चर्चा:चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


'ठेवण/पध्दत
{{{सूचना}}}



नमस्कार,

हा संपूर्ण लेख मीच लिहिला असुन आत्ता चुकुन सदस्य प्रवेश न घेतला लिहिला असल्याने आपल्याकडे माझा आय पी आला असेल.

हि माहिती मी लिहिलेल्या "आम्हि चित्पावन" या लेखातील आहे.

आपले प्रयत्न स्तुत्य आहेत परंतु हा लेख विकीपीडिया साठी उपयुक्त लेख नाही. असे माझे मत आहे. अजयबिडवे ०८:५६, २५ मे २००९ (UTC)

लेख तात्काळ काढून टाकण्यात यावा[संपादन]

चित्पावनांवरील लेखामागील भूमिका जातीय स्वरूपाची आहे. लेखातील प्रत्येक दोन वाक्यानंतर लेखकाचा अभिनिवेश दिसून येतो. विकिपिडिया हे व्यासपीठ आपापल्या जातींसाठी वापरण्याचे साधन ठरू नये. सबब, हा लेख तात्काळ काढून टाकण्यात यावा. सदस्य: suryakant palaskar

सुयोग्य विकिसहप्रकल्प, इतर लेखात विभागांचे स्थानांतरण संदर्भ[संपादन]

या लेखातील सध्याचे लेखन मूळ लेखन या स्वरूपात मोडते. ते विकिस्रोत या भावी सहप्रकल्पास उपयूक्त आहे तो पर्यंत हे लेखन ही सूचना लावून मराठी विकिबूक्समध्ये साठवता येईल. मराठी विकिपीडियात या लेखनातील भाग ठेवण्याकरिता संपादकास सुयोग्य असे स्वत:च्या लेखनाचे सोडून इतर संदर्भ[ संदर्भ हवा ] देणे अपेक्षीत आहे Mahitgar १५:३०, २५ मे २००९ (UTC)



संदर्भ मी देऊ शकतो मात्र ते इंटरनेटवर नाहियेत.

पुस्तकांतील आहेत माझ्या मुळ लेखात खाली मी संदर्भ ग्रंथ दिले आहेत पण इथे तसे करता येत नाहि म्हणुन मी सरळसोट माहिती दिली. मला कल्पना आहे कि ती नीट लावण्यास तुम्हांला - मला वेळ लागेल. मात्र पुस्तकांत वाचलेले अथवा मी भाषणांत ऐकलेले संदर्भ इथे कसे सांगु?(म्हणजे तुम्ही [ संदर्भ हवा ]असे जिथे जिथे लिहिलेय तिथे तर ते हायपरलिंक आहेत ना?)

विकिपीडियावर पुस्तकातील संदर्भ चालतात (किंबहुना जास्त स्वागतार्ह असतात). पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशन माहिती, इ. द्यावे.
भाषणातील संदर्भ सहसा ग्राह्य धरले जात नाहीत. याला अपवाद म्हणजे हे भाषण/चर्चा आंतरजाल किंवा पुस्तकरुपी प्रकाशित असणे. असे संदर्भ चालतात. याचे मुख्य कारण म्हणजे अशी वक्तव्ये पडताळून पाहता येतात.
ललित लेखन विकिपीडियावर लिहू नये. माहितगारांनी सुचवल्या प्रमाणे विकिसोर्स किंवा विकिबूक्सवर ठेवता येईल. त्यातील सत्यकथने (फॅक्ट्स) येथे जरूर चालतील.
आपण लेखन करावे, त्याची मांडणी, संपादन करण्यास येथे सदस्य (मी तरी) तयार आहे.
अभय नातू १८:३०, २५ मे २००९ (UTC)
सध्या लेख कोणाचातरी वैयक्तीक विचार मांडल्यासारखा आहे, बरीच प्रक्षोभक विधाने आहेत. माझ्यामते या स्वरूपातील लेख लगेचच काढून टाकण्याच्या लायकीचा आहे. - कोल्हापुरी ०४:१६, २६ मे २००९ (UTC)


=====================================[संपादन]

"शिलाहार कालीन ताम्रपटात अथवा शिलालेखात "घैसास" हे चित्पावनी आडनाव आले आहे. त्याचा "घळीसास" असा अपभ्रंश देखील मिळतो[ संदर्भ हवा ]. या नंतर कशेळीतील कुलकर्ण्याचे दफ्तरात जामिनकीच्या कागदावर काही साक्षी आहेत, हा कागद शके १५२०/२२ च्या दरम्यानचा आहे[ संदर्भ हवा ]. त्यात भानजी गणपुला, सिवाभट रानडीया, गणो विठ्ठल पराणजप्या, गाव खडीकर व ढवळे ही नावे दिसतात. हे पाच जण फणशे आणि सेजवळकर या दोन कर्‍हाड्यांना २१५२/- रुपयांना जामिन राहिले होते. याचाच अर्थ या घटनेतील ३ चित्पावन हे सुस्थितित आणि समाजात मान असलेले होते[ संदर्भ हवा ].या पेक्षा जुना उल्लेख चिपळूणच्या कुलकर्ण्याचा आहे, यावरुन गावातले ’कुलकर्णीपद’ हे चित्पावन सांभाळत होते[ संदर्भ हवा ]. हे चित्पावन काळे नामक असून नरसीपंत काळे यांच्यापासून १४७० च्या सुमारास सुरू झालेली वंशावळ विनजी नरसी(१५००), पर्शराम विनजी(१५३०), काळो पर्शराम ते अंतो काळो(१५८०) इथपर्यंत मिळते. याचाच अर्थ शके १४७० किंवा त्या अगोदर पासूनच नरसीपंत काळे यांनी चिपळूणचे कुलकरणपद सांभाळले होते[ संदर्भ हवा ].याच बरोबर पावस येथे जोश्यांच्या कागदपत्रात शक १५४० मधील कौलनाम्यात म्हंटले आहे - "पावसच्या जोश्य़ांचे जोसपण कदीम मिरास आहे." म्हणजे ते किमान २५०-३०० वर्षांपूर्वीचे असावे. याच जोश्यांच्या कागदपत्रात १५५० मधील खरेदीपत्रावर काही चित्पावनी नावे आहेत - विश्वनाथ भट, दादभट देसाई, बामनभट देसाई, बाल सोवनी सराफ, हरीभट अभैकर(अभ्यंकर), गणेसभट महाजनी. म्हणजे १५५० मध्ये गावातील सराफ, महाजन, देसाई हे चित्पावन होते. १५५६ मधील ह्याच जोश्यांच्या एका कागदावर खालील सह्या आहेत - हरभट अभैकर(अभ्यंकर), कानभट फडका, माद जोशी. म्हणजे १५५६ मध्ये चित्पावन गावच्या खोताचे काम करत असत, कारण हा कागद ’हजरमजालसीचा’ आहे.राजापूर जवळ मीठगव्हाणे येथील त्या मीठगव्हाणाचे देसाईपण चित्पावनांकडे आहे. हा कागद १५५२ मधील आहे[ संदर्भ हवा ]. दंडाराजपूरी व श्रीवर्धन येथील’भटांच्या’ घराण्यातील देशमुखी अशीच पुरातन आहे. ती त्यांना १४०० च्या आसपास मिळाली असावी, असे पेशव्यांच्या नंतरच्या पत्रव्यवहारातून दीसुन येतो[ संदर्भ हवा ]. तात्पर्य चित्पावन अगदीच ’धुमकेतु’ प्रमाणे प्रकट झाले अशातला भाग नक्कीच नाही. शिवछत्रपतींच्या हाताखाली देखील ’केळकर’ नामक बांधकामातील तज्ञाचा उल्लेख मिळतो[ संदर्भ हवा ]. शिवाय ’मोकाशी’ नामक एका मनसबदाराची नोंद मिळते[ संदर्भ हवा ]. त्यांच्या वकील आणि दफ्तरी कामात देखील काही चित्पावनी नावे आहेत[ संदर्भ हवा ]. सिंधुदुर्गाचे भूमीपूजन ’अभ्यंकर’ नामक गुरुजींनी केल्याचा उल्लेख आहे[ संदर्भ हवा ]. याच बरोबर दिवे-आगार येथिल ’बापट’ यांना जंजिर्‍याच्या सिद्दिने मनसब दिल्याचे समजते. आजही त्यांचे वंशज आजही स्वत:ची वाडी आणि वाडा सांभाळत उत्तम संसार करत आहेत{{हे वाक्य काल निरपेक्ष कसे करता येईल ते पाहावे)[ संदर्भ हवा ]. म्हणजेच नेहमीच्या पंचा-पळी-पात्राच्या बरोबर चित्पावनांनी साधारण शके १२०० नंतर शिलाहार राजाच्या शेवटच्या काळात कुलकरण, जोसपण, खोती, महाजनकी, देशमुखी, सराफी व देसपांडेपण सांभाळत होते.शिवकालात ज्या चित्पावनांचा उल्लेख मिळतो ते सुभेदार, तंत्रज्ञ, खोत, कुलकर्णी, देसाई असे आढळतात[ संदर्भ हवा ]. मात्र दरबारी ऊठबस करणार्‍यात चित्पावन दिसत नाहीत[ संदर्भ हवा ]. या शिवाय नाशिक पैठण येथील ब्रह्मवृंदात देखील चित्पावनांचा उल्लेख क्वचितच आढळतो[ संदर्भ हवा ]. बाळाजी विश्वनाथापूर्वी वैद्यविलास, छंदोरत्नावली, कविकौस्तुभ इत्यादि ग्रंथ रचणार्‍या चंपावतीच्या(चौल)रघुनाथ मनोहर नामक चित्पावनाचा उल्लेख मिळतो,हा रघुनाथ मनोहर शिवरायांच्या काळातला आहे[ संदर्भ हवा ]." -


१)शिवछत्रपतींच्या हाताखालील तज्ञ केळकर यांचा उल्लेख मुंबईचे इतिहासतज्ञ श्री अप्पा परब यांच्या रायगड संबधीत भाषणात आला होता मात्र त्याचे रेकॉर्डिंग नाहिये. २)दिवे - आगार येथील बापटांच्या घरी मी स्वत: ४ दिवस राहिलो आहे, त्यांच्याकडे शेकडो पुरातन नाण्यांचा संग्रह आहे, जहागिरी व जमिन विषयक जुनी कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. तसेच झी मराठी वरील भटकंती या कार्यक्रमात मिलिंद गुणाजी यांनी बापट आजोबांच्या बरोबर केलेल्या चर्चेत त्यांच्याच पुर्वजांनी दिवे-आगार येथे वस्ती वसवली याचा स्पष्ट उल्लेख आहे. ३)चंपावतीच्या रघुनाथ मनोहरांचा उल्लेख विद्यावाचस्पती अभ्यंकरांच्या भक्ती कोशांतील आहे(खंड मला परत बघावा लागेल). ४)इतर सर्व उल्लेख हे श्री दिक्षीत यांनी संपादित केलेल्या "आम्हि चित्पावन" या पुस्तकांतील इतिहासाचार्य श्री राजवाडे यांच्या लेखात सहज मिळतील.

  • ५)अभ्यंकर गुरुजींचा उल्लेख मला नेमका आत्ता आठवत नाहिये पण श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकात तो आहे असे वाटाते आहे कारण त्याचे टिपण मी काढले होते तेव्हा मी संदर्भ ग्रंथ लिहिला नव्हता. आपल्यापैकी कोणा कडे आत्ता तो ग्रंथ असल्यास सिंदुदुर्गाचा भाग काढुन बघावा अफझलखानाच्या स्वारीच्या आसपास आहे. सध्या माझे पुस्तक वाचायला बाहेर असल्याने मला सध्या ते शक्य नाहिये. तिथे न सापडल्यास मात्र मला बरेच डोके खाजवावे लागेल पण टिपण काढलय म्हणजे नक्किच मी एखाद्या पुस्तकात वाचलय!
=============================================[संपादन]

"सध्या लेख कोणाचातरी वैयक्तीक विचार मांडल्यासारखा आहे, बरीच प्रक्षोभक विधाने आहेत. माझ्यामते या स्वरूपातील लेख लगेचच काढून टाकण्याच्या लायकीचा आहे."


मित्रवर,

आपले म्हणणे बरोबर आहे कि हा लेख कोणीतरी विचार मांडल्यागत आहे! हा मराठी विकिपिडियावर टाकायला लिहिलेला नव्हताच. दोन वर्षांपुर्वीच हा लेख लिहिला होता. थोरले बाजीराव व बाळाजी विश्वनाथ यांच्यावरील माहिती माझ्याच ब्लॉग वरुन जशीच्या तशी घेतली आहे हे मला ४-५ दिवसांपूर्वी समजल्यावर मी इथे येउन इतर सदस्यांना तशी कल्पना तिथे दिली. मागहुन विचार आला कि इथे पेशवे आहेत पण चित्पावनांचीच माहिती इथे मराठीत नाहिये. म्हणुन हा उद्योग करायला घेतला. मला १००००% मान्य आहे कि या लेखाची धाटणी हि विकिपिडियाची नाहिये, पण ती बदलता येते. लगेच लेबल न लावलेत तर बरे. शिवाय आपण ज्यांना प्रक्षोभक विधाने म्हणाताय ती आपण वेगळी काढुन दाखवावीत, मी संदर्भ देतो(समजा माझे शब्दांकन चुकिचे असल्यास ते जरुर बदलु, पण मुळ ऐतिहासिक घटना, व ऐतिहासिक पात्रांची विधाने/लेखन बदलणार नाहि!) कारण मुळ लेख लिहिताना मी जी ६ महिने अक्कल घासली आहे ती इतक्या सहज कोणीहि ऊडवुन लावावी इतकी सोपी नक्किच नाहिये.


क्रांतिकारकांच्या बाबतीतली माहिती अनेक पुस्तकांतुन क्रॉसचेक करून मग ती घेतली आहेत. शाहु महाराजांच्या पत्राचा उल्लेख, टिळकांच्या वरील खटले, व तत्कालिन क्रांतिकारकांशी संबधेत भरपुर माहिती आपल्याला "डॉ. श्री सदानंद मोरे" यांच्या "लोकमान्य ते महात्मा - खंड १" या पुस्तकात मिळेल या खेरीज श्री वाळिंबे यांच्या "सत्तावन्ने ते सत्तेचाळीस या पुस्तकात देखील ती माहिती मिळेल. जमल्यास हे ग्रंथ आपण चाळुन बघावेत.



" "चित्पावनांचे मुळपुरुष साधारण ३००० वर्षांपुर्वी कोकणात स्थायिक झाले असावेत[ संदर्भ हवा ]. उत्तरेतुन ६२ कुल यज्ञाच्या निमित्ताने पैठण, कर्नाटक व अखेर कोकणात आली. बर्‍याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतुन पावन झाले आहेत ते असा घेतला जातो कारण चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते[ संदर्भ हवा ]. तर समुद्रात १४ प्रेते तरंगत होती परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दिक्षा दिली तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मुळपुरुष हे अग्नि चयन करत व अग्नि(चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन् केले आहे(पुस्तकाचे किंवा प्रकाशित लेखनाचा विसृत उल्लेख हवा)[ संदर्भ हवा ]. व्याकरण दृष्ट्या देखील् हेच् बरोबर् आहे [ संदर्भ हवा ].चित्पावनांची मुळ् कुळे ६२ समजलि जातात्[ संदर्भ हवा ]. चित्पावनांत १४ गोत्रे आहेत[ संदर्भ हवा ]. अंबेजोगाई हि मुळ कुलदेवता असुन्[ संदर्भ हवा ] महालक्ष्मी, वज्राई या मागहुन[ संदर्भ हवा ] कुलदेवता म्हणुन स्विकारल्या गेल्या." " - 


ह्याचे सगळे संदर्भ श्री दिक्षीत संपादित "आम्हि चित्पावन" या पुस्तकातुन घेतले आहेत, इतिहासाचार्य राजवाडे यांनी तर त्यांच्या लेखात परशुराम शकाचे गणित मांडले आहे व चित्पावनांचा काल ठरवायचा प्रयत्न केला आहे. हा लेख आपल्याला त्याच पुस्तकांत मिळेल. या खेरीज इंग्रजी विकिपेडियात परशुराम - चित्पावन संबधांवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केलाय. तिथे सर्च केल्यास त्याच्ह्या "Reference" या भागा मध्ये साधारण हिच माहिती मिळेल. या खेरीज् कोराटि निवासराव लिखित "श्री राघवेंद्र चरीत्र" या कन्नड पुस्तकांत हि माहिती मिळाली आहे(मला कन्नड येत नाहि, त्याचे इंग्रजी भाषांतर मिळाले आहे.) आणि हि सगळी माहिती चित्पावनांशी तंतोतंत जुळते आहे.


खरतर तुम्हीच ठळक अक्षरात दिलेली विधाने एकतर प्रक्षोभक किंवा कुठल्यातरी माणसाचे मत अशी आहेत आणि विकिपीडियावर उपयोगाची नाहीत. काही उदाहरणे:
  1. सावरकरांचा पोवाडा - हे सावरकरांचे मत आहे विकिपीडियावर याची गरज नाही:
  2. "रिटिश पत्रे देखील विश्वासरावाला "Most handsom among marathas" असे म्हणतात." - या लेखात याची काय गरज?.
  3. "आधीच ब्राह्मण, त्यात पुणेकर, त्यातहि कोकणस्थासी धरा। यांनी गोरा ठार मारीला कोणाला तरी कैद करा॥" - हे प्रक्षोभक आहे.
मी इतिहासावरील तज्ञ नाही हे मान्य करतो त्यामुळे तुम्ही दिलेले लोकांच्या लिखाणातील quotes (वेचे?) हे किती मुख्यप्रवाहातील इतिहासकारांना मान्य आहेत त्या मतांचा "peer review" झाला आहे का याबद्दल मला शंका आहे.
कोल्हापुरी ०६:५९, २६ मे २००९ (UTC)



सावरकरांचा पोवाडा - हे सावरकरांचे मत आहे विकिपीडियावर याची गरज नाही: "रिटिश पत्रे देखील विश्वासरावाला "Most handsom among marathas" असे म्हणतात." - या लेखात याची काय गरज?. "आधीच ब्राह्मण, त्यात पुणेकर, त्यातहि कोकणस्थासी धरा। यांनी गोरा ठार मारीला कोणाला तरी कैद करा॥" - हे प्रक्षोभक आहे. मी इतिहासावरील तज्ञ नाही हे मान्य करतो त्यामुळे तुम्ही दिलेले लोकांच्या लिखाणातील quotes (वेचे?) हे किती मुख्यप्रवाहातील इतिहासकारांना मान्य आहेत त्या मतांचा "peer review" झाला आहे का याबद्दल मला शंका आहे.


१)सावरकरांनी अटके वरील विजयाचे हे वर्णन केले आहे. मुळ लेखात मला त्याची गरज वाटली म्हणुन ते तिथे आहे. गरज नसेल तर इथुन ते काढता येईल. मात्र पेशवे आणि अटक हे न तुटणारं समिकरण आहे. त्यानंतरचे मी पाकिस्तानचे उल्लेख इथुन लगोलग काढले आहेत. २)ज्याला तुम्हि प्रक्षोभक म्हणताय ते "मित्रमेळा" या तत्कालिन संघटनेतील गाजलेल्या गीतांमध्ये/पोवाड्यांत नेहमी गायले जायचे. आणि त्यात शब्दाचीहि अतिशयोक्ती नाहिये(श्री मोरे -श्री वाळिंबे दोघांच्याहि पुस्तकात हे अस्सेच उल्लेख आहेत). ब्रिटिशांना चित्पावन हे अतिशय घातक वाटत. मी लेखात खाली चित्पावनां बद्दल त्यांना काय वाटत हे नमुद केलय हि माणसं तत्कालिन व्यवस्थेतील सरकारी उच्चपदस्थ अथवा चिरोलीन सारखे नावाजलेले लेखक होते. या लोकांचे लिखाण हि तत्कालिन सामाजिक परीस्थिती स्पष्टपणे दर्शवते. त्याच इंडियन अनरेस्ट मध्ये चिरोलीन ने इतरांबाबत लिहिताना इतकी आगपाखड केलीच नव्हती. टिळक व चित्पावनांवर बदनामीकारक मजकुर लिहिला म्हणुन तर टिळक व चिरोलिनी यांचा खटाला चालला होता. चित्पावनांबद्दल तत्कालिन मते काय होती हे मी यात मांडले आहे. यात मला प्रक्षोभक न वाटता तत्कालिन परीस्थिती काय होती हे सांगायचे आहे. आणि या लोकांची मते ग्राह्य धरावी का? हा प्रश्न असेल तर मग ग्रॅंड डफ देखील मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणावा का याचा विचार करावा लागेल.


विश्वासरावाच्या वर्णना बाबत म्हणाल तर ते काढलत तरी माझं काही म्हणणं नाहिये. विकिपिडिया वरील लेखात याची गरज नाहि हे मला मान्य.

संदर्भां संदर्भात[संपादन]

सौरभ,निश्चितच तुम्ही विषयाचा अभ्यास केला आहे हे जणवते. शक्य तीथे तीथे संदर्भ द्या. अगदी इथे चर्चा पानावर जशा अडचणी मांडत आहात तसे करा.अभय नातू म्हणतात त्या प्रमाणे इतर सदस्य लेखाचे विकिकरण करण्यात सहकार्य करतील. अर्थत वर लावलेल्या सुचनांप्रमाणे विकिपीडिया लेखन शैली आमलात आणताना तुम्ही सुरवाती पेक्षा लेख काही काळा नंतर एकदम वेगळा दिसला तर आश्चर्य नाही.

अगदी प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी संदर्भ हवा असे लिहिले ती थेसुद्धा प्रत्येक वेळी संदर्भ हवाच असे नाही. तुम्ही इतरत्र एक पुस्तक लिहीले असते आणि तुमच्या स्वत: शिवाय इतर संपादकाने तुमच्या पुस्तकातील संदर्भ देत येथे भर घातली असती तर कदाचित तुमची बरीचशी मतेसुद्धा सहज विरघळून गेली असती.
माझा स्वत:चासुद्धा इंग्रजी विकिपीडिया वर लिहीलेला पहीला लेख अवघ्या दहा मिनीटात "मूळ लेखन संपादकाची स्वत:ची मते " हे कारण देऊन वगळला गेला होता आणि मला भारी वाईट वाटले होते. तुम्हाला तुमचा लेख जसाच्या तसा सध्या विकिबूक्स वर ठेवण्याचा पर्याय आहे. माराठी विकिपीडियात मात्र या लेखाची खूप काटणी आणि पुर्नलेखन होत जाण्याची शक्यता आहे.आणि बर्‍याच मांडळींना यात संपादन करण्यात रस असणार आहे.
Mahitgar ०५:५४, २६ मे २००९ (UTC)

पहिली गोष्ट, मला तुम्हि-तुम्हि करु नका हो कालच् तर कुठे गध्देपंचविशी सुरू झालीये [:p]. असो, तर् मुद्दा असा आहे कि लेख् जसाच्या तसा राहिलाच् पाहिजे असा माझा हट्ट नाहिच्(आणि इथे करुहि शकत् नाहि). मुळ् लेख् अजुन् भरपुर् मोठ्ठा आहे पण् त्यात् खरोखर् चित्पावनांवर् मी वैयक्तीक् मते मांडली आहेत् म्हणुन् तो भाग् इथे कधीच् घेतला नाहि. राहता राहिला ह्या लेखाचा प्रश्न् तर् 'संदर्भ् हवेत्' असे लिहिल्या ठिकाणी मी अमुक् एक् पुस्तक् वाचले/भाषण् ऐकले/स्वतः अनुभवले हे कसे सांगु? शिवाय् प्रत्येक् ठिकाणी सांगावे लागेल् का?

या खेरीज् अजुन् ढिगाने माहिती द्यावी लागेल् - चित्पावनांची आडनावे, १४ गोत्रे, कुलदैवते/देवता, चित्पावनांतील् नोंद् घ्याव्यात् अश्या अनेक् क्षेत्रांतील् नामवंत व्यक्ती. आणि अजुन् बरेच् काही ते सर्वात् शेवटि बसवावे लागेल् त्यासाठी मात्र किमान् एका हाताच्या बोटावर् मोजता येतिल् इतके इंटरनेट् वरील् दुवे सहज् कोणालाहि मिळतील्.




"बाळाजी विश्वनाथाच्या इतिहासापासून आपल्याला चित्पावनांच्या इतिहासाची ठळक नोंद मिळते. महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष[ संदर्भ हवा ]. " -

हे आणि थोरल्या बाजीरावांना पेशवेपद् मिळतानाचा भाग्, बाळाजींची मुद्रा, श्री (प्रमोद् ?)ओक यांच्या "पेशवाईचा इतिहास्" या पुस्तकात् मिळतील्. पेशव्यांची वंशावळच् दिली आहे त्यात्.


'संदर्भ हवा' असे लिहिलेल्या ठिकाणी मी काय् करु शकतो किंवा तो कसा देऊ शकतो? हे सांगितलेत् तर् बर्च्हसे संदर्भ् मी परस्पर् देऊ शकेन्. इथे सारखे सारखे काप-च्हिकट्आवा उत्तर् द्या हा प्रकार् करावा लागणार् नाहि. मी विकीपेडियावर तसा नवा असल्याने पुस्तकांचे संदर्भ् तिथल्या तिथे कसे द्यावेत् ह्या बाबत् हा पामर् अजाण् आहे. मार्गदर्शन् व्हावे.


सौरभ चविकिपीडियाचा पहिला नियम बिनधास्त लेखन करा असा आहे तेव्हा लिहा आणि मोकळे व्हा.तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चित्पावन सर्वत्रपुढे आहेत.अगदी मराठी विकिपीडियातसुद्धा पण... पण असे म्हणालो तर त्यांना वाईट वाटेल कारण त्यांच्या पैकी खरेच स्वतःच्या जात धर्म भाषा या पुढे जाऊन संपादने करतात त्यांची भूमीका प्रांजळ वैश्विकतेची आहे. त्यामुळे इथे जातीवार मतमोजणी केलीतर त्यांची संख्या पन्नस टक्के तरी भरेल. तुमच्याशी वाद घालणारेही चित्पावनच पहिले असणार आहेत या बद्दल मी चित्पावन नसूनही पूर्ण विश्वास आहे.

आम्ही चिरत्पावन नसलेले दूर उभे आहोत. तुम्ही लेखन् आणि वाद करा आम्ही कपडे सांभाळतो :) Mahitgar ०६:२१, २६ मे २००९ (UTC)


- ? अहो पण मी कुठे इथे जाती वरुन भांडणे उकरुन काढतोय??????????? मी पेशवे चित्पावनांबद्द्ल या करता लिहितोय कारण गेली दिड वर्ष मी हा अभ्यास करतोय अजून तर सुरुवात आहे. ज्या गोष्टि आपल्याला समजतात त्यातच मी लिहितो आहे. मी इथे कुणालाहि जातीवरुन दुखावल्याचे मला आठवत नाहि. किंवा दुसर्‍या जातीला कमी लेखण्यासाठी हा लेख मुळीच इथे दिला नाहिये. विकिपिडिया मराठीत पेशवे - चित्पावन यांच्यावर सलग माहिती नव्हती जी माझ्याकडे एकगठ्ठा होती ती मी इथे टाकली इतकच. मी परत सांगतोय विकिपिडियाचे काम कसे चालते, त्याची पध्दत काय हे मला नीट माहित नाहिये माझी पहिलीच वेळ आहे. मला मार्गदर्शन करा. वर मी संदर्भ दिले आहेत ते त्या-त्या जागी कसे पेरावे हे मला सोदाहरण ४-५ ठिकाणी दाखवा पुढे जमेल तसे मी करत जाईन. कुठे अडलं तर विचारीन. तुंम्हाला काही वाक्ये खटकली असतील तर त्याचा खुलासा मागा, पटाला तर ठिक नाहितर भाष बदलु तरी न होण्यागत असेल तर काढुन टाकु.

तसे तर मला शिवछत्रपतींबाबत देखील लिहायला आवडेल. त्यांच्या आठ राण्यां व त्यांचे माहेर या बाबत प्रत्येकि किमान २-३ ओळींची तरी माहिती आहे. त्यांचे विवाह शिवछत्रपतींशी कधी झाले त्याची निदान वर्षे तरी आहेत. संदर्भ देखील देऊ शकतो. सध्या या लेखावर जोर याचकरिता कि हा लेख मीच लिहिलाय, माहिती बरीच आहे आणि संदर्भ मलाच माहिती आहेत (निदान सध्यातरी).

संदर्भ व नोंदी आतंर जालावर उपलब्ध[संपादन]

  • (एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने "मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे.) [१]
  • कोकण प्रदेशाची निर्मिती श्रीपरशुरामाने केली व तेव्हापासून महाराष्ट्रीय ब्राह्मणांत देशस्थ व कोकणस्थ असे दोन भाग पडले. श्रीपरशुरामाने स्वतःच्या सारस्वत देशातील सारस्वत ब्राह्मण यज्ञासाठी आपल्याबरोबर आणले. हे मूळचे कोकणवासी, म्हणून कोकणस्थ ब्राह्मण. ‘सारस्वतादागता ये कोकणस्थाः प्रकीर्तिताः!‘ त्यानंतर मागाहून त्याने यज्ञाकरिता पुरेसे ब्राह्मण मिळेनात म्हणून फुटलेल्या जहाजांतून आलेल्या प्रेतांना जिवंत करून ब्राह्मण धर्माची दीक्षा दिली व त्यांची चिपळूण येथे वस्ती केली. या ब्राह्मणांना चित्पावन म्हणतात. चिपळूण कोकणात आहे, म्हणून हेसुद्धा कोकणस्थ ब्राह्मण. [२]
  • आम्ही चित्पावन Author: म. श्री. दीक्षीत नीलकंठ प्रकाशन [३]
  • दंतकथा:परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करून घेतले, या दंतकथेची संगती ते लावतात. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे.[४]
  • [५]
  • [६]
  • [७]
  • [८]
  • [९]
  • [१०]
  • [११]
  • [१२]
  • [१३]


  1. ^ http://www.dainikgomantak.com/Gomantak/03092009/NT000844EA.htm [मृत दुवा] गूगल् कॅश आहे. 11 Mar 2009 05:42:30 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  2. ^ ही Google च्या http://www.loksatta.com/daily/20060514/lm08.htm ची कॅश आहे. 20 Apr 2009 14:17:13 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल
  3. ^ आम्ही चित्पावन Author: म. श्री. दीक्षीत नीलकंठ प्रकाशन
  4. ^ ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathi ची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल
  5. ^ Insert reference material
  6. ^ Insert reference material
  7. ^ Insert reference material
  8. ^ Insert reference material
  9. ^ Insert reference material
  10. ^ Insert reference material
  11. ^ Insert reference material
  12. ^ Insert reference material
  13. ^ Insert reference material

चित्पावनांचे संघपरिवारीय राजकारणातील स्थान[संपादन]

पण हिंदुत्ववादी संघटनांमध्ये 'संघ परिवार' मोठा आहे व या संघटनेत अनेक चित्पावन आहेत. पण माझे निरीक्षण असे आहे की, या परिवारात चित्पावनांना नेतृत्व दिले जात नाही. या परिवारात देशस्थ अथवा कर्‍हाडे यांना नेतृत्व दिले जाते. उदाहरण म्हणजे, महाराष्ट्रत प्रमोद महाजन, पुण्यात प्रकाश जावडेकर व माजी खासदार अण्णा जोशी व नागपूर विदर्भात नितीन गडकरी, पण दुर्दैवाने संघ- परिवारातील चित्पावनांना आपण डावलले जातो व आपल्याला जास्त पुढे येऊ दिले जात नाही, हे राजकारण लक्षातच येत नाही!

चित्पावनांची नवी पिढी राजकारणापासून दूर असताना त्यांना राजकारणात स्थान नाही अशा प्रकारचे कोणतेही विधान खोडसाळपणाचे आणि विवाद्य नाही काय? Mahitgar ११:५३, २६ मे २००९ (UTC)

संघपरिवाराला जातिय चौकटीत बसवणे हा निव्वळ मुर्खपणा आहे. तसा प्रयत्न करू नये.


^^^^^^ बरोबर, संघ न समजलेल्यांना असे वाटते. मी स्वत: संघिष्ट नसलो तरी संघ असे करतो असे मला कधीच वाटले नाहि. तरी सरसंघचालक मोहनजी भागवत, अशोकराव मोडक(आमदार), संजयजी केळकर(आमदार) हि नावे वानगी दाखल घेता येतील. सुधीर फडके(बाबुजी) व नुकतेच जे संघाचा मोठा कार्यक्रम झाला त्याच्या अध्यक्षपदि श्रीधर फडके होते हेहि विसरुन चालणार नाहि. अजून काही नावे सहज मिळतील. संघात बौध्दिक नावाचा प्रकार असतो, "कोणीहि" असाच उठुन बौध्दिक घेत नाहि. सुधीर फडके, श्रीधर फडके हे संघात मोठ्या कार्यक्रमात बौध्दिक घेत/घेतात. अधिक सांगणे न लगे.

Origins and genetics इंग्रजी विकिपीडियातून भाषांतराकरिता[संपादन]

यूओपिय वैद्न्यानिकांनी ब्राम्हणांच्या विवीध गटांबद्दल जे अभ्यास केले त्यात, अनुमानांच्या अपेक्षे प्रमाणे कोकणस्थ ब्राम्हणांचे, वाय गूणसूत्र परिक्षणांवरून इतर ब्राम्हणी गटांपेक्षा वेगळे आणि दक्षीण यूरोपियायी लोकांच्या,प्रामूख्याने फ्रेंच,इटाल्लीयन,ग्रीक,लयबेरियन, आणि आयरिश गूणसूत्रांशी जवळीक दर्शवणारे आढळले.कोकणस्थ ब्राम्हणातल्या प्रमाणे अजूनही अंशतः दक्षीण इंग्लंडात बरेच जण मूळ आयरिश आणि फ्रेंच वाय हेप्लोग्रूप गूणसूत्रांचे आढळतात. कोकणच्या सगरी किनार्^यावर प्रथमतः पोहोचणारे गोरे,उत्तम तब्येतीचे, मध्यम बांध्याचे, सौम्य ब्राऊन ते लाल केसांचे आणि घार्^या अथवा हिरव्या डोळ्यांचे असावेत, कि जसे कोकणस्थ ब्राम्हणांच्या वंशजात आजही आढळतात.

अलिकडील अभ्यास (किविसिल्ड एट अल २००३,गयकवाड एट अल २००५), पोर्तूगी़अ आणि फ्रेंचांनी भारतातील काहीभागावर राज्य केल्यापसून चित्पावनांच्या यूरोपिय मूळाबद्दल शंका उपस्थित केली जात असे तरिपण चित्पावनात इतर वैवीध्य पूर्ण गूणसूत्रांचाही प्रभावा अढळतो.

(Sahoo et al. 2006)नुसार चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बर्‍याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा् हेप्लोग्रूप उत्तर भारतीयातसुद्धा सामन्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्रचीन पूर्वजांचे एक समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे.

मिडल इस्टर्न ओरिजीनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बर्‍याच उच्चजातीय भारतीयात आढळतो. (Sahoo et al. 2006).अनुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रूपांचे प्प्राबल्यांने अस्तीत्व जाणवतेजे की मूळचे भारतीय समजले जातात आणि पस्चिम आणि दक्षीण भारतात आढळतात.

त्यामूळे उपलब्ष पुराव्यावरून उपरोल्लेखीत वर्णीय वैशिष्ट्ये आईच्या बाजूनेआल्याची जास्त शक्यता आहे.

Much to speculation, many scientists from Europe conducted Y DNA tests from various communities connected to these set of Brahmins and found that, the Y Chromosome was rare, found only in Konkanastha Brahmins and it directly matched DNA prominent among Southern Europeans. Particularly, the French, Greeks, Italians, Iberian people and the Irish. To a lesser extent in Southern England. Many still carry the original Y DNA Haplogroup type in Ireland and France. Not to forget the Konkanastha Brahmins. It is noted that, the first to arrive on the Coast of this region, must have been Fair to medium height, well built with light brown to red hair and possessed Greyish to Green eyes, which is still found in many descendants of the first visitors.


Recent studies (Kivisild et al. 2003, Gaikwad et al. 2005) on the genetics of Konkanasta Brahmins have been quite surprising. While it is claimed that Chitpavans have European origins, from the time when the Portuguese and the French ruled parts of India, it also appears that the Chitpavans are a group of people with diverse genetic origins.

बाकी भारतीयांची मॅटरनल म्हणजे आईच्या बाजूची आजोळी गुणसूत्रे एकमेव मॅक्रो हॅप्लो ग्रूप M (mt-DNA) त मोडतात तर चित्पावनांची मॅटरनल म्हणजे आईच्या बाजूची आजोळी गुणसूत्रे (Kivisild et al. 2003, Gaikwad et al. 2005) अनुसार इतर मध्य आणि विवीध यूरोपिय mt-DNA विशेषत:U (mt-DNA), H (mt-DNA), HV (mt-DNA), X (mt-DNA), R* (mt-DNA), आणि N1 (mt-DNA) शी नाते सांगणारे आहेत.

The origins on the maternal side (mt-DNA) are equally surprisingसाचा:Who. Unlike most other Indians whose maternal origins can be almost exclusively traced to the single macro-haplogroup M (mt-DNA), studies (Kivisild et al. 2003, Gaikwad et al. 2005) indicate that the Chitpavan gene-pool shows the presence of various other Central Asian and European mt-DNA haplogroups, in particular, the U (mt-DNA), H (mt-DNA), HV (mt-DNA), X (mt-DNA), R* (mt-DNA), and N1 (mt-DNA) haplgroups.


On the paternal side (Y-DNA), R1a (Y-DNA) is the most frequently found haplogroup. Incidentally, this haplogroup is also commonly found amongst North Indians (Sahoo et al. 2006), Central Asians, and East Europeans. The presence of a deep common ancestry between these regions remains a puzzle to this day. Haplogroup J2 (Y-DNA) is another frequently found haplogroup considered to be of Middle-Eastern origins and found in a lot of higher-caste Indians. There is also a significant presence of Haplogroups R2 (Y-DNA), L (Y-DNA), and H1 (Y-DNA) which are believed to be of Indian origin and dominantly found in Western and South Indians (Sahoo et al. 2006).

Based on the current evidence therefore, it does seem then that the aforementioned racial characteristics can be most likely traced to their maternal side.

'दहशतवाद या भागावर माझा आक्षेप[संपादन]

"लिन्दा कॉकस अमेरिकेतील विद्यर्थिनी 'चित्पावन' या विषयावर एक प्रबंधम्हणतात, 'चित्पावनांचा सनदशीर मार्गाने राजकीय उद्योग चालू होताच, परंतु दुसराही राजकीय उद्योग चालू होता तो म्हणजे 'दहशतवाद.' चाफेकरबंधूंनी रॅन्डचा काटा काढला व नथुराम गोडसे हा बहुधा शेवटचा दहशतवादी असावा."

या भागावर माझा आक्षेप आहे मुळात "दहशतवाद" याची व्याख्या करणे कठिण आहे. त्यातुन चाफेकर बंधु हे खचित आतंकवादि नव्हते. हे वाक्य काढुन टाकावे. आणि नथुराम गोडसे हा शेवटचा दहशतवादि असावा(मुळात ते दहशतवादि नव्हते हे माझे मत आहे, पण चर्चा करण्याची हि जागा नव्हे) या वाक्याचा अर्थ इंग्रजांना विरोध करणारे वासुदेव बळवंत फडके यांच्यापासुन ते सावरकर, कान्हेरे वगैरे सगळे दहशतवादि होते हे आपणाहुन मान्य करण्यासारखे आहे.

लिंडा कॉक्सच्या संपुर्ण लेखातुन हाच भाग घ्यावासा का वाटतो?

मला वाटते तिच्या मूळ इंग्रजी लेखातून दिक्षीतांनी भांषांतर करवून घेतानाही कदाचीत चूक झाली असेल कदाचित अनुवादकाल नेमका शब्द आठवला नसेल असे शक्य आहे.नेमका हा उल्लेख दिक्षीतांच्या पुस्तकातून सहस्त्रबुद्धे नावाच्या लेखकांनीइतरत्र घेतेला आणि तो आंतरजालावर इतरत्र उपलब्ध आहे.हा मूळ इंग्रजी लेख कोकणस्थ डॉटकॉम वरसुद्धा आहे त्यात टेररीस्ट हाच शब्द वापरलेला दिसतो.
दहशतवाद हा शब्द बदलून जहालवाद असा शब्द वापरण्यास माझी हरकत नाही किंवा या जहालवादास तुम्हाला अजून काही दूसरा पर्यायी शब्द सुचतो काय ते पहावे

Mahitgar १५:४६, २७ मे २००९ (UTC)

दहशतवादी शब्दाचे समर्थन किंवा विरोध न करता एक नोंद करावीशी वाटते --
One man's terrorist is another man's freedom fighter.
अभय नातू १५:५२, २७ मे २००९ (UTC)

उजवे-डावे-कॉंग्रेसी[संपादन]

या खेरीज राजकारणातील चित्पावनांचा सहभाग यात उजवे-डावे-कॉंग्रेसी असा भेद करु नते असे मला वाटते. त्याने उगीच संशोधन/संदर्भ शोधण्याची गरज पडेल, त्यातुन वैचारीक कारणांनी पार्टि/संघटना बदलणारे, कधीकाळी सावरकरांचे विरोधक नंतर कट्टर सावरकर अनुयायी झाल्याची उदाहरणे आहेत तशी विरुध्दहि आहेत. अश्या परीस्थितीत काय करायचे? नपेक्षा सरळसोट यादि देणे बरे आणि सोपे.

तसेही विकिपीडियात स्वरूप लेखनाचे हवे यामूळे अधीक माहिती मीळून अधीक भरीव लेखन होईल. ज्यांनी भूमीका बदलल्या त्यांची माहिती इतरही विकि संपादक भरत जातील तसेच संदर्भ आणि संशोधनही कालपरत्वे होत जाईल. संदर्भांसहीत लेखन करणे अपेक्षीत आहे पण त्याची फारही धास्ती घेऊनये

सौरभ अजून एक विनंती[संपादन]

सौरभ, संपादनात विभाग बदलताना /तयार करताना ==सौरभ अजून एक विनंती== असे लिहावे केवळ ==== किंवा -------- चा उपयोग टाळावा.इतर संपादकांची गैरसोय होते. तसेच सही करताना ~~~~ चार लहर चिन्हे द्यावीत सदस्य नावाने प्रवेश केला असल्यास तुमचे नावा आपोआप उमटते. Mahitgar १३:३९, २७ मे २००९ (UTC)

संपादन जतन होण्यास वेळ लागत आहे[संपादन]

लेखाची लांबी वेगाने वाढत आहे यात अजूनही मजकूर भरावयाचा आहे.इतर विकिसदस्यांनी या लेखातून इतर लेखात हलवण्यासारखअ मजकूर इतर लेखात हलवण्यास लौकरात लौकर सहकार्य करावे हि नम्र विनंती

Mahitgar १५:१२, २७ मे २००९ (UTC)


वेदोक्त प्रकरण[संपादन]

माझ्याकडे या प्रकरणावर एक मोठ्ठा लेख आहे. मात्र तो मला इंटरनेटवरच मिळालाय. त्याचा मुळ लेखक/लेखिका कोण हे मला मुळिच माहिती नाहि. तो मी इथे वेदोक्त प्रकरणात टाकु का? शिवाय त्यात वेदोक्त प्रकरणात लोकमान्य टिळकांवर किती निरर्थक ताशेरे ओढले जातात हेहि आपल्याला त्यावरुन समजेल. त्या खेरीज मला शक्य झाल्यास ब्राह्मणेतर चळवळीविषयी लिहिन. श्री सदानंद मोरे यांच्या "लोकमान्य ते महात्मा - खंड १" मध्ये या दोन्हि गोष्टि अतिशय खोलात जाऊन मांडल्या आहेत. म्हणजे शाहु छत्रपतींनी एकदा रागावुन "टिळक जर्मनीत असते तर त्यांना गोळ्या घातल्या असत्या!" असेहि म्हंटले आहे पण तेच शाहु छत्रपती, टिळक आजारी पडल्यावर "आपण आरामासाठी अमुक एका ठिकाणी(मला ठिकाण आठवत नाहिये पण पन्हाळाच असावा) जावे मी आपली सगळी व्यवस्था करतो!" असेहि म्हणाताना दिसतात, बरोबरच टिळक गेल्याची बातमी आली तेव्हा शाहु छत्रपती जेवायला बसले होते त्यांनी घास तसाच खाली ठेवला आणि म्हणाले "इंग्रजांशी असा लढणारा परत होणार नाहि!" अन्नाला नमस्कार करून ते पानावरुन उठले. अश्या अनेक हृद्य आठवणी या वेदोक्त सारख्या घटनांच्या आजुबाजुनी सापडतील. त्यातच ताई महाराज प्रकरणाहि येते आणि क्षात्रजगद्गुरु प्रकरण ज्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीत फुट पडली ते देखील येते.

सौरभ वैशंपायन १२:३८, २८ मे २००९ (UTC)सौरभ

मला वाटते कुणी ब्राम्हणेतर चळवळ आणि वेदोक्त प्रकरणावर वेगळ्या लेखात लेखन केले तर बरे होईल.ब्राम्हणेतरांना या प्रकरणाची कल्पना असते तीत्यांच्या समोर ठेवअले गेलेल्या बाजूची.पण मराठी ब्राम्हण समाजासच या वेदोक्त प्रकरणाबद्दल पुरेशी कल्पना नसते.पण असा कोणताही लेख विकिवर बॅलन्स करताना प्रत्येकालाच विरोधी मत ऐकुन घेणे भाग पडेल हा विचार मनात ठेवूनच या प्रकरणाला हात घाला. या लेखात नकोते वगळणे सोपे आहे. वेदोक्त प्रकरणावरील लेखाबद्दल मात्र मनाची तयारी आत्ता पासुनच असूद्यात याचा अर्थ मला वाद घालावयाचा असे नाहि तर ते अटळ मला आत्ता पासून दिसते आहे एवढेच.

Mahitgar १६:३०, २८ मे २००९ (UTC)

दहशतवाद[संपादन]

"दहशतवादी शब्दाचे समर्थन किंवा विरोध न करता एक नोंद करावीशी वाटते -- One man's terrorist is another man's freedom fighter. "


इतक्याने भागत नाहि, भगतसिंग-मदनलाल धिंग्रा यांनी निष्पाप लोकांचा जीव कधीच घेतला नाहि किंवा उठसुठ रक्तपात केला नाहि. दहशतवाद म्हणजे काय हे काश्मीर, माओवादि, यांकडून समजते. व्हिएतनाम मध्ये अमेरीकनांनी केले त्याला दहशतवाद म्हणातात. जनरल डायरने जालियनवालात केला तो दहशतवाद होता, इतकेच कशाला गांधी हत्या झाल्यावर "अहिंसावाद्यांनी" महाराष्ट्रात सरळसोट ब्राह्मणांची घरे जाळली तो दहशतवाद होता, इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर एका रात्रीत ४०० शीख मारले गेले तो दहशतवाद होता असेच म्हणावे लागेल. केवळ तत्कालिन प्रतिक्रिया असे म्हणुन सोडुन देणार असाल तर गांधीहत्या देखील फाळणी आणि पंचवन्न कोटिंच्या कारणाने झालेली तत्कलिन प्रतिक्रीया होती असेच म्हणावे लागेल आणि वरुन मग नथुराम गोडसेंबाबत असेहि म्हणावे लागेल कि निदान त्यानी मोठ्याप्रमाणावर नरसंहार केला नाहि ना कोणाची घरे दारे उजाडली.


दहशतवाद व स्वातंत्र्ययुध्द यात पुसटशी रेखा आहे पण ती आपल्याला ओळखता येते. आपणच आपल्या पुर्वजांना दहशतवादि म्हणणार असु किंवा लिंडा कॉक्स च्या आडुन अप्रत्यक्ष पणे ते मान्य करणार असु तर येणार्‍या पिढ्यांनी काय शिकावे? इथे येऊन "अरे? चापेकर बंधु, सावरकर बंधु, वासुदेव बळावंत फडके, नंत कान्हेरे हे दहशतवादि होते कि काय?" असा विचारहि त्यांच्या मनाला शिवु नये असे मला वाटते आहे. तो भाग आवश्य वगळावा. असा माझा आग्रह आहे.

सौरभ वैशंपायन १२:५३, २८ मे २००९ (UTC) सौरभ

इतक्याने भागत नाहि, भगतसिंग-मदनलाल धिंग्रा यांनी निष्पाप लोकांचा जीव कधीच घेतला नाहि किंवा उठसुठ रक्तपात केला नाहि.
लोकमान्य (सरकारमान्य नव्हे, पण दोन्ही एकच असू शकतात) न्यायालयाने दोषी ठरवण्याआधी आपणच एखाद्याला दोषी ठरवून शिक्षा (शारीरिक, आर्थिक किंवा इतर) देणे हा त्या क्षणी अराजकतावादच ठरतो. त्यात शिक्षा म्हणून शारीरिक इजा (किंवा मृत्युदंड) दिल्यास तो दहशतवादच ठरतो. कालांतराने जेव्हा सगळे पुरावे उजेडात येतात तेव्हा या घटना दहशतवाद नव्हत्या असे रिट्रोऍक्टिव्हली समर्थन करता येते(किंवा त्यांना निर्दोषही ठरवता येते), पण त्या क्षणी तो दहशतवादच. जो पर्यंत आपण रुल ऑफ लॉ या तत्त्वाने समाजकारण करतो, तोपर्यंत हे अबाधित सत्य राहणार आहे. प्रत्येकाने (किंवा एखाद्या गटाने) आपापली न्यायालये चालवून शिक्षा देणे व अमलां आणणे हा रुल ऑफ लॉ नसून रुल ऑफ मॅन होतो.
भगतसिंग, धिंग्रा, इ. यांचे वागणे आता पूर्णतः समर्थनीय वाटते, पण त्यावेळी रुल ऑफ लॉ तत्त्वानुसार तो दहशतवादच होता. गोडसे, इ.ना अजूनही कायद्याने दोषमुक्त केलेले नाही, तरी ते दहशतवादीच (जरी मला, तुम्हाला, दहा कोटी इतरांना वेगळे वाटत असले तरीही...आणि मी म्हणल्याप्रमाणे मी त्यांचे समर्थनही करीत नाही कि त्यांनी दोषीही धरत नाही). नाही तर रणवीर सेना, नक्षले, प्रभाकरन, यांनाही दहशतवादी म्हणता येणार नाही, कारण त्यांच्यामते ते फक्त दोषी लोकांना (व त्यांच्या कार्याच्या आड येणार्‍या) लोकांनाच मारतात. मग वासुदेव बळवंत फडक्यांना काय म्हणणार? त्यांनी तर कोणत्याही युरोपीय माणसाला ठार मारल्यास इनाम जाहीर केले होते. ते दहशतवादी? सांगण्याचा उद्देश हाच की एका व्यक्ती (किंवा गटाला) त्यांचा त्राता वाटणारी व्यक्ती दुसर्‍याला दहशतवादी किंवा राक्षसी वाटू शकते (राक्षस, असुर या शब्दांमागेही गंमत आहे..पण त्यासाठी वेगळी चर्चा :-])
आपणच आपल्या पुर्वजांना दहशतवादि म्हणणार असु किंवा लिंडा कॉक्स च्या आडुन अप्रत्यक्ष पणे ते मान्य करणार असु तर येणार्‍या पिढ्यांनी काय शिकावे?
आपण आपल्या पूर्वजांना त्यांच्या कार्यानुसार, त्याच्या परिणामांनुसार, आत्ताच्या कायद्या/परिस्थितीनुसार (आणि आपल्या बुद्धीनुसार) काय ते ठरवू. त्यांचा नुसताच उदोउदो करणार असू तर त्यातून आपण आपल्या पुढच्या पिढ्यांचे नुकसान करीत आहोत. जर याबाबतीत सारासारविवेकबुद्धी सोडली तर मग उपयोग काय? जसे शिवाजी महाराज आपले पूर्वज, तसे चंद्रराव मोरे, गणोजी शिर्के आणि आनंदीबाई पेशवेही आपले पूर्वजच की!! आणि लिंडा कॉक्सबद्दल म्हणलात तर..कावळ्याच्या शापाने....!! आपण इतके असुरक्षित आहोत की कोणीही सोम्यागोम्याने काहीही लिहिल्यास त्याचे प्रत्येक वेळी व ठिकाणी खंडन केलेच पाहिजे?
इथे येऊन "अरे? चापेकर बंधु, सावरकर बंधु, वासुदेव बळावंत फडके, नंत कान्हेरे हे दहशतवादि होते कि काय?" असा विचारहि त्यांच्या मनाला शिवु नये असे मला वाटते आहे.
येथे (विकिपीडियावर) येउन त्यांना सत्य (फॅक्ट्स) कळावे व त्यातून त्यांनी आपलाआपण अर्थबोध करून घ्यावा हाच विकिपीडियाचा खटाटोप आहे. विकिपीडियावर दृष्टिकोनात्मक (POV'ed) मजकूर ग्राह्य नाही. त्यानुसार - गोडसेनी गांधींचा खून केला. त्यामागे त्यांनी ही कारणे दिली. असे लिहिणे बरोबर, नव्हे स्वागतार्ह. पण गोडसे कसे बरोबर किंवा कसे चूक यांपैकी कोणतेच लिहिणे बरोबर नाही.
तो भाग आवश्य वगळावा. असा माझा आग्रह आहे.
भाग वगळू नये तर सत्यकथनांरुपी लिहावा, असा माझा आग्रह.
असो, चर्चा वेगळ्याच रुळांवर चढली आहे.
क.लो.अ.
अभय नातू १४:२१, २८ मे २००९ (UTC)
हा विभाग काढण्याब्द्दल माझा विरोध नाही,मी लिंडा कॉक्सच्या मताचे समर्थनही करत नाही परंतु मला जेव्हा आंतरजालावर इतरत्र चित्पावन मंडळीच त्याचा उल्लेख करतात(कारण सर्व साधारण सर्वांना चित्पावनांचा एक मोठावर्ग जहाल मतांचा पाठीराखा होता आणि आजही आहे याची कल्पना असते,लिंडा कॉक्स फक्त संदर्भाकरिता वापरली जाते) कोकणस्थ डॉटकॉम वर इंग्रजीत हा लेख वाचून, तुमची आमेरिकन शाळेत शिकणारी शिकणारी मुले ह्याब्द्दल प्रश्न आपल्या आई वडीलांना विचारतील तेव्हा त्या आईवडीलांना किमान ही चर्चा वाचनासाठी उपलब्ध होईल. मराठी माध्यमात शिकणारी मुले/पिढी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल कोणताही गैर विचार दहा लिंडा कॉक्स आणल्यातरी करणार नाहीत.
आणि जेव्हा एखादा लेखक काही लिहीतो तेव्हा आम्ही त्याचे वैचारीक विश्लेषण करून विचारांचा विचारांनी विरोध करणार का. कि असे कोणी बोललेच नाही असे समजून रहाणार? लिंडा कॉक्सला तुम्ही भारतात नाही लिहू देणार पण बाकी जगभरातले पॉलीटिकल डिप्लोमॅट तिची बाजू नक्कीच ऐकून घेणार असतात केवळ तुम्ही तुमची बाजू किती सशक्त पणे मांडता त्यावर राजनिती चालते.

तुमच्यातल्या बाबासाहेब पुरंदरेंना अजून् बाकी जग बरच झेलायच आहे. हि विचारांची लस त्यांना दिलीत तर ते अधिक सशक्त होतील असे माझे प्रांजळ मत आहे. Mahitgar १६:२२, २८ मे २००९ (UTC)


माहितगार,
वरचे तुमचे लिखाण कोणाला उद्देशून होते ते कळले नाही. मला उद्देशून असले तर येतोच मी...जरा (शाब्दिक) तलवार परजून घेतो. :-)
अभय नातू १७:४१, २८ मे २००९ (UTC)
वरचे लेखन सौरभ वैशंपायन यांनाच उद्देशून् होते, ते तुम्हाला कुठे लागू पडले असेल तर क्षमस्व,कारण तुम्हाला लागू पडावी अशी वीशेष मेहनत घेतली नव्हती हे खरे.आमेरीकेत् शिकणार्या मुलां बद्दल लिहीताना खरे तर टिळक,चाफेकर,वा.ब.फडके यांचे वंशजसुद्धा आमेरीकन शाळात शिक्षण घेत असतील किंवा किंवा कधीतरी घेतील या शक्यतेच्या हिशेबानी लिहिले.

बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख सद्य घडामोडींना उल्लेखून आहे पण तो बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वतः बद्दल् नाही. Mahitgar १२:५७, २९ मे २००९ (UTC)

तुम्ही लिहिलेले मला लागू पडत नाही पण माझ्या लिखाणाखाली असल्याने शंका आली. आणि चर्चा करताना तुमचा मुद्दा अनुत्तरित राहू नये म्हणून विचारले. :-)
अभय नातू १४:१०, २९ मे २००९ (UTC)

पेशवाई भागाचे संदर्भ[संपादन]

यातला ८५% भाग दिक्षितांच्या पुस्तकात मिळतो(आणी इतिहासाचार्य राजवाड्यांच्याच लेखात हे सगळे उल्लेख असल्याचे स्मरते). चौल येथील रघुनाथ मनोहर यांचा उल्लेख विद्यावाचस्पती अभ्यंकरांच्या "भक्ती कोषातील" आहे, शक्य होईल तेव्हा मी त्यातला नेमका खंड देखील सांगिन. बाकि बांधकाम तज्ञ केळकर यांचा उल्लेख मुंबईचे इतिहासतज्ञ व नाणेतज्ञ श्री अप्पा परब यांच्या भाषणात आला होता मात्र ते भाषण इंटरनेटवर अथवा ध्वनित स्वरुपात नाहिये. त्याचे काय करता येईल.

या खेरीज आपण जेव्हा संदर्भ असे लिहुन [[ ]] खुण करता तिथे संदर्भ आकड्यांच्या स्वरुपात देउन खाली त्याच आकड्याला सविस्तर स्वरुपात कसे लिहावे हे समजत नाहिये कारण मला संदर्भासाठी दिलेले आकडे खाली संपादित करताना दिसत नाहित. दुसरी गोष्ट कि असे संदर्भ देताना जसे पेशवाई हा भाग लेखाच्या मध्ये आला आहे, व त्यातले संदर्भ हे दिक्षितांच्या पुस्तकात मिळतात तर १७-१८(? बरोबर ना?) हे आकडे त्याच पुस्तकासाठी वपरलेले दिसतात तर तेच आकडे इथे देता येतिल का? किंवा समजा आत्ता २३ पर्यंत संदर्भांचे आकडे आहेत पण पेशवाई मध्ये संदर्भ देताना तो भाग लेखाच्या मध्यभागी असल्याने १७-१८ हाच संदर्भ म्हण्ह द्यावा कि मधल भाग असुनहि २४-२५-२६ असे संदर्भ देत जावेत? क्रुपया मार्गदर्शन करावे.

सौरभ वैशंपायन १३:२४, २८ मे २००९ (UTC) सौरभ

लिखाणात संदर्भ देण्यासाठी असा द्यावा --
हा मजकूर आहे<ref>हा संदर्भ आहे. येथे नुसता मजकूर चालतो, किंवा URL (http://xyz.com/abc.html) पुस्तकातील/छापील संदर्भ देण्यासाठी cite book, cite journal, इ अनेक साचे आहेत. प्रत्येक साच्यावर त्यांचा उपयोग कसा करावा हे दिलेले आहे.</ref>
लेखाच्या शेवटी <references /> असे लिहिला असता सगळे संदर्भ तेथे दिसतात. अधिक माहिती/उदाहरणादाखल वासुदेव बळवंत फडके हा लेख पहावा. तरीही प्रश्न असल्यास येथे (किंवा चावडीवर) जरुर विचारावे.
अभय नातू १५:०६, २८ मे २००९ (UTC)


हे काय?[संपादन]

अहो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काय मध्येच? प्रकाश आंबेडकरांचा लावायचा होता का??? चुकुन टाकलाय का?

आणि असतील जावई, फोटो कशाला? मग किर्लोस्कर, गदिमा, नारळीकर व इतर जावयांनी काय घोडे मारलेय? त्यांचेहि टाका [:-p].

सौरभ वैशंपायन १४:५६, २९ मे २००९ (UTC)सौरभ

डॉ.बाबासाहेब आंबेडकरसुद्धा दुसर्‍या पत्नी सविता आंबेडकर यासुद्धा चित्पावन अशी माझी समजूत होती,आंतरजालावर नेमकी पुरेशी माहिती आढळली नाही त्या कदाचित सारस्वत ब्राम्हण असाव्यात असे दिसते.त्यामुळे सद्या तरी छायाचित्र काढले आहे.आज तीस ते चाळीस टक्के चित्पावन आंतर जातीय विवाह करताहेत असा माझा वैयक्तिक ग्रह आहे.तर कतृत्वान जावई आणि स्नूषांची छायाचित्रे असणे चित्पावनांना अभिमानास्पदच असेल असाही माझा (गोड) समज(गैर असेल तर माहित नाही) आहे.तरी इतर जावई आणि स्नूषांचे फोटोसुद्धा टाकावेत असा माझा आग्रह आहे.मी विकिमीडिया कॊमन्स वर जी प्रताधिकाररहीत छायाचित्रे सहज उपलब्ध होती ती टाकण्याचा प्रयत्न केला आहे. विनोबा भावे आणि सावरकर आणि नथुराम गोडसेंचीही छायाचित्रे टाकली आहेत.
या लेखास निश्चित पणे अजून असंख्य छायाचित्रांची आवश्यकता आहे

Mahitgar ०६:४०, ३० मे २००९ (UTC)

ह्या लेखाची जागा आणि विषयवस्तूची जागा बदलणे आवश्यक[संपादन]

हा लेख भारतातील जाती व्यवस्था अश्या स्वरुपाचे स्वतंत्र पान तयार करुन सर्वच जातींची जंत्री देऊन त्यातील एक जात कोकणस्थ अशी देणे मला गरजेचे वाटते जेणेकरुन जाती-जाती मधील संपादकांचे तेढ सपूष्टात येईल. आणि जाती दुराभिमानामधून असले लिखाण पुन्हा होणार नाही. दुसरा मुद्दा ह्या लेखाचा बहुतांश भाग कोब्रांच्या सांस्क्रृतीक - चाली रितीविषयीच आहे. इतिहास हा भाग इतिहास का म्हणावा अश्या स्वरुपाच्या संदर्भांनी भरलेला आहे त्यामुळे. वैध संदर्भ देऊन लेख पुन्हा लिहिणे आवश्यक आहे. सुरेश् खोले

लेखनशैली[संपादन]

या लेखातील सध्याचे काही लेखन मूळ लेखन या स्वरूपात मोडते. जोपर्यंत हे लिखाण विकिस्रोत या भावी सहप्रकल्पास उपयुक्त आहे, तोपर्यंत हे लेखन ही सूचना लावून मराठी विकिबुक्समध्ये साठवता येईल. मराठी विकिपीडियात या लेखनातील भाग ठेवण्याकरिता संपादकास सुयोग्य असे स्वतःच्या लेखनाचे सोडून इतर संदर्भ[ संदर्भ हवा ] देणे अपेक्षित आहे.


@अभय नातू:

नमस्कार! या लेखाच्या चर्चा वाचल्या आहेत. वर्णीय अभिनिवेश त्यात जाणवतो असे नोंंदवले गेले आहे ते मलाही जाणवले. त्यामुळे अशा स्वरूपाचे लेख करताना नेमके काय पथ्य पाळावे याचे सर्वांंसाठीच मार्गदर्शन व्हावे. तूर्त ग्रंंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांंच्या आधारे विकिकरणाचे नियम पाळून सदर लेख सुधारण्याचा प्रयत्न करते. धन्लवाद!आर्या जोशी (चर्चा)

@आर्या जोशी:,
हा लेख तटस्थ दृष्टिकोनातून लिहिला जावा. हा मोठा गहन विषय आहे आणि त्यावर थोडक्यात लिहिणे अवघड आहे परंतु येथून सुरुवात करावी -
अभय नातू (चर्चा) ०६:१७, २८ जानेवारी २०१८ (IST)[reply]

@अभय नातू:

नमस्कार! या लेखाचे काही संंपादन करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानकोशीय लेखनाची पद्धती सांंभाळून आपण ऐखाद्या लेखात नेमकेपणा अणू शकतो का? असा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून तटस्थपणे संंशोधकाच्या भूमिकेतून करु इच्छित आहे. ज्या परिच्छेदांंना वाद असा साचा लावला आहे त्यांंचे संंपादन कसे करावे याचे मार्गदर्शन आपण करावे हि विनंंती! धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा)

@आर्या जोशी:,
ज्ञानकोशीय लेखनाची पद्धती सांंभाळून आपण ऐखाद्या लेखात नेमकेपणा अणू शकतो का?
होय, किंबहुना ज्ञानकोशीय लेखनपद्धत ही नेमकीच असते. त्यात संदिग्धपणा कमीतकमी असतो तसेच लिहिणाऱ्याच्या व्यक्तिगत मतांना स्थान नसते.
कोणतेही विधान लिहिताना ते विधान लेखकाने कोठे वाचले/ऐकले आहे याची माहिती देणे अपेक्षित असते. यात त्रयस्थ व्यक्तीने केलेली विधाने देता येतात परंतु त्यासाठी संदर्भ आवश्यक आहे तसेच तो संदर्भ समीक्षित असावा (peer reviewed). यात वृत्तपत्रे किंवा अनिर्बंंध (unrestricted) वाचकवर्ग असलेल्या प्रकाशनांचा समावेश होतो. येथे अनिर्बंधचा अर्थ कोणालाही ते उपलब्ध असले पाहिजे. हे सशुल्क असले तर चालते परंतु फक्त विशिष्ट गटाला किंवा वाचकवर्गाला (विचारांवर/जातीवर/नागरिकत्वावर/इतर आधारित) उपलब्ध नसावे. अशी प्रकाशने (विशेषतः वृत्तपत्रे, ऑनलाइन संकेतस्थळे) ही प्रचारकी नसावी. तसेच ब्लॉग किंवा इतर व्यक्तिगत मते व्यक्त करणारी नसावी. इंग्लिश विकिपीडियावरील संपादकवर्गाने खूप वेळ आणि मेहनत घेउन याविषयीचे संकेत तयार केले आहेत. यात फक्त अशा संदर्भांची यादीच नव्हे तर त्यांचे वर्णनही आहे. हे जरूर वाचावे.
विकिपीडियावर, विशेषतः मराठी विकिपीडियावर, लिहिताना प्रत्येक वाक्यास असे संदर्भ देण्याचा दुराग्रह आपण ठेवलेला नाही परंतु जेथे आक्षेप घेतला जातो किंवा वाद होतात तेथे असे संदर्भ देणे आवश्यक आहे. यात फक्त मूळ लिखाणासाठीच नव्हे तर बदल करणाऱ्याचाही समावेश आहे - उदा. ओसामा बिन लादेन अतिरेकी होता. या विधानाला लिहिताना संदर्भ दिला नाही (असे कोणी म्हणले, केव्हा म्हणले, इ.) हे १००% बरोबर नाही. कदाचित मूळ लेखकाला वाचणाऱ्या दुसऱ्या एखाद्या संपादकाने असा संदर्भ देणे अपेक्षित असेल. हे विधान काढताना किंवा त्यात बदल करताना संदर्भ दिला पाहिजे. तरीही एकवेळ नाही दिला तरी चालेल पण एकदा यावरुन चर्चा किंवा वाद सुरू झाला तर प्रत्येक बदलाला संदर्भ देणे अपेक्षित आहे.
(अपूर्ण)
अभय नातू (चर्चा) ०८:४०, १ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

@संंदेश हिवाळे: धन्यवाद संंदेश.आर्या जोशी (चर्चा)


नमस्कार!

जोशी मॅडम, कृपया, गोत्र संबंधी लेखात दोन विभाग आहेत, आवश्यक ती काटछाट करून दोघांना एकत्रित करा. --संदेश हिवाळेचर्चा २०:५८, ४ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २०:५८, ४ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]


केलेल्या सुधारणा[संपादन]

  • अनावश्यक चौकट जी जवळपास अर्धापान व्यापून अर्धा मजकूर गरज नसताना झाकोळून होती.
  • अवैध संदर्भ(ब्लॉगचे किंवा खाजगी संकेतस्थळांना दिलेले) काढून टाकले.
  • आवश्यक ठिकाणी संदर्भ हवा साचा लावला आहे. आणि शक्य असलेले संदर्भ मी सुधारले आहेत.
  • नकल-डकव केलेला मजकूर सापडला त्या ठिकाणी प्रताधिकार भंग साचा लावला आहे.

नोंद म्हणून केलेले बदल येथे सारांशरुपाने मांडत आहे. आता ह्या लेखाला जरासा आकार आला आहे, अविश्वकोशीय भाषा आणि संदर्भ जोडल्यावर अजुन आकार येईल. WikiSuresh (चर्चा) ०२:१३, ११ एप्रिल २०१८ (IST)[reply]

"इंग्रजी विकिपीडियात वापरले गेलेले संदर्भ" या नावाखाली यादी केलेली ही संदर्भ यादी[संपादन]

Londhe also found in "Malvi Sonar" In Vidharbha and Madhya Pradesh

नोंदी

  • by grant duff. a popular writer of history of Maratha. he wrote book "History of the Maharattas" in 1927 in England.

he wrote:- "Independant of two Maharatta division of Concanist & Deshist, there are in the Maharatta country eight classess of brahmins,who differs from each other in some of their usage, & present, to those accustomed to observe them, preceptible differences both of character & appearance."

  • वरच्या वाक्यातील "Concanist" (कोकणस्थ) या शब्दासाठी डफने पुढील तळटीप दिली आहे.

"The Peshwas who attained sovereign authority in the Maharatta Nation, were of this class......They are termed Chitpawan. Of all the Brahmins with whome I am acquainted, the Concanists are the most sensible & intelligent." by 'Mr. Candy' रघुनाथराव परांजप्यांच्या अभिनंदनार्थ भरलेल्या मुंबई विद्यापीठाच्या एका सभेत बोलताना माजी न्यायाधीश आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु 'Mr. Candy' म्हणाले :- "There never has been any question as to an Indian being perfectly equal to an Englishman in intellect.....Indeed i should say that a Konkan brahman in acuteness of intellect is superior to the average Englishman.

या यादीचा उद्देश काय आहे हे कळत नाही परंतू त्यात संदर्भ आहेत ज्यांचा लेख सुधारण्यास उपयोग होऊ शकतो म्हणून येथे देत आहे.WikiSuresh (चर्चा) ०२:५८, ११ एप्रिल २०१८ (IST)[reply]


नकल-डकवचा पुरावा[संपादन]

।स्त्रोताचा दुवा : http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2007_11_01_archive.html ।लेखाची सुरुवात झाली : १३:२१, २५ मे २००९ ।स्त्रोताची तारिख व वेळ : Monday, November 5, 2007 ।त्यामुळे मजकूर नकल-डकव आहे हे सिध्द होते.WikiSuresh (चर्चा) ०१:०६, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]