विकिपीडिया चर्चा:सामग्रीची मालकी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक नोंद म्हणून[संपादन]

  • ह्या धोरणाची कधीही चर्चा झाल्याचे किंवा कसलाही ठराव पारित झाल्याचे मजला तरी स्मरत नाही.
  • शिवाय मराठी विकि मालकीयत्त्वाचे धोरण निर्धारीत करण्यास समर्थ आहे, इंग्रजीवरून प्रत्येक धोरणांची उसनवारी करण्याचे कारण नाही. इंग्र्रजीवरचेच धोरण सर्व विकिंनी स्वीकारावे असेही विकिच्या तात्त्विक बंधन नाही. असे असताना परस्पर इंग्रजी विकिवरून धोरणाचे हे पान मराठीत आणण्याचे कारण मला समजलेले नाही. (शिवाय जिथे प्रताधिकार भंग सारख्या मुक्तस्त्रोताच्या विकिच्या अंगीभूत तत्वांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांची(धोरणांच्या अंमलबजावणीची) आड घेतली गेली. तिथे सामग्रीची मालकी हे धोरण परस्पर ह्या पानावर टाकणे म्हणजे समुदायाचा अपमान आहे.
  • मालकी हक्काच्या धोरणांविषयीची समूदायाची किंवा इतर प्रचालकांशी कसलीही चर्चा किंवा संगनमत न करता परस्पर धोरण ठरवणे हा प्रचालकीय अधिकारांचा गैरवापर आहे आणि गंभीर बाब आहे.
  • मी टायवीन यांनी केलेल्या प्रचालकीय अधिकारांचा नोंदवलेला हा दुसरा गैरवापर आहे या आधीही इतिहासातून मजकूर काढून स्वत:ची चूक लपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ज्या चुकीमध्ये त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते आणि मला तडीपार करण्याची धमकीही(विनाकारण) दिली होती. स्वत:च्या चुकीबद्दल आणि माझ्यावर गंभिर आरोप केल्याची चुक झाल्याचे लक्षात आल्यावरही त्यांनी साधी माझी माफ़ी मागण्याचेही सौजन्य न दाखवता विषयाला बगल दिलेली आहे.
  • एकूणच परस्पर धोरणे ठरवणे, आंबेडकर लेखावरील निर्णय कसलेही‌ पुरावे आणि वास्तव न तपासता अनिर्णित ठेवणे, विनाकारण आरोप करुन अविरत योगदान देणाऱ्या सदस्याला त्रास देणे मराठी समजण्यात असलेली मोठी अडचण मशिन ट्रांन्सलेशनवर भिस्त ठेऊन मराठी विकिवर काम करणे अशा अनेक बाबी टायवीन यांच्याकडून झालेल्या आहेत.
  • @अभय नातू आणि V.narsikar: प्रचालकांनी या मुद्यांकडे लक्ष द्यावे व योग्य ती कारवाई करावी ही विनंती. WikiSuresh (चर्चा) १३:०६, ३० जुलै २०१८ (IST)[reply]
@Sureshkhole: नोंद घेतली. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:२४, ३० जुलै २०१८ (IST)[reply]
लेखात विचाराधीन असल्याची नोंद केली.
@Sureshkhole:, शक्यतो इतर ठिकाणच्या चर्चा किंवा इतर गोष्टींबद्दल तेथेच चर्चा करावी. धन्यवाद.
@Tiven2240:, या धोरणासाठीची चर्चा योग्य पानावर सुरू करावी.
अभय नातू (चर्चा) ००:१८, २ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]


हा प्रस्ताव विकिपीडिया:पाच आधारस्तंभचे ४था स्तंभचे एक भाग आहे. सद्या मराठी विकिपीडियावर अनेक ठिकाणी {{काम चालू}} च्या आधारावर या मूलभूत कायद्याचे उल्लंधन होत आहे यामुळे या धोरणाचे मराठी भाषांतर मी केले. चर्चा कराची असेल तर नक्की आपण करूया. लवकर यावर चर्चा चावडीवर करूया. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०६:१९, २ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

गोंधळाची परिस्थीती : टायवीन यांची परस्परविरोधी निर्णय आणि विनाकारण गोंधळ निर्माण करणे[संपादन]

प्रतिपालकांनी लक्ष द्यावे, @अभय नातू आणि V.narsikar:

  • ह्या पानावर आर्या जोशी यांनी इतर सदस्यांचा लागोलाग संपादने केल्यास त्रास होतो म्हणून प्रचालकांना विनंती केली होती.
  • त्यावर दस्तूरखुद्द टायवीन यांनीच जेथे काम करत आहात त्या ठिकाणी {{काम चालू}} लावला जावा असे सूचवले. इतकेच नव्हे तर,
  • त्या साच्यामध्ये लेखावर शेवटचे संपादन कोणी केले त्याचे नाव दिसेल असा बदलही टायवीन यांनीच केला.
  • आता मला कळत नाही जर टायवीन यांनीच हा साचा कसा वापरायचा हे ठरवून दिले, शिवाय शेवटचा बदल करणाऱ्याचे नाव साच्यात दिसेल असा बदलही केला आणि आता त्याच साच्याचा त्यांना गैरवापर होताना दिसतो आहे. जो मुळात वापर म्हणून टायवीन यांनीच भांडणावरील उपाय म्हणून सुचवला होता.
  • गैरवापराचा पुरावा काय आहे? कुठे झाला आहे गैरवापर? की, फ़क्त टायवीन यांनाच तो गैरवापर दिसत आहे?
  • शिवाय, मालकी हक्कांची धोरणे आखली जावीतच माझा तात्वीक दृष्ट्या इंग्रजीची धोरणे जशीच्या तशी लागू करण्याला विरोधही नाही, पण हा मुद्दा आत्ताच कसा काय आला आणि टायवीन यांना गैरवापर नक्की कुठे दिसला? शिवाय परस्पर धोरणे कसल्याही समुदायाच्या मतांशिवाय कशी काय बनवली गेली अश्या सर्व प्रश्नांचे उत्तर टायवीन यांनी दिलेले नाही. शिवाय कोणतेही धोरण लागू करताना समुदायाचे मत घेणे आवश्यक आहे, त्यावरील चर्चा करणे ही बाब "वाटलं तर करुयात ह्या स्वरुपाची नसते" ह्याची जाण टायवीन यांना नाही हे वरील उत्तरावरून दिसते.
  • त्याचबरोबर समुदायाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि महिलांसारख्या परिघावरील गटांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही सोडवला जावा. कारण सबळ पुरावे देऊनही अजुनही ज यांच्या उत्पातावर कारवाई झालेली नाहीये. WikiSuresh (चर्चा) १०:१०, २ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole, आर्या जोशी, , आणि सुबोध कुलकर्णी:

यावर उपाय माझे मनात आला होताच. साचा कामचालू मध्ये काही मर्यादा होत्या.काही वेगळा मजकूर होता जो काही ठिकाणी लागू होत नव्हता. त्यास पर्याय म्हणून {{निर्माणाधीन}} तयार करण्यास मी कार्यरत होतो. त्यात काही अडचणी येत होत्या. आता तो साचा तयार झाला आहे. सध्या तो चाचणीत आहे पण हवा असल्यास,तातडीने त्याचा वापर सुरू करता येईल.नुसते {{निर्माणाधीन}}असे एखाद्या लेखात लावल्यावर मजकूर दिसेल.
या माझ्या कृतीमध्ये, कोणास पाठीशी घालणे अथवा कोणावर मात करणे हा माझा आशय नव्हता. यात सर्वसमावेशक भूमिका होती, कृपया गैरसमज करू नये ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:५७, २ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@अभय नातू आणि Tiven2240:यांना माहितीसाठी.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:५७, २ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]


आवाहन[संपादन]

@Sureshkhole आणि Tiven2240:,

तुमचा सदस्य/संपादक म्हणून योग्य तो मान राखत सांगू इच्छितो की गेल्या काही दिवसांतील तुमचा (वि)संवाद मुद्दे सोडून वैयक्तिक पातळीवर घसरलेला आहे. विनाकारण एकमेकांच्या कामावर ताशेरे ओढणे, त्याचा बचाव करणे आणि प्रतिहल्ला करणे हे सर्रास दिसत आहे. यात मराठी विकिपीडिया आणि इतरांचे नुकसान होत आहे हे सांगणे नलगे तरीही येथे नोंदवितो.

खरे पाहता तुम्ही दोघेही मराठी विकिपीडियावर काम करणाऱ्या सदस्यांमध्ये उठून दिसणारे आहात. तुमचे तांत्रिक आणि विषयवस्तूवरील काम हे कौतुकास्पद आहे. असे असता क्षुल्लक (माझ्या मते) कारणावरुन दोघांनीही एकमेकांच्या कुरापती काढण्याचे चालविले दिसत आहे.

वरिष्ठ सदस्य आणि प्रचालक या नात्याने मी तुम्हाला दोघांनाही सबूरीने घेण्याचा (अनाहूत) सल्ला देत आहे. माझ्या नजरेत दोघेही मुद्दामहून एकमेकांच्या कामात दखलअंदाजी करायला बघत नाहीत परंतु गेल्या काही दिवस/आठवड्यातील गढूळ वातावरणामुळे दुसऱ्याची प्रत्येक हालचाल ही चाल आहे असे दोघांनाही वाटत आहे. अझ्यूम गुड फेथ या तत्त्वाची दोघांनाही आठवण करुन देतो. शक्य असल्यास पुढील काही दिवस दोघांनीही एकमेकांपासून दूरच्या परिघात कामे करावीत असा पुढचा सल्लावजा विनंती करीत आहे. यात कोणा एकाचा पक्ष घेण्याची भूमिका नसून चिघळलेली परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे.

माझ्या या सल्लावजा विनंतीला किती किंमत द्यायची हे तुम्हीच ठरविणार.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १२:०५, २ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: आपले मत देण्यासाठी धन्यवाद. याची काळजी मी घेईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:०९, २ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: इथे मुद्दा कुरापती काढण्याचा नसून चुकांच्या गांभिर्याचा आहे. गेल्या आठवडा भरात मी नोंदवलेले टायवीन यांच्या कामातील सगळे आक्षेप आपण प्रतिपालक म्हणून तपासावेत अशी मी विनंती करित आहे. येथे वैयक्तीक हल्ला करणे असा हेतु नसून सुधारणांची आवश्यकता खरोखर आहे की नाही हे आपणच ठरवावे. शिवाय कटकारस्थाने कुठुन केली जात आहेत हे उघडच आहे नाहीतर मी काम चालु साच्याचा वापर करुन लेख सुधारत असताना अचानक ह्या धोरणाची आठवण टायवीन यांना आली नसती.

  • मी अधिकार केलेल्या विनंतीवर जो गोंधळ टायवीन यांनी केला आहे तो ही पाहून घ्यावा.
  • शिवाय सुधारलेल्या लेखाच्या गुणवत्तेकडे सरसकट दुर्लक्ष केले जात आहे याचे शल्य मला निराळेच सलते आहे. WikiSuresh (चर्चा) १३:१८, २ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]