Jump to content

अनंत ओगले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनंत शंकर ओगले हे एक मराठी लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकांचे विषय हे बव्हंशी ऐतिहासिक आहेत. त्यांनी अनेक चरित्रे लिहिली आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या कादंबरीकारांमध्ये त्यांची गणना होते. त्यांनी काही नाटकांचे लेखनही केले आहे. महाराष्ट्रातील क्रांतिकारक, समाज सुधारक, नेते यांच्यावर ओगले यांचा अभ्यास आहे. मराठेशाही हा त्यांच्या लेखनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यांचा महाराष्ट्राभिमान त्यांच्या प्रत्येक लिखाणात दिसून येतो. त्यांनी लिहिलेली चरित्रे व कादंबऱ्या यांचे विषय मल्हारराव होळकर, बाजीराव पेशवा, सातारचे छत्रपती शाहू महाराज, हिटलर, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, जोतीराव फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, नाना फडणवीस असे चरित्रात्मक आहेत. चिपळूणकरांवरील त्यांच्या कादंबरीस दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनीदेखील गौरविले आहे. गांधीहत्या, होळकरशाही हे विषय काहीसे वादातीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राजकीय जीवनावर आधारित 'होय मी सावरकर बोलतोय' हे नाटक तर कौटुंबिक जीवन मांडणारे 'कृतज्ञ मी कृतार्थ मी' हे नाटक ओगले यांनी लिहिले आहे. 'होय मी सावरकर बोलतोय' या राजकीय नाटकात अभिनेता आकाश भडसावळेने मुख्य भूमिका साकारली आहे; तसेच निर्मितीही त्याच्याच संस्थेची आहे. बालगंधर्व यांच्या आयुष्यावर 'तो एक राजहंस' आणि दीनानाथ मंगेशकर यांच्यावर 'संगीतरत्न दीनानाथ' या नाटकाचे लेखनही ओगले यांनी केले आहे.

त्त्यांचे पुत्र गोपाळ अनंत ओगले यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र वृतपत्र सुरू झाले

अनंत ओगले यांची पुस्तके

[संपादन]