Jump to content

सदस्य चर्चा:जयश्री दौंडकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत जयश्री दौंडकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन जयश्री दौंडकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७७० लेख आहे व १५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) ११:१०, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

पक्ष्यांबद्दलचे लेख

[संपादन]

नमस्कार,

सर्वप्रथम, तुम्ही मराठी विकिपीडियावर देत असलेल्या योगदानाबद्दल अनेक धन्यवाद.

तुमच्या लेखनाबद्दल दोन सूचना कराव्याशा वाटतात.

१. विकिपीडियावरील पक्षीविषयक लेख विवक्षित प्रकारे लिहले जातात, उदा. चित्रबलाक. तुम्ही घालत असलेली माहिती अशा प्रकारे लिहिलीत तर उत्तम!

२. तुमचे लेखन कोठून नकल-डकव (कॉपी-पेस्ट) केलेले नाही ना याची खात्री देता येईल का? आपल्या लेखनातील भाषा ललितलेखन असल्यासारखी असल्याने अशी शंका आली. आपण स्वतःच हे लेखन केले असले तर प्रताधिकारभंगाचा प्रश्न येत नाही. तरीही लेखातील भाषा विश्वकोशीय ठेवावी ही विनंती.

तुम्हाला प्रश्न असले किंवा मदत लागली तर कळवालच.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:५८, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

मराठी भाषा गौरव दिन

[संपादन]

नमस्कार व महाजालावर मराठी भाषेच्या वाढीस हातभार लावल्याबद्दल धन्यवाद! मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 27th Feb Marathi gaurav din टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:४२, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

पक्षी लेख

[संपादन]

नमस्कार,

आपण गेली अनेक दिवस येथे पक्ष्यांबद्दलचे लेख तयार करीत असलेले पाहिले. त्यासाठी धन्यवाद.

हे लेख अधिक उपयुक्त व्हावेत यासाठी दोन सूचना कराव्याशा वाटतात -

१. आपण हे लेख मारुती चितमपल्ली यांचे पुस्तक संदर्भ म्हणून वापरीत आहात असे दिसते. असे असता येथील मजकूर पुस्तकातून थेट लिहिलेला नाही याची खात्री करावी/द्यावी. अशी विनंती करण्याचे कारण म्हणजे सगळे लेख एकाच साच्याचे वाटतात व सहसा असा पॅटर्न प्रकाशित पुस्तकात असतो. जर आपण पुस्तकातील मजकूर वाचून आपल्या शब्दांत (परंतु एकाच साच्यात) लिहित असलात तर काहीच हरकत नाही!

२. आपण लिहिलेला मजकूर ज्ञानकोशीय बैठकीत बसत नाही आहे, उदा. लेखाला प्रस्तावना नाही, त्रोटक/अपूर्ण वाक्ये, इ. प्रथमेश ताम्हाणे यांनी सुधारलेला पाणकोंबडा हा लेख पाहिला असता मजकूर साधारण कसा पाहिजे याची कल्पना येईल. आपण लिहिलेले सर्व लेख या बाजात आणावेत ही विनंती तसेच पुढील लेखही याच बाजात लिहावे ही सुद्धा विनंती.

काही अडचण आल्यास कळवालच.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १९:४२, २० एप्रिल २०१७ (IST)[reply]

ता.क. मी पूर्वी केलेली विनंतीवजा सूचनाही वर आहेच.