श्रीरंग संगोराम
Appearance
प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम हे महाराष्ट्रातील एक संगीतसमीक्षक व लेखक होते. ते पुणे विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. ते लोकसत्ता दैनिकाचे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांचे वडील होत.
मुकुंद संगोराम यांचा मुलगा आणि प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम यांचा नातू गंधार मुकुंद संगोराम हा संगीत दिग्दर्शक आणि वादक आहे.[१] वडील, मुलगा आणि नातू असे तिघे संगीताचे जाणकार असण्याचे हे उदाहरण आहे.
शास्त्रीय गायनासाठीचे डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती पुरस्कार
[संपादन]डॉ. श्रीरंग संगोराम यांच्या स्मरणार्थ शास्त्रीय गायन पुरस्कार देण्यात येतात. २०१५ सालचा डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती शास्त्रीय गायन पुरस्कार हा गायिका स्वरांगी मराठे हिला देण्यात आला [२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ मानबिंदू : आम्ही सितारे उद्याचे, [१] Archived 2016-03-05 at the Wayback Machine. मानबिंदू
- ^ स्वरांगीला संगोराम स्मृती, तर मुकुंद मराठे यांना विश्वनाथ बागुल पुरस्कार [२] Archived 2015-07-07 at the Wayback Machine. ठाणेवार्ता