विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०१८

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार ! याकाळावधीत कोणते विशिष्ट लेख करावेत अशी यादी आहे का? म्हणजे त्यानुसार लेख करता येतील. मी तूर्त केवळ माझया अभ्यासविष्यावरच आधारित लेख तयार करते आहे. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १३:४७, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@आर्या जोशी: आशियाई महिना यात सदस्यांना स्वतंत्र आहे की ते कुठल्याही लेख तयार करू शकतात, यादी बनवून लेख बनवले की एक विषय जाहीर होते त्यांनी या अभियानाची शोभा कमी होते असे विविध आयोजकांचे पूर्वी व आताही मत आहे. या अभ्यानाची शोभा वाढवावी व फक्त एक विषयावर लेख नसावे त्यामुळे यादी बनवणे योग्य नाही. आशा आहे की आपण समजून घ्याल. आपण जे लेख बनवले आहेत ते योग्य आहे व अशा आहे की आपल्यापासून अधिक लेख तयार होतील. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) १४:५८, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: आपल्या उत्तरासाठी धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १५:१५, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@आर्या जोशी:, आपण आशिया संबंधित वर्गाचे दुवे उघडून कोणते लेख आहेत ते पाहू शकता. नसलेले लेख करायचे आहेत.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:४२, १५ नोव्हेंबर २०१८ (IST) @सुबोध कुलकर्णी: धन्यवाद. हातातील इकेबाना हा लेख पूर्ण करते आणि मग पाहते नक्की. --आर्या जोशी (चर्चा) २२:४२, १५ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@Tiven2240:, मी भारत-श्रीलंका शांती करार आणि जे. आर. जयवर्धने हे लेख पूर्ण केले आहेत. पण योगदान सदर करताना अडचण येत आहे. वेळेच्या आधी लेख पूर्ण झाल्याने ते पात्र असल्याचा संदेश येत आहे. काय समस्या आहे ते पहावे ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २३:४६, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: ते सर्वर प्रॉब्लेम आहे. le loy ती लेख जोडतील अशी अपेक्षा आहे. पूर्वी काही वर्षे सुद्धा असे झाले होते. ते नक्की ती त्रुटी दूर करतील. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ००:१३, १ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

@Tiven2240:, परीक्षणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठे योगदान आर्या जोशी यांचे आहे. तरी नियमानुसार त्यांना आशियाई दूत घोषित करावे ही आयोजक या नात्याने विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:०३, १५ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

WAM JUDGING TOOL[संपादन]

You have pending judging on tools page. Please do the needful asap. I need to give out the final results. --Tiven2240 (चर्चा) ०९:४२, १० डिसेंबर २०१८ (IST)[reply]

@Tiven2240:, मी सर्व लेखांचे परीक्षण पूर्ण केले आहे. नियमानुसार मी माझे स्वत:चे लेख तपासू शकत नाही. निकाल जाहीर करावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:१२, १० डिसेंबर २०१८ (IST)[reply]

२००३ नोम पेन्ह दंगलीसिंगापूरची संस्कृती हे दोन लेख विकिपीडिया आशियाई महिनाच्या मार्गदर्शनात बसत आहे. त्याला नाकारण्याचे कारण स्पष्ट वाटत नाही. आपण त्याचे गुणात सुद्धा बदल कराल अशी आशा आहे. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) २०:१८, १० डिसेंबर २०१८ (IST)[reply]

मी स्पष्ट कारणे दिली आहेत. दोन्ही लेखांत अपेक्षित सुधारणा स्पर्धा कालावधी संपल्यानंतर केल्या आहेत. त्याबद्दल मी Shrinivaskulkarni1388 यांना धन्यवाद देतो.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:१९, १० डिसेंबर २०१८ (IST)[reply]

स्पर्धा लेख सुधारण्यासाठी कालावधी १० डिसेंम्बर २०१८ होती याची माहिती इथे दिली होती. दोन्ही लेख १० डिसेंम्बर च्या काळात सुधारली गेली आहेत. कृपया याची नोंद घ्यावी व आवश्यक बदल करावे. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) २१:४६, १० डिसेंबर २०१८ (IST)[reply]

कालावधीविषयी संदेश पाहिला. सदर संदेश आयोजक म्हणून मला प्राप्त झालेला नाही. आयोजक या नात्याने आपण याची माहिती सर्व समुदायाला देऊन सर्वांना सुधारणा करण्याविषयी अवगत करणे आवश्यक होते असे मला वाटते. आपल्या प्रकल्पपानावर ही माहिती जाहीर न झाल्याने सर्वांना संधी मिळाली नाही. सबब हा नियम आपल्या विकिसाठी लागू होत नाही.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:२६, ११ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

@अभय नातू आणि V.narsikar:,आयोजक म्हणून सदर सूचना सर्व समुदायाला कळवणे ही जबाबदारी अनुभवी आयोजक म्हणून टायवीन यांनी पार पाडलेली नाही. तसेच आयोजक स्वत: आपले लेख तपासून त्यांना गुण देऊ शकत नाही. हा नियम प्रकल्पपानावर आहे. याचेही उल्लंघन त्यांनी केले आहे. हे सर्व मान्य न करता ते नाहक आपल्याला साद देऊन सर्वांचा वेळ वाया घालवत आहेत असे माझे मत आहे. आपण सर्व बाबींचा समतोल विचार करून भूमिका मांडावी ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३४, १३ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

मूळ प्रकल्पपानाचा , मूळ नियमांचा दुवा द्यावा. त्याने सखोल तपास करता येईल. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:५२, १५ डिसेंबर २०१८ (IST)[reply]
@V.narsikar:, आपले मत पाहिले. मुद्दा हा लेखांच्या सद्य दर्जाचा नाही. स्पर्धेच्या कालावधीच्या नियमांशी संबंधित आहे. नियम या पानावर आहेत. तसेच कालावधीचा संदेश टायवीन यांच्या या पानावर आहे, ज्याची सूचना सर्वांना दिली गेली नाही. टायवीन यांना माझे वरील उत्तर पुन्हा पहावे ही विनंती.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५१, १५ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

२००३ नोम पेन्ह दंगली या लेखाच इतिहास बघितला असता, त्यात सदस्य:Shrinivaskulkarni1388 यांनी ३० नोव्हेंबर नंतर (४ डिसेंबरला) संपादने केल्याचे दिसते. त्यात सुमारे ९४३० बाइट्स इतका मजकूर जोडला आहे. जर आपण म्हणता तसे कि, वाढीव कालावधीची सूचना दिल्या गेली नव्हती तर, हा लेख स्पर्धेत बाद ठरतो. तसेच या लेखात इंग्रजी विकिवरील लेखाचे भाषांतर केलेले दिसते आहे. (ख्मेर ऐवजी खमेर इत्यादी.) तसेच ४ डिसेंबर व त्याआधीची संपादने ही दुसरे कोठेतरी भाषांतर करून येथे डकविली आहेत असेही आढळते.पण हा लेख मशिनी भाषांतर आहे हे मी तरी खात्रीने सांगू शकत नाही.माझेपाशी तेवढी तांत्रिक सोय नाही. यातील संदर्भही इंग्रजी विकिपेक्षा जास्त आहेत.
सिंगापूरची संस्कृती हा लेखही सदस्य:Shrinivaskulkarni1388 यांनीच लिहिलेला आहे.या लेखातही इंग्रजी लेखाचेच भाषांतर दिसत आहे.पण हा लेख मशिनी भाषांतर आहे हे मी तरी खात्रीने सांगू शकत नाही.माझेपाशी तेवढी तांत्रिक सोय नाही. या लेखातही ३ डिसेंबरला सुधारणा केल्या व काही संदर्भ जोडल्याचे दिसत आहेत.जर आपण म्हणता तसे कि, वाढीव कालावधीची सूचना दिल्या गेली नव्हती तर, हाही लेख स्पर्धेत बाद ठरतो.
असे असले तरीही,या स्पर्धेच्या आयोजकाने/आयोजकांनी काय करावे व काय करू नये, व त्याने एखादा विशिष्ट नियम तोडला तर, त्याबाबत योग्य काय कार्यवाही असावी, त्याची दखल त्या विकिवरील प्रचालकांनी घ्यावी अथवा नाही, हे ठरविणारा मी कोणीही नाही.आपण ही गोष्ट मुख्य आयोजकांचे कानावर घालावी व तेथे योग्य तो निर्णय करवून घ्यावा असे सुचवावेसे वाटते.मी वर फक्त या लेखांबद्दल तथ्थ्ये मांडली आहेत.तसेच या गोष्टी कोणीही शाबित सदस्य तपासू शकतो.
जर, येथील प्रचालकांचा निर्णय अंतीम असेल तर, सर्व सदस्यांना कालावधी वाढीची सूचना न दिल्या गेल्यामुळे, हे वरील दोन्ही प्रश्नांकित लेख या स्पर्धेतून बाद ठरतात.आपले वर नमूद केलेले म्हणणे कि, (सबब हा नियम आपल्या विकिसाठी लागू होत नाही.) - सूचना न दिल्यामुळे,वाढीव कालावधी येथे लागू होत नाही या वास्तविक मागणीचे मी समर्थन करतो व ते ग्राह्य धरतो.यासाठीच मी योग्य ते मूळ दुवे मागत होतो ज्यायोगे तपास योग्य तऱ्हेने करता येईल.याबाबत आपले अजून काहीही म्हणणे असेल तर, कळवालच. धन्यवाद. --वि. नरसीकर , (चर्चा) ०८:५०, १६ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

स्पर्धेतील एकूण योगदान व मिळालेले गुण[संपादन]

सुबोध कुलकर्णी द्वारा केलेले मूल्यांकन[संपादन]

सदस्य एकूण लेख एकूण गुण
आर्या जोशी
संदेश हिवाळे
Vikrantkorde
Shrinivaskulkarni1388 ११
Tiven2240
सुबोध कुलकर्णी --
सुनीला विद्या

Tiven2240 द्वारा केलेले मूल्यांकन[संपादन]

सदस्य एकूण लेख एकूण गुण
Shrinivaskulkarni1388 ११
आर्या जोशी
संदेश हिवाळे
Vikrantkorde
Tiven2240
सुबोध कुलकर्णी
सुनीला विद्या

विवादित मूल्यांकन परिणाम[संपादन]

सदस्य एकूण लेख एकूण गुण
आर्या जोशी
संदेश हिवाळे
Vikrantkorde
Shrinivaskulkarni1388 ११
Tiven2240
सुबोध कुलकर्णी
सुनीला विद्या

@Tiven2240:, आपण याबद्दल मुख्य समन्वयकाचा मेटावरील हा निर्णय आणि वर प्रचालक नरसीकर यांनी दिलेले मत यांचा मान राखावा. आपण अपारदर्शक राहिल्यामुळे नाहक विवाद निर्माण झाला आहे. बनावट गुण वगैरे तथ्यहीन आरोप करून सहभागी सदस्यांचा उत्साह कमी करू नये. प्रचालकांनी या वर्तनाकडे लक्ष द्यावे ही विनंती. मला खात्री आहे, @Shrinivaskulkarni1388: यांनाही ही नियमानुसार झालेली गुणांकन प्रक्रिया मान्य होईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:००, १८ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

आयोजकांचे मतभेदांमुळे या वर्षी विकिपीडिया आशियाई दूत जाहीर करण्यात येणार नाही. मला खात्री आहे, @Shrinivaskulkarni1388 आणि आर्या जोशी: यांनाही ही प्रक्रिया मान्य होईल. धन्यवाद. Due to internal disputes between the jury. There will be no Asian month Ambassador declared on Marathi Wikipedia this year. I assume that this will be a ultimate solution for this conflict. I hope aarya and shrinivas would cooperate and try their best for the next year. Thank you --Tiven2240 (चर्चा) ०९:१६, १८ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

Pinging @Saileshpat:

@V.narsikar, अभय नातू, आणि Saileshpat: व सर्व सदस्य, वरील निर्णय हा आयोजक म्हणून मी अमान्य करत आहे. 'आयोजकांचे मतभेद' असे खोटे भासवून हा विजेत्यावर केलेला अन्याय आहे तसेच सर्व नियम धुडकावून लावत केलेला मनमानीपणा आहे हे मी स्पष्ट नोंदवू इच्छितो. याचा पुरावा देणारी सर्व सत्ये वरील चर्चेत वारंवार मंडळी आहेत. विनाकारण वाद निर्माण करून स्वत:च्या चुका झाकण्यासाठी सर्वांचा विधायक वेळ वाया घालवणे आणि सदस्यांना मनस्ताप देण्याचा हा प्रकार आहे. येथे प्रचालकांना व मेटावर आयोजकांना अपुरी दिशाभूल करणारी माहिती देऊन आपल्या बाजूने अवैध निर्णय करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, जो निष्फळ ठरला. कारण तथ्ये समोर आहेत, जी पाहून प्रचालक व आयोजकांनी स्पष्टपणे आर्या जोशी यांना आशियाई दूत म्हणून घोषित करण्याविषयी कौल दिलेला आहे. यानंतरही आता @Shrinivaskulkarni1388 आणि आर्या जोशी: यांना यात ओढून मनस्ताप दिला जात आहे. मी स्वयंसेवक म्हणून अयोजाकाचे काम नीट पूर्ण केले आहे. मी पुढचा निर्णय आपण प्रचालक व मुख्य आयोजक यांच्याकडे सोपवत आहे.सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२१, १८ डिसेंबर २०१८ (IST)[reply]
@Tiven2240:, आपण याबद्दल मुख्य समन्वयकाचा मेटावरील हा निर्णय आणि वर प्रचालक नरसीकर यांनी दिलेले मत (आपणच त्यांना येथे विनंती केली आणि मेटावरसुद्धा तसे मांडले आहे) यांचा मान राखावा ही पुन्हा एकदा आणि शेवटची विनंती. आपण विवेकाने विचार करून योग्य ती गोष्ट कराल अशी आशा बाळगतो. मला यापुढे या वादात रस नाही... सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२१, १८ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

@V.narsikar, अभय नातू, आणि Saileshpat:

  • इतरांचे काहीही ऐकून न घेता, स्वत:ची चूक झाकण्यासाठी, टायविन आता आगपाखड करून गोंधळ निर्माण करीत आहे.
  • वास्तविक येथे पुढे काय करायचे याची स्पष्टता आलेली असताना, विजेता नसेल हा फ़ालतू फ़तवा टायवीन काढत आहे.
  • दरवर्षी आशीयायी महिन्याच्या निमित्ताने स्वत:चेच मट्रा भाषांतरीत लेख दाखवून स्वत:लाच आशीयायी दूत म्हणून स्वत:च जाहिर करण्याचा गैरप्रकारही टायवीन यांनी आधीच्या वर्षांपर्यंत केलेला आहे. शिवाय या वर्षीसुद्धा तोच गोंधळ कायम नव्या स्वरुपात करायचा त्यांच मानस असावा. येथे स्वत:चे लेख स्वत: तपासणे चुकीचे असून इतरांकडून गुणांकन होणे आवश्यक आहे.
  • असे असता, पुढल्या वर्षीपासून आशीया महिनाचे काम इतर कोणी बघावे, टायविन यांना दिले जाऊ नये ही विनंती. शिवाय, यावर्षीची विजेती आर्या जोशी आहे. ह्या निर्णयावर यावे असे मला समुदायाला आवाहन करायचे आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १३:१३, १८ डिसेंबर २०१८ (IST)[reply]
  • ता.क. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एका समुदायाकडून दोन विजेते असू शकतात, आणि दोघांचे नाव दिले जाऊ शकत असताना उगाच जोशी का कुलकर्णी हा वादच कशाला पाहिजे. येथे २०१६ मधे टायविनने स्वत:ला आणि नितिन कुंजीर यांना विजेता घोषित केले आहेच की. त्यामुळे टायविन यांचे उगाच वाद निर्माण करणे पुन्हा एकदा समोर आलेले आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १३:२८, १८ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

@QueerEcofeminist: there is no discussion of ambassador going on here. The main issue is of the evaluation which subodh Kulkarni and I have completed. Subodh Kulkarni has evaluated as per the instructions given to him and I have evaluated as per instructions given to me on my talkpage. It is the mistake of the main organiser that subodh haven't received the updated message (which is his ignorance that he could add his name here). I have done my path and subodh his. The results of it is conflicting and it's the mistake of the Asian month team which he has been apologized on meta. Now it's the issue of ambassador of whether aarya or shrinvas. Untill the decision is not clear from the international team I am not declaring the ambassador names.

Administrators/community of this project can take decision that whether either both aarya and shrinivas should be declared as ambassadors or no one should be. But untill this is clear, there will be no ambassador declared from my side. Rest is all to the communities decision.

Thanking you

--Tiven2240 (चर्चा) १५:२१, १८ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

निर्णय प्रक्रिया[संपादन]

वरील सर्व चर्चा वाचली.उत्साहाने आम्ही सगळेच या उपक्रमात सहभागी झालो आहोत ते व्यासपीठ समृद्ध करण्यासाठी.टायवीन यांच्यासह सुबोध यांचे नाव आयोजक म्हणून जाहीर झाल्यावर दिलासा मिळाला होता कारण टायवीन यांच्या बाबत पूर्वानुभव फारसे बरे नाहीत. फाऊंटन टूलद्वारे निकाल आलेले असताना विनाकारण वाद कशाला वाढवावेत? इतरांचे माहिति नाही पण समंजस संपादक म्हणून यावेळी माझी भूमिका ही न्याय्य निर्णय आणि अचूक निर्णय स्वीकारणे आहे. आणि जर दोन विजेते घोषित करणे शक्य आहे तर वाद वाढवायचाच कशाला? मला या क्षूल्लक भांडणात रस नाही.टायवीन यांनुही आपले घोडे जाऊ द्या पुढे यासाठी या उपक्रमाचा गैरवापर करू नये आणि संपादकांचे खच्चीकरण न करता योग्य निर्णय द्यावा.बाकी सर्वच सुज्ञ आहेतच. माझा एकही लेख मशीन भाषांतर नाही आणि सर्व निकष मी काटेकोरपणे पाळलेले आहेत हे मी ठामपणे नोंदवीत आहे. धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १४:२८, १८ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

कृपया व्यक्तीगत हल्ला करू नये STOP YOUR PERSONAL ATTACKS HERE, @अभय नातू: कृपया पुन्हा एकदा नोंद घ्यावी. जर याना संपादन सोडून हल्ले करायचे असेल तर याना तडीपार करावे. --Tiven2240 (चर्चा) १५:२५, १८ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

या वादावरील निर्णय[संपादन]

@सुबोध कुलकर्णी, Tiven2240, Shrinivaskulkarni1388, आणि आर्या जोशी:

येथे काही निर्णय करण्यापूर्वी, मला खालील गोष्टींची पूर्तता व खात्री हवी आहे.त्याची स्वीकृती केवळ होय/नाही या स्वरूपातच द्यावी.ज्याप्रमाणे कोणी केलेल्या टिप्पणीवर त्वरीत प्रतिक्रिया येते, तोच उत्साह येथेही दाखवावा.

  1. प्रचालकानी/प्रचालकांनी दिलेला निर्णय हा अंतीम व सर्व सहभागी सदस्यांना तसेच अँबेसेडर यांना पूर्णपणे मान्य व बंधनकारक राहील.
  2. या निर्णयानंतर यावर येथे वा इतरत्र कोणीही चर्चा करणार नाही/कोणतीही चर्चा होणार नाही.
  3. या निर्णयाचा संदर्भ देऊन, येथील निर्णय WAM आयोजकांना योग्य रितीने कळविणे व पुढील कार्यवाही पार पाडणे ही जबाबदारी सर्वस्वी आशियायी दूतांची राहील. तो निर्णय जसाच्या तसा कळवावयास हवा. त्यात कोणतीही हेराफेरी/बदल चालणार नाहीत.
  4. तो निर्णय कळविल्याचा येथे शेवटी दुवा देणे आवश्यक राहील व तेथे अंतीमतः काय निर्णय झाला हे पण समुदायांना कळविणे बंधनकारक आहे.
  5. यात कोणी सहभागी होण्यास ईच्छूक नसेल तर त्याची स्वीकृती होय आहे असे समजण्यात येईल व २० तासांनंतर कधीही या प्रकरणावरील निर्णय जाहिर करण्यात येईल.
  6. आशियायी महिना स्पर्धेत सहभागी वरील संबंधीत सदस्यांनीच केवळ येथे मत नोंदवावे.इतरांनी विनाकारण लुडबूड करू नये.
  7. प्रचालकांनी दिलेल्या निर्णयात, आवश्यक वाटले तर केवळ येथील स्वीकृती अधिकारीच बदल करू शकतात. त्यांनी केलेले बदल सर्वांना मान्य राहतील.

धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:४८, १९ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

स्वीकृती[संपादन]

वर नमूद केलेल्या अटी मला मान्य व बंधनकारक आहेत. (आपल्या सदस्यनावासमोर सही करावी.)

  1. सदस्य: सुबोध कुलकर्णी ‌- सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:०९, १९ डिसेंबर २०१८ (IST)[reply]
  2. सदस्य:Tiven2240 -
  3. सदस्य:Shrinivaskulkarni1388 - Shrinivaskulkarni1388 (चर्चा)
  4. सदस्य:आर्या जोशी -आर्या जोशी (चर्चा) १०:१७, १९ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०१८ (विभाग) संपादन[संपादन]

नमस्कार !

विश्वकोश समृद्ध व्हावा यासाठी सर्व संपादक कार्यरत असतात, माझ्या लेखांमध्ये त्रुटी होत्या आणि त्या मी स्वतः सुधारणे आवश्यक होते त्या सुधारल्या, मी विजेता असावं याबद्दल माझा कोणताही अट्टाहास अथवा आग्रह नाही आणि नव्हता, या स्पर्धेत भाग घेऊन चित्रपट या विषयाव्यतिरिक्त योगदान घडणे हा एकमेव हेतू माझा होता, आर्या जोशी जी यांचे लेख निर्विवाद उत्तम आहेतच, त्यामुळे आर्या जी विजेत्या ठरल्या तरी मला त्यात आनंदच होईल, आयोजक @सुबोध कुलकर्णी आणि Tiven2240: सर हे जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. विजेता कोण यावरून वाद नकोत, त्यापेक्षा विश्वकोश अधिक समृद्ध करणे यासाठी माझा प्रयत्न राहील, काही खाजगी कामांमुळे मत नोंदवण्यास उशीर झाला त्याबद्दल सर्वांची माफी मागतो. धन्यवाद ! संवेदना ... मनापासुन ... मनापर्यंत ... १०:४२, १९ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

WAM : Reply from International organising team[संपादन]

Dear All,

I apologize for the confusion that happened in WAM-Marathi edition, I have acknowledged my mistake on Meta about the other organiser not receiving the update as he was not part of WAM organisers list. After seeing all the conversation on the discussion page, Thanks to Google translate and seeing different views on this topic, the International organising team has decided to announce both आर्या जोशी and Shrinivaskulkarni1388 as the Ambassadors from Marathi edition of WAM. Also to honor Shrinivaskulkarni1388 efforts in improving the unaccepted article, If Subodh still has access to fountain tool, I request him to accept the improved articles of Shrinivaskulkarni1388.

Congratulations आर्या जोशी and Shrinivaskulkarni1388! Thanks for your contribution in WAM 2018, we're looking forward to seeing you in WAM 2019, not only as participants but as organisers too.

To the organisers and participants, let's assume good faith on each other, and WAM will never be successful without the active participation of the organisers and participants. Looking forward to seeing you all taking part actively in WAM 2019, Good luck and Happy New Year in advance! --Saileshpat (चर्चा) ००:०८, २० डिसेंबर २०१८ (IST)[reply]


@Saileshpat:, Marathi community requested admin @V.narsikar: to give the final decision. Admin is looking into matter and yet to give his opinion. Meanwhile you declared the ambassadors for Marathi Wikipedia. This decision is not in line with your previous comments on meta. I think, this is unfair to force this decision here. Already due to your mistakes participants are disturbed. Tiven2240 has not apologised for this once. If all the participants were given chance to improve their articles, the result could have been different altogether. This point you have not taken into account. So, this in injustice for other participants. I respect all the contributions without any bias. Therefore, I request you to honor the community's decision and admin and wait for his opinion. Please review your decision.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:४९, २० डिसेंबर २०१८ (IST)[reply]

माझा अंतिम प्रतिसाद[संपादन]

@Saileshpat आणि Tiven2240: स्पर्धेच्या या आयोजकांनी गंभीर चुका करून सर्वांचा वेळ वाया घालवला. शेवटची गंभीर चूक केली तो निर्णय लादण्याची. येथे सर्वांनी प्रचालकांना अधिकार दिलेले असताना ती प्रक्रिया अमान्य करून घाईघाईने निकाल घोषित का करण्यात आले? टायविन यांना हे माहित असताना त्यांनी मुख्य आयोजकांना कल्पना दिलेली नाही. मुख्य आयोजकांनी मेटावर पूर्वी दिलेला निर्णय बदलला, जो येथील प्रचालकांनीही दिला होता. सर्वांना लेख सुधारण्याची संधी मिळाली असती तर निकाल पूर्णत: वेगळे असते, या गोष्टीचा विचार केला गेला नाही. मी कोणतेही पूर्वग्रह न बाळगता सर्वांच्या योगदानाचा आदर करतो. म्हणून मला हा प्रकार मान्य नाही. हा इतर सहभागी सदस्यांवर अन्याय आहे. निर्णय राखून ठेवून मराठी समुदायाची माफी दोघांनीही मागायला हवी असे माझे मत आहे. वर निर्देश केल्याप्रमाणे प्रचालकांनी मुदत मागितली आहे. वैध प्रक्रियेनुसार त्यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल असे आयोजक म्हणून माझे प्रांजळ मत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:१३, २० डिसेंबर २०१८ (IST)[reply]

clarifications[संपादन]

I have removed my comment so that we can come up with discussion sooner and not to stretch the discussion, I also apologize the community that the message was conveyed or reached to everyone, as I was busy with OTRS backlog as well as personal commitments. let's assume good faith, and Subodh we can work together to endorse the international team's result of this WAM and help in making WAM 2019 successful too

Let's conclude this discussion I would request Narsikar ji to have a look at all the suggested comments and come up with a decision and thanks Subodh for helping me in the jury process and thanks to participants for making it successful. Happy editing

Thanking you

--Tiven2240 (चर्चा) ११:२६, २० डिसेंबर २०१८ (IST)[reply]