पेढांबे (म्हसळा)
?पेढांबे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | म्हसळा |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
पेढांबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
[संपादन]पेडांबे हे एक रायगड जिल्यातील म्हसळा तालुक्यातील वरवठणे ग्रामपंचायत मधील छोटस गाव आहे,ह्या गावाकडे लोक आनंदाने एक मेकांशी रहातात.सुखदुःखात एक मेकांबरोबर असतात.पेडांबे ह्या गावामध्ये संक्रात,शिवजयंती,होळी ,यात्रा,गणपती,ह्या सारखे अनेक मराठमोळे सण साजरे केले जातात,गणपती हा सण खूप जलोश मध्ये साजरा केला जातो,ह्या सणाला मुंबई मधून ४ (चार) बस करून चाकरमानी गावी येतात,खूप जलोशात हा गौरी-गणपतीचा सण साजरा केला जातो.रात्रीच्या वेळी लोकनृत्य केले जातात.तसेच या गावाचे श्रद्धास्थान असलेलं वाघेश्वर मंदिर आहे,ह्या मंदिरा मध्ये एप्रिल ह्या महिन्यात मोठी यात्रा भरवली जाते,त्या दिवशी मनाची काठी सजवली जाते,मंदिराच्या भोवती काठीचा सभेना फिरवला जातो,विविध ठिकाणावरून लोक ह्या यात्रे साठी वघेश्वराच दर्शन घेण्यासाठी येतात. आशेच अनेक सण साजरे केले जातात.पेडांबे या गावांमध्ये २(दोन) मोठी धरण आहेत,तसेच एक नावाजलेला ठिकाण म्हणजे धोदानी आहे,हिते गावातील मुल, मुली,तशेच महिला पुरुष पावसाळ्याच्या वर्षी खूप मज्जा करतात,पोहायचा आनंद घेतात ,तसेच वणबोजन शाळेतील मुलांची सहल वगरे आनंद लुटण्यासाठी येत असतात,आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा येत असतात.पेडांबे ह्या गावामध्ये भात शेती हा मुख्य व्यवसाय केला जातो,पेडांबे ह्या गावामध्ये हनुमानाचे मोठे मंदिर आहे.पेडांबे हे गाव ग्रुप ग्राम पंचायत वरवठणे ह्या हदीमध्ये येतो,पेडांबे ह्या गावचे मुख्य बाजारपेठ म्हसळा शहर आहे.