रमेश मुधोळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रमेश मुधोळकर (१९ जुलै, इ.स. १९३५:मलकापूर, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र - १३ मार्च, इ.स. २०१६:पुणे) हे एक बालसाहित्यकार व चित्रकार होते.

रमेश मुधोळकर यांचे प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे आणि माध्यमिक शिक्षण मुंबईच्या छबिलदास हायस्कूलमध्ये झाले. मुंबईच्या जे.जे. कला महाविद्यालयातून त्यांनी कर्मिशयल आर्टचे शिक्षण घेतले होते.

१९७२ मध्ये त्यांनी केलेले अनुवादित पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केले होते. दोनच वर्षांनी त्यांनी शालापत्रक हे शालेय मुलांसाठीचे मासिक सुरू केले. लेखनाबरोबरच पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील सजावट व चित्रे मुधोळकर यांचीच असत. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे ३०० पुस्तके त्यांनी लिहिली.

शिक्षण सुरू असतानाच मुधोळकारांनी जयको पॉकेट बुक्ससाठी चित्रांचे काम केले. अमर चित्रकथा या गाजलेल्या चित्रकथा मालिकेचे काम त्यांनी केले आहे. एको बुक्स या कुमार वाङ्मयाच्या पुस्तक मालिकांच्या निर्मितीत त्यांचा वाटा होता.

मुधोळकरांनी देशोदेशीच्या रसाळ कथा नव्याने सांगितल्या. एवढेच नव्हे तर खगोलशास्त्र, चित्रकला, अक्षरचित्रांसह अंकलिपी, भारतीय विज्ञान सप्तर्षी, भारतरत्न, पक्षी, प्राण्यांचे बंड, बडबडगीते असे मुशाफिरी करणारे लेखनही त्यांनी केले. मुधोळकरांनी मराठीप्रमाणेच इंग्रजीतही लेखन केले. शंकरमहाराज आणि दिगंबरदास महाराजांसारख्या परमार्थी व्यक्तींच्या गोष्टींमधून त्यांनी संदेशपर लेखन केले.

'अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन' या संस्थेच्या स्थापनेत रमेश मुधोळकरांचा अमरेंद्र गाडगीळ यांच्याबरोबर सहभाग होता. या संस्थेचे ते संस्थापक-सदस्य होते.

२००९मध्ये मुधोळकरांच्या लेखनसंपदेच्या संख्येच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली.

पुस्तके[संपादन]

  • अंक ओळख १ ते १०
  • श्री अक्कलकोटस्वामी महाराजांच्या गोष्टी
  • The Ungrateful Dog
  • अमृतपुलीन (बालकादंबरी)
  • अरेबियन नाईट्स
  • आचार्य विनोबा भावे
  • आपले पक्षी
  • आफ्रिकेतील साहस
  • इसापनीतीच्या ५३० गोष्टी
  • उंदराचं तुटलं शेपूट !
  • एकोणचाळीस पायऱ्या (अनुावादित; मूळ इंग्रजी लेळक - जॉन बॅकन)
  • काउन्टिंंग (प्रवासवर्णन?)
  • कालयंत्र
  • The King Of Birds
  • किती हसाल ?
  • कोणे एके काळी
  • कोंबड्याचे शहाणपण
  • कोळ्यांची चतुराई
  • खेळ खेळू या जमतीचे
  • गणपतीच्या गोष्टी
  • गाढवाला आली अक्कल
  • गुणी मुले
  • Gautam Buddha
  • गौतम बुद्धाच्या गोष्टी
  • The Greedy Young Fox
  • चतुर कोल्हा
  • चलाख माकड
  • चीनचा बिरबल आफंदी
  • जयंत आणि जादूचे दूध
  • जयप्रकाश नारायण
  • पंडित जवाहरलाल नेहरू
  • जातक कथा
  • The Talking Conch - Shell
  • श्री टेंबेस्वामी महाराज यांच्या गोष्टी
  • Tales From Panchtantra
  • The Tales Of Shri Balaji
  • Tales Of Sambhaji
  • Dick Whittington And His Cat
  • द थर्टी-नाइन स्टेप्स (अनुवादित, मूळ लेखक - Authors:जॉन बुकानन)
  • थोरांच्या गोष्टी (राष्ट्रपुरुषांची चरित्रे)
  • Three handfuls Of Rice
  • दमास्कसचा बुटका
  • देशोदेशीचे मित्र
  • देशोदेशींच्या अद्भुत कथा
  • देशोदेशीच्या लोककथा
  • दोन ध्रुवांवर विजय
  • नवनाथांच्या गोष्टी
  • Nursery Rhymes
  • पराक्रमी भीम
  • पक्षी
  • पाशा (मराठी अनुवाद; मूळ लेखिका - ज्योती सोलापूरकर)
  • पूर्ण अक्षरचित्रांसह अंकलिपी
  • प्राण्यांचे बंड
  • The Prince And The Lions
  • फंटूश संपावर जातो
  • Fun With Counting 1 To 10
  • फार फार वर्षांपूर्वी
  • The Foolish Husband
  • फ्रॅन्केन्स्टाईन
  • The Fruit Of Greed
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • बिरबल आणि बादशहाच्या १७५ गोष्टी
  • बोधिसत्वाच्या बोधपर ९० गोष्टी
  • बोलका शंख
  • Brer Rabbit
  • बॅस्करव्हीलचा शाप (The Hound of Baskervilleचा मराठी अनुवाद)
  • भगवान महावीराच्या गोष्टी
  • भागवतातील गोष्टी
  • भारतरत्न
  • भारतीय कलारत्न
  • भारतीय विज्ञान सप्तर्षी
  • महात्मा गांधी
  • Mahatma Gandhi
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र)
  • महाभारतातील गोष्टी
  • The Mouse's Cap
  • माकडा माकडा हूप !
  • मिठाचा शोध (लेखिका - अंजली अत्रे, संपादन व सजावट - रमेश मुधोळकर)
  • मिठूमियां ! मिठूमियां !
  • मुलांसाठी नीतिकथा
  • मुल्ला नसरुद्दीन एक वल्ली
  • मुल्ला नसरुद्दीनचे अजब किस्से
  • मोत्या आळंदीला जातो
  • मोरारजी देसाई
  • रवींद्रनाथ टागोर
  • Shri Ramkrishna Paramhansa
  • रामायणातील गोष्टी
  • लबाड कोल्हानी सवाई ससा
  • Lokmanya Tilak
  • लोकमान्य टिळक
  • लोभाचे फळ
  • विश्वविख्यात बोधकथा
  • The Wisdom Of The Cock
  • विसराळूपणाची कमाल
  • शहाणपणाची किंमत
  • छत्रपती शिवाजी
  • शेक्सपियरच्या नाट्यकथा
  • शेखचिल्लीच्या गोष्टी
  • शेरलॉक होम्सच्या साहसकथा
  • सद्गुणांच्या गोष्टी
  • सद्गुरू श्रीबाबामहाराज सहस्रबुद्धे
  • सर्कसच्या गोष्टी
  • सर्वधर्म समभाव
  • सवाई जादूगार
  • श्री साईबाबांच्या गोष्टी
  • साता समुद्रापलीकडे
  • The Silent Parrot
  • सिलोनचा बिरबल
  • नेताजी सुभाषचंद्र बोस
  • स्कॅरॅमाऊश (अनुवादित, मूळ लेखक - रफाएल साबातिनी)
  • Stories From Aesop
  • Stories From Mahabharata
  • Stories Of Nana Phadnis
  • The Story Of Shivaji
  • The Sleeping Princess
  • स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी
  • 175 Stories Of Akbar And Birbal
  • The Happy Man's Shirt
  • हसत खेळत चित्रकला
  • हेराची चतुराई