आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९
इंग्लंड
आयर्लंड
तारीख २४ – २७ जुलै २०१९
संघनायक ज्यो रूट विल्यम पोर्टरफिल्ड
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा जॅक लीच (९३) ॲंड्रु बल्बिर्नी (६०)
सर्वाधिक बळी स्टुअर्ट ब्रॉड (७) मार्क अडायर (६)
टिम मर्टाघ (६)

आयर्लंड क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान १ कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. हा इंग्लंडच्या भूमीवरचा पहिलाच कसोटी सामना असणार आहे.

सराव सामना[संपादन]

दोन-दिवसीय सामना : मिडलसेक्स द्वितीय एकादश वि आयर्लंड[संपादन]

१८-१९ जुलै २०१९
धावफलक
वि
२९०/९घो (७६ षटके)
ज्यो क्रेकनील १०५* (१२८)
क्रेग यंग ४/२९ (१६ षटके)
सामना अनिर्णित
मर्चंट टेलर शालेय मैदान, हर्टफर्डशायर
पंच: निक हॉल (इं) आणि व्ही. श्रीनिवासन (भा)
  • नाणेफेक: नाणेफेक नाही, मिडलसेक्स द्वितीय एकादशने फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे दुसऱ्यादिवशी खेळ होऊ शकला नाही.


कसोटी मालिका[संपादन]

एकमेव कसोटी सामना[संपादन]

२४-२७ जुलै २०१९
धावफलक
वि
८५ (२३.४ षटके)
जो डेनली २३ (२८)
टिम मर्टाघ ५/१३ (९ षटके)
२०७ (५८.२ षटके)
ॲंड्रु बल्बिर्नी ५५ (६९)
सॅम कुरन ३/२८ (१० षटके)
३०३ (७७.५ षटके)
जॅक लीच ९२ (१६२)
स्टुअर्ट थॉम्पसन ३/४४ (१२.५ षटके)
३८ (१५.४ षटके)
जेम्स मॅककॉलम ११ (१७)
ख्रिस वोक्स ६/१७ (७.४ षटके)
इंग्लंड १४३ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: अलीम दर (पाक) आणि रुचिरा पल्लियागुरूगे
सामनावीर: जॅक लीच (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • जेसन रॉय, ओली स्टोन (इं) आणि मार्क अडायर (आ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
  • बॉइड रॅंकिन (आ) इफ्तिखार अली खान पटौडीनंतर इंग्लंडकडून आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
  • टिम मर्टाघचे (आ) कसोटीत प्रथमच पाच बळी.
  • धावांच्या बाबतीत घरच्या मैदानावरची इंग्लंडची पहिल्या डावातील सर्वात निचांकी धावसंख्या.
  • जॉनी बेअरस्टो (इं) आणि गॅरी विल्सन (आ) हे दोघे या कसोटीत एकही धाव करु शकले नाहीत. असे करणारे हे दोघे पहिलेच यष्टीरक्षक आहेत.
  • आयर्लंडची ३८ ही धावसंख्या लॉर्ड्सवरील निचांकी, कसोटीतील सातवी निचांकी आणि १९३२ नंतरची सर्वात निचांकी धावसंख्या आहे.