Jump to content

बौद्धधम्म जिज्ञासा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बौद्धधम्म जिज्ञासा हे बौद्ध धर्माशी संबंधित इ.स. १९९७ मध्ये लेखिका कीर्ती पाटील यांनी लिहिलेले एक मराठी पुस्तक आहे. "बौद्ध धम्म जिज्ञासा" हे पुस्तक एक प्रश्नोत्तरी (प्रश्नासाहित उत्तर) आहे. ज्यामुळे बौद्ध धम्माचे ज्ञान व संकल्पना सहज कळतात. लेखिकेच्या सांगण्यानुसार त्याच्या मुलाला एकदा कर्नल एच.एस. ऑलकॉट ह्या लेखकाचे 'Buddhist Catechism' म्हणजे 'बौद्ध धर्मीय प्रश्नोत्तरी' हे सुमारे ११५ वर्षांपूर्वी इ.स. १८८१ मध्ये प्रकाशित झालेले इंग्रजी पुस्तक भेट दिले गेले होते. त्यात प्रश्नोत्तर रूपाने बुद्ध, धम्म आणि संघ यांवरील माहिती दिलेली होती. ते पुस्तक श्रीलंका सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय तर्फे प्रकाशित झालेले असून तेथील शालेय पाठ्यक्रमासाठी मंजूर केलेले होते. त्यापूर्वी 'मिलिंद प्रश्न' हा बौद्ध साहित्यातील अत्यंत जुना व प्रमाणित असा प्रश्नोत्तर रुपी एकच ग्रंथ उपलब्ध होता.[] बुद्धांचे जीवन चरित्र, धम्माची शिकवण, बौद्ध संघ, बौद्ध धम्माचा अभ्युदय व प्रसार तसेच बौद्ध धम्म आणि विज्ञान अशी त्यांची नावे आहेत. प्रत्येक खंडातील प्रकरणातून विविध विषयांवर प्रश्नोत्तरे ग्रंथित केली आहेत. बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व आंबेडकरवादी विचारवंत भाऊ लोखंडे यांनी या ग्रंथाला प्रस्तावना दिली आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ पाटील, डॉ. कीर्ती. (१९९७). बौद्धधम्म जिज्ञासा. नागपूर: विकास पाटील. pp. ५.
  2. ^ पाटील, डॉ. कीर्ती. (१९९७). बौद्धधम्म जिज्ञासा. नागपूर: विकास पाटील. pp. ७-९.