नरेंद्र चपळगावकर
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर (१० एप्रिल १९३७)[१] हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी संचालक आहेत.
चपळगावकर नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात.
चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात. उदा० 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२ च्या अंकात त्यांचा खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख प्रसिद्ध झाला.
फेब्रुवारी २०२३ मध्ये वर्धा येथे होणाऱ्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.[२]
कारकीर्द
[संपादन]चपळगावकर यांनी १९६२ ते १९७८ या काळात बीडमध्ये वकिली केली. त्यानंतर १९७९ ते १९८१ दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. आणि १९८१ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची १९ जानेवारी १९९० मध्ये नियुक्ती झाली आणि कायमचे न्यायाधीश म्हणून २० नोव्हेंबर १९९० रोजी नियुक्ती झाली. १० एप्रिल १९९९ रोजी ते निवृत्त झाले.[१]
चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अनंत भालेराव: काळ आणि कर्तृत्त्व
- आठवणीतले दिवस
- कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
- कायदा आणि माणूस
- कहाणी हैदराबाद लढ्याची
- तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
- तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
- त्यांना समजून घेताना (ललित)
- दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
- नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
- नामदार गोखल्यांचं शहाणपण
- न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
- न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
- मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
- महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
- राज्यघटनेचे अर्धशतक
- विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन
- संघर्ष आणि शहाणपण
- समाज आणि संस्कृती
- संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
- सावलीचा शोध (सामाजिक)
- हरवलेले स्नेहबंध
सन्मान आणि पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र फाउंडेशनचा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार (२०२२)[३]
- पुण्यात २१-२२ जानेवारी २०१२ रोजी झालेल्या १३व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- सन २००३ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाच्या (शिवार साहित्य संमेलनाचे) आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- २६वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचेही अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर होते.
- 'तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ' या पुस्तकासाठी भैरुरतन दमाणी पुरस्कार (२०११)[४]
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (२०१८)
- औरंगाबाद येथे १३-१४ मार्च २०१४ या तारखांना झालेल्या ९व्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b https://bombayhighcourt.nic.in/jshowpuisne.php?bhcpar=amdldGlkPTI3MyZwYWdlbm89MTQ=. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ "९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर". Maharashtra Times. 2022-11-11 रोजी पाहिले.
- ^ author/lokmat-news-network (2022-01-10). "महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव नरेंद्र चपळगावकर अन् प्रेमा पुरव यांना जाहीर". Lokmat. 2022-11-11 रोजी पाहिले.
- ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-narendra-chapalgaonkar-and-bairuratan-damani-puraskar-2602171.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)