Jump to content

चर्चा:प्रधानमंत्री पीक विमा योजना

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखात लिहिल्याप्रमाणे ही योजना जर राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरू झाली असेल तर नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या लेखमालिकेत या लेखाचा समावेश करण्याचे कारण कळेल का?

अभय नातू (चर्चा) ०८:३४, १ जून २०१७ (IST)[reply]

नमस्कार!

त्या योजनेचे पुरुज्जिवन केले अथवा झाले म्हणून.ही नविन योजना आहे. जून्या योजनेत आमुलाग्र बदल केल्या गेले आहेत.--वि. नरसीकर (चर्चा) ०९:५०, १ जून २०१७ (IST)[reply]

असे असता हे बदल काय आहेत व ते नरेंद्र मोदी यांच्याशी कसे संबंधित आहेत हे लेखात नमूद करावे.
अभय नातू (चर्चा) १९:३९, १ जून २०१७ (IST)[reply]
प्रसाद साळवे यांनी लेखात ते नमूद केलेच आहे.इतःपर, कोणाची हरकत असल्यास व माझी कृती चूक वाटत असेल तर, ते साचे काढून टाकतो.तसे कळवावे ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) २०:१०, १ जून २०१७ (IST)[reply]


फक्त शिर्षकाचा विचार करता वि. नरसीकर म्हणत असलेला साचा लेखात असण्यास हरकत नसावी. असे माझे वैयक्तिक मत आहे.

खरे पाहता लेखाचे नाव "भारतातील पीक विमा" असे असायला हवे होते त्यात एक मुख्य विभाग "प्रधानमंत्री पीक विमा योजना" करणे योग्य झाले असते. "प्रधानमंत्री फसल बिमा योजना" नावाने सुरू केलेली योजना मा. नरेंद्र मोदी यांचीच आहे. परंतु विविध योजनांना प्रधानमंत्र्यांचे स्पष्ट नाव देणे आता बंद झाले आहे.

लेखात भर घातल्यास व शीर्षक बदलल्यास... पुढे या नावाने विभाग तयार झाला तरी त्यात हा साचा टाकल्यास, योग्य आसेल... मग तो आतापासून असला तरीही त्याच लेखात आहे.म्हणून हरकत नसावी असे वाटते.

लेखात लवकरच भर टाकण्याचा प्रयत्न करतो..

प्रसाद साळवे   २२:१७, १ जून २०१७ (IST)[reply]