साठेवाडी
?साठेवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कोरेगाव |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
साठेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]साठेवाडी हे गाव महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातले एक गाव आहे. हे गाव कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात वसले आहे. गावाचे ग्रामदैवत गुजाई देवी आहे. दुर दुर ठिकाणाहून भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात.
लोकसंख्या
[संपादन]गावाची लोकसंख्या सुमारे ५०० ते ६०० आहे (इ.स. २००९).
प्रशासन
[संपादन]गावाचा कारभार साठेवाडी ग्रामपंचायत पाहते. ग्रामपंचायतीची स्थापना १९८९ साली झाली. गावचे सुपुत्र मानसिंगराव जाधव हे गावाचे पहिले सरपंच होते.
उल्लेखनीय कार्य
[संपादन]नुकतेच गावाने ग्रामस्वच्छतेसाठी दिल्ली येथे पारितोषिक पटकवले. सप्टेंबर २००७ वर्षासाठी ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली. संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये गावाने ग्रामस्वच्छता केली. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील ४० गावांची निवड करण्यात आली होती, त्यात साठेवाडी गावाचा समावेश होता. संतोष जाधव हे इ.स. २०११ च्या सुमारास सरपंच आहेत.
हवामान
[संपादन]येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.