तामसवाडा
?तामसवाडा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सेलू |
जिल्हा | वर्धा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
तामसवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. तामसवाडा हे एक छोटेसे गाव वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तालुका आणि आकोली पोस्ट मध्ये आहे . तामसवाडा गावच्या उत्तर बाजूला आकोली हेटी हे गाव आह आणि दक्षिण बाजूला रिधोरा हे गाव आहे पूर्वेला हिरबेगर जंगल आहे आणि दक्षिणेला तामसवाडा हेटी (तामसवाडा गावाचे एक उपगाव आहे याला पण तामसवाडा म्हणूनच ओळखतात) हे गाव आहे. ईशान्य दिशेला तामसवाडा नदी ( छोटी नदी) आहे .
हवामान
[संपादन]तामसवाडा गावातील हवामान उष्ण आहे
लोकजीवन
[संपादन]तामसवाडा हे गाव एक आदिवासी आहे.तामसवाडा गावातील लोकजीवन अतिशय सामान्य आहे. तामसवाडा गावातील ९०℅ लोकं ही आदिवासी जमाती ची आहेत.
त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि ज्या लोकांकडे शेती नाही ते लोक रोजमजुरी आणि शेतमजुरी या कामावर जाऊन आपला उदर निर्वाह करतात.
तामसवाडा गावामध्ये संपूर्ण लोक हे गरिबी रेषेखालील आहे. तामसवाडा गावातील लोक हे जंगलांना देव मानतात जंगलांची पूजा करतात.
प्रेक्षणीय स्थळ
[संपादन]तामसवाडा हे गावचं एक प्रेक्षणीय स्थळ आहे या गावातील लोकजीवन आदिवासी लोककला गोंडी बोली आदिवासी हस्तकला तसेच गावातील जुने मातीचे घरे तसेच गावातील जीर्ण झालेला पाटलाचा वाडा या साठी गाव ओळखल्या जाते तसेच गावातील पुरातन मंदिर गावात प्रवेश करतांनाच चमत्कारीत प्राचीन काळातिल हनुमान मंदिर तसेच गावातील महालक्ष्मी मातेचे मंदिर तसेच गावाच्या बाहेर असलेले जंगलातील प्रसिद्ध रानातील मारूतीचे मंदिर आजू बाजूच्या परिसरामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. तसेच गावाच्या बाजूला असलेली तामसवाडा नदी अतिशय सुंदर आहे आणि गावाच्या बाजूला असलेला निसर्गरम्य वन हा अतिशय घनदाट आहे.आणि त्यामध्ये विविध वन्यजीवांचे वास्तव्य आहेत तसेच तामसवाडा या गावाच्या बाजूला पंचधारा धरण आहेत ते बघण्यासाठी दूर दूर वरून लोक इथे बघण्यासाठी येतात तामसवाडा गाव आणि त्या बाजूला असलेला हिरवा घनदाट जंगल आणि त्या मध्ये मधोमध वसलेले सुंदर छोटेसे आदिवासी गाव बघण्यासारखे आहे.अक्षय कुमरे