मोठी केगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोठी केगो (इंग्लिश:great blackheaded gull; हिंदी:कलसिरी गंगा चिल्ली) हा एक पक्षी आहे.

सर्वात मोठा केगो. इक्तं आढळून येतो. डोके आणि कंठ काळा. डोळ्यांभोवती शुभ्र चंद्रकोरी. वरचा रंग मोतिया करडा. त्यावर काळपट आभा. बाकी शरीराचा रंग पांढरा शूभ्र. पिवळी मोठी चोच. चोचीचे टोक तांबडे. नर-मादी दिसायला सारखे असतात.

वितरण[संपादन]

भारत आणि पाकिस्तानच्या समुद्राकिनाऱ्यावर हिवाळ्यांत आढळतात. अधून-मधून हिवाळ्यात समुद्रापासून दूर असलेल्या सरोवरांवर आणि नद्यांवर दिसतात. अश्या प्रकारच्या नोंदी बलुचीस्थान, सिंध, राजस्थान, दिल्ली, नेपाल, बिहार येथे झाल्या आहेत . द.रशिया आणि पूर्व मंगोलिया भागात विलीन असतात.

निवासस्थाने[संपादन]

समुद्रकिनारे, नद्या आणि सरोवरे या भागांत आढळून येतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली