जनरल मिचेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
जनरल मिचेल प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: MKE, आप्रविको: KMKE, एफ.ए.ए. स्थळसूचक: MKE) अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी शहरात असलेला विमानतळ आहे. या विमानतळास जनरल बिली मिचेलचे नाव देण्यात आले आहे. मिचेल विस्कॉन्सिनचा रहिवासी होता व त्याला अमेरिकेच्या वायु सेनेच्या जनकांपैकी एक समजले जाते. हा विमानतळ १९२०मध्ये हॅमिल्टन विमानतळ या नावाने बांधला गेला.
हा विमानतळ शिकागो महानगरास जवळ असल्याने शिकागोच्या उत्तरी उपनगरातील लोक याचा वापर करतात. येथे ॲमट्रॅकचे रेल्वे स्थानक असून त्या गाड्या शिकागोपर्यंत धावतात.
येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच कॅनडा आणि मेक्सिकोतील शहरांना प्रवासी सेवा आणि मालवाहतूकसेवा उपलब्ध आहे. येथून डेल्टा एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि फ्रंटियर एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.