Jump to content

नाळेगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?नाळेगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर दिंडोरी
जिल्हा नाशिक जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

नाळेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे.

नळेगाव गावापासून नाशिक सुमारे २५ कि.मी. आणि दिंडोरी सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. या गावाचे क्षेत्रफळ सुमारे १६४९ हेक्टर असून २०११ च्या जनगणनेनुसार नळेगाव गावाची एकूण लोकसंख्या २५६१ आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.

लोकजीवन[संपादन]

नाळेगाव मधील लोकांचे लोकजीवन त्यांच्या आदिवासी संस्कृती मुळे निराळेच आहे. जल, जंगल, जमीन यांना देवता माननारा हा समाज पुर्णपणे निसर्गपुजक आहे, येथील लोक पारंपारिक पद्धतीने चालत आलेले सन उत्त्सव ते पाळत आले आहेत. त्यामधे डोंगर माऊली उत्त्सव, डाक भक्ती, देवकार्या (देवकार्य), हे मुख्य प्रकारचे उत्त्सव येथील समाज करत असतो. त्यांचे या उत्त्सवासाठी लागणारे वाद्ये ही ढोल, पावरी, डाका, तुणतुणं हे होय. आपल्या कडून निसर्गाची हानी होणार नाही त्याप्रमाणे त्यांची जीवन व्यवस्था आहे. वेषभुषा सुद्धा साधी आहे. धोतर, लुंगी, कोपरी, सदरा,लुगडं,चोळी,फडकी हे येथील समाजाची प्रमुख वेषभुषा आहे. अली कडे शर्ट पँट, जीन्स, टि शर्ट, पंजाबी ड्रेस, साडी अशीही वेशभुषा बघावयास मिळते.

तसेच गावात काही ओबीसी समाज, काही एसी समाज सुद्धा आहे. गाव आदिवासी बहुल असूनही सर्व समाज गुण्यागोविंदानं रहात आहे.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नाळेगाव पूर्व भागात श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर हे आहे. प्रसिद्ध प्रेक्षणीय व धार्मिक वारकरी पंथाचे स्थळ आहे.

नागरी सुविधा[संपादन]

▪️ जिल्हा परिषद शाळा

▪️ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व वसतिगृह

▪️ प्राथमिक उपकेंद्र

▪️पेसा ग्रामपंचायत कार्यालय

▪️ तलाठी कार्यालय

अत्यंत सुमार दर्जाचे रस्ते असलेला नाळेगाव दुर्दैवाने दिंडोरी तालुक्यातील पहिल्या क्रमांकाचा खराब रस्त्यांचा गाव आहे. स्थानिक सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असतानाही गावातील रस्त्यांच्या वाट्याला मात्र अवहेलना आली आहे.

      गावाच्या चहुबाजूंनी पाणी असुन फेब्रुवारी महिन्यात पाण्यासाठी, लहान मोठे पिण्याच्या पाण्यासाठी २/३ किमी पायपिट करत असतात. ग्रामपंचायत कारभार याबाबत नियोजन शुन्य.

जवळपासची गावे[संपादन]

उमराळे बुद्रुक, धाऊर, सोनगाव, तिल्लोळी, रवळगाव, राशेगाव, चाचडगाव

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate