येवती (मोहोळ)
?येवती महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मोहोळ |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
येवती हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. गावापासून जवळ पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून , श्री संत सावता माळी यांचे अरण हे ही गाव जवळ आहे. [१]
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
[संपादन]येवती हे ऐतिहासिक गाव असून या गावात 1818ची इंग्रज आणि पेशवे यांची लढाई झाली. पेशवे यांचं सैन्य या गावच्या हद्दीत आणि इंग्रजांचे सैन्य आष्टी गावच्या हद्दीत ही लढाई इंग्रजांनी जिंकली, यात सेनापती बापू गोखले हे मारले गेले. या ठिकाणी मोठा तलाव ब्रिटिश सरकारने बांधला. याच गावात कोल्हापूर संस्थानचे छत्रपती चौथे शहाजी उर्फ बुवासाहेब महाराज यांची समाधी आहे
गावात ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असून सर्व नागरी सुविधा उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करते. गावात प्रशस्त रस्ते असून पाणीपुरवठा सुविधा चांगली असून पर्यटन दृष्टीने उत्तम नैसर्गिक सौंदर्य आहे
गाव पंढरपूर आणि मोहोळ या ठिकाणापासून जवळ असून दोन्ही ठिकाणाहुन रस्ते मार्गाने जोडले असून सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे
संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- ^ डॉ. नवनाथ गोडसे