Jump to content

दामखिंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?दामखिंड

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .११४२३ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
५९६ (२०११)
• ५,२१८/किमी
भाषा मराठी
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१२०१
• +०२५२५
• एमएच४८
बोलीभाषा:आदिवासी कातकरी

दामखिंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर कोंढण गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २५ किमी अंतरावर आहे.हे गाव कोंढण ग्रामपंचायतमध्ये आहे.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ११२ कुटुंबे राहतात. एकूण ५९६ लोकसंख्येपैकी ३२१ पुरुष तर २७५ महिला आहेत. गावाची साक्षरता ५३.३६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६६.५५ आहे तर स्त्री साक्षरता ३७.६६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ९० आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १५.१० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.

नागरी सुविधा

[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा पालघरवरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

[संपादन]

कोंढण, आवधण, कोसबाड, नांदगाव तर्फे मनोर, आंभण, वेळगाव, खुटाळ, पोळे, बांधण, चिल्हार, ही जवळपासची गावे आहेत.

संदर्भ

[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc