कांडीकोळसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कांडीकोळसा हा भारतातील अनेक शहरांत भासणारी इंधन समस्या थोड्याफार प्रमाणात दूर करणारा एक उपाय आहे. ज्यांनी कांडीकोळशाचा व्यापार केला ते मोठे झाले, कारण या कोळशालाला बाजारपेठ शोधावी लागत नाही. सर्वाकडे कुकिंग गॅस नसतो, रॉकेल मिळत नाही. मिळते तेही पुरत नाही, महागही पडते. शहरात सरपणही मिळत नाही. झोपडपट्टीवासीयांची तसेच हातावरचे पोट असणाऱ्यांचे हाल याहीपेक्षा जास्त आहेत. याला लोकांनी पर्याय शोधला आहे. तो म्हणजे लाकडी भुसा व कोळश्यावर चालणाऱ्या शेगड्या. पाणी तापविणे, स्वयंपाक करणे याकरिता त्या उपयोगी आहेत. कांटीोळसा बनवणे हा महिलांना वैयक्तिकपणे तसेच महिलांच्या बचतगटांना सामुदायिकरित्या करता येण्यासारखा व्यवसाय आहे. हा व्यवसाय महिलाना आपला घरप्रपंच सांभाळून करता येतो. एखादीची राहण्याची जागा तळमजल्यावर असेल व आसपास थोडीशी रिकामी जागा असेल तर महिलांना हा व्यवसाय करण्यास अतिशय सोयीचे आहे..

कांडीकोळसा तयार करणे[संपादन]

कार्यप्रक्रिया[संपादन]

कांडी कोळसा तयार करण्याचे मशीन बाजारात मिळते ते खरेदी करावे. कांडी कोळसा तयार करण्याकरिता दगडी कोळशाची राख, लाकडी कोळशाची राख, पाला पाचोळा, जळाऊ टाकाऊ वस्तूंचा चुरा, शेण, काळी माती, मिक्स करून भिजत घालतात. हे मिश्रण कोळसा तयार करण्याच्या मशीनमध्ये टाकून. सरळ, गोल आकाराचा अथवा सांडग्याच्या आकाराचा कोळसा तयार करता येतो. दोन-तीन दिवस याला चांगले ऊन दिले की उत्तम प्रतीचा कोळसा तयार होतो.

प्रकल्पक्षमता[संपादन]

हा प्रकल्प माध्यम स्वरूपाचा असून, या प्रकल्पात एका वर्षात पाच मेट्रिक टन इतके कांडीकोळशाचे उत्पादन अपेक्षित आहे.

तपशील प्रमाण दर (रु .) एकूण किंमत
कोळसा ४००० कि.ग्रॅ. १० रु / कि.ग्रॅ. ४०,०००
शेण २०० कि.ग्रॅ. १ रु / कि.ग्रॅ. २००
पॅकेजिंग साहित्य - - ८००
एकूण ४१,०००

संदर्भ[संपादन]