राजलक्ष्मी पार्थसारथी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजलक्ष्मी पार्थसारथी (८ नोव्हेंबर, १९२५:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) या भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेविका आहेत. त्यांनी १९४७मध्ये मद्रास विद्यापीठातून पत्रकारितेतील उच्चपदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तेथूनच एम.एड. आणि इतिहासातील एम.ए. पदव्याही घेतल्या.

राजलक्ष्मी यांनी द हिंदू या इंग्लिश वृत्तपत्रासाठी आणि कुमुदम या तमिळ साप्ताहिकासाठी काम केले. लग्नानंतर त्यांनी नोकरी सोडून पद्मा शेषाद्री बाल भवन ही शिक्षणसंस्था सुरू केली. त्यांनी सीबीएसई बोर्डासाठीही काम केले आहे.