सीर दर्या
Appearance
सीर दर्या (कझाक: Сырдария ; अरबी: سيحون; फारसी: سيردريا; रशियन: Сырдарья; ताजिक: Сирдарё; उझबेक: Sirdaryo) ही मध्य आशियातील एक महत्त्वाची नदी आहे. किर्गिझस्तान व उझबेकिस्तानमध्ये उगम पावणारी ही २,२१२ किमी लांबीची नदी ताजिकिस्तान व कझाकस्तानमधून वाहते व अरल समुद्राला जाऊन मिळते.
सोव्हिएत संघाच्या कालखंडात सीर दर्या नदीवर मोठ्या प्रमाणात कालवे खणण्यात आले व जवळजवळ सर्व पाणी सिंचनासाठी वळवले गेले. ह्याचा थेट परिणाम नदीच्या नैसर्गिक संतुलनावर झाला आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत