे प्रचंड गाजले असून या गाण्यासाठी या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. हा चित्रपट मूळ तेलुगुपेक्षा हिंदीत जास्त लोकप्रिय झाला. या गाण्याने देशभरातील लोकांना प्रभावित केले. या गाण्याने अनेक विक्रम मोडले. गाणे प्रसिद्ध झाल्यावर लगेच ट्विटरवर लगेच "श्रीवल्ली"चा ट्रेंड सुरू झाला.[]

विविध समाजमाध्यमांवर या गाण्याचे अनेक व्हिडीओ तयार केले गेले. भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेट खेळाडू ईशान किशन आणि सूर्य कुमार यादव श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसले.[]

निर्मिती

[संपादन]

हे गाणे सिड श्रीराम यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळममध्ये, तर जावेद अली यांनी हिंदीत गायले. उस्ताद देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केले.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्रीवल्ली गाणे १३ ऑक्टोबर रोजी रिलीज केले. हे गाणे ट्विटरवर शेअर करताना, मिथ्री मूव्ही मेकर्सने लिहिले, “पुष्पा राज यांच्या प्रेमाबद्दलच्या भावनांची मधुर अभिव्यक्ती. #श्रीवल्ली गाणे आता आले आहे."[]

चित्रीकरण

[संपादन]

गाण्यात अल्लू अर्जुन एका विशिष्ट शैलीत एक खांदा वर उचलून पाय ओढताना नाचताना दिसत आहे.[]

प्रतिसाद

[संपादन]

चित्रपटामधील रश्मिका मंदान्नाच्या 'श्रीवल्ली' या व्यक्तिरेखेला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या गाण्याने अनेक विक्रम मोडले. गाणे प्रसिद्ध झाल्यावर लगेच ट्विटरवर लगेच "श्रीवल्ली"चा ट्रेंड सुरू झाला. लोकांनी त्याचे भरपूर कौतुक केले.[][]

विविध समाजमाध्यमांवर या गाण्याचे अनेक व्हिडीओ तयार केले गेले. भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेट खेळाडू ईशान किशन आणि सूर्य कुमार यादव गाण्यावर नाचताना दिसले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "Allu Arjun's Pushpa second song Srivalli is a melodious confession of love. Watch". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-01-19 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "Pushpa Fever: Cricketers doing Srivalli dance steps". Tollywood (इंग्रजी भाषेत). 2022-01-16. 2022-01-19 रोजी पाहिले.
  3. ^ a b "VIRAL VIDEO : भारीच ना! 'पुष्पा'चं सुपरहिट श्रीवल्ली गाण्याचं मराठी वर्जन एकदा ऐकाच; साउथ इंडियन गाण्याला मराठी तडका". Loksatta. 2022-01-19 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":2" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  4. ^ "Pushpa: Allu Arjun's Srivalli Hook Step Comes in Handy for Man Boarding Mumbai Local, See Hilarious Video". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-01-19 रोजी पाहिले.
  5. ^ Jain, Vaishali (2021-10-13). "Pushpa The Rise: New song on Rashmika Mandanna's 'Srivalli' takes the Internet by storm". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-19 रोजी पाहिले.