चर्चा:स्मृती मंधाना
Appearance
खालील मजकूर प्रचालकांना निवेदन पानावरुन येथे नोंदविला आहे.
"स्म्रिती मन्धाना" या पानाचे शीर्षक बदलण्याबाबत
[संपादन]"स्म्रिती मन्धाना" या पानाचे शीर्षक "स्मृती मानधना" असे असले पाहिजे, असे वाटते. मराठीत हा बरोबर उच्चार आहे. तसे शीर्षक बदलता येईल का? ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १९:५२, १७ सप्टेंबर २०१७ (IST)
- नमस्कार,
- स्मृती मानधना हा उच्चार (विशेषतः मानधना या भागाचा) बरोबर असल्याचा संदर्भ कोठे मिळेल? आंतरजालावार अनेक ठिकाणी या नावाचे शुद्धलेखन Mandhana आहे. याचा उच्चार मंधाना किंवा मानधना होउ शकतो. समालोचनात मंधाना हा उच्चार आढळतो. तरी मानधना बरोबर असल्याचा संदर्भ देउन शीर्षक बदलता येईल.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०४:४२, १८ सप्टेंबर २०१७ (IST)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! वृत्तपत्रातील उल्लेख संदर्भ म्हणून ग्राह्य धरले जात असतील तर हे काही संदर्भासाठी दुवे :
http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-smruti-mandhana-talking-68329 http://www.lokmat.com/oxygen/blue-jersey-girls/
०८:३१, १८ सप्टेंबर २०१७ (IST)
- वृत्तपत्रातील factual संदर्भ नक्कीच ग्राह्य धरता येतील परंतु नावांच्या , विशेषतः अमराठी नावांच्या उच्चाराबद्दल मराठी वृत्तपत्रांतून असंख्य चुका आढळतात. तरी वरील दोन संदर्भांशिवाय एखादा मिळाल्यास उत्तम.
- सध्यापुरते वरील मजकूर लेखाच्या चर्चापानावरही नोंदवीत आहे म्हणजे इतर वाचकांच्याही ध्यानात येउन त्यांचाकडून संदर्भ मिळण्याची शक्यता वाढेल.
- अभय नातू (चर्चा) ०९:१८, १८ सप्टेंबर २०१७ (IST)
- @ज्ञानदा गद्रे-फडके: शीर्षक बदल चर्चा शक्यतोवर लेख चर्चा पानावर कराव्यात. विकिपीडियवर चर्चेत सहभाग बऱ्याचदा काळाच्या ओघात सुरु राहते. संबंधीत पानावर असलेली चर्चा शोधणे सोपे जाते.
- बाकी शीर्षक लेखन चर्चांबाबत वर्गीकरणात टाकणारा एक साचा असण्याची गरज आहे असे वाटते. म्हणजे सगळ्या शीर्षक लेखन चर्चा एकाच वर्गीकरणात पाहता येऊ शकतील.
- व्यक्ती खेळाडू स्वत:च्या नावाचे लेखन स्वत: कसे करतो त्यास प्राधान्य द्यावे
- माझ्या व्यक्तीगत मता नुसार देवनागरी लिपी बरीच उच्चारणे दाखवत असली तरी भाषाशास्त्रीय दृष्ट्या परीपूर्ण सुद्धा नाही. 'मंधाना' असे हिंदी विकिपीडिया स्टाईल मध्ये लिहिले तर अनुस्वारातील न् चा उच्चार फारच आखूड होतो. 'मनधाना' लिहिलेतर मन-धाना असे स्वतंत्र वाचल्यासारखे उच्चारण होईल. त्यापेक्षा व्यक्तीश: मला सध्याचे 'मन्धाना' हे लेखन अधिक पटते आहे. किंवा 'मन्-धाना' असेही चालू शकेल. अर्थात इतरांना काय वाटते तेही पहावे लागेल.
- खेळाडू स्वत: देवनागरी लेखन 'स्म्रिती' करत असेल तर ठिक अन्यथा ते लेखन 'स्मृती' असेच करावे असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:४९, १८ सप्टेंबर २०१७ (IST)