मुकुंद संगोराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुकुंद श्रीरंग संगोराम हे 'लोकसत्ता' दैनिकाचे दैनिकाचे सहायक संपादक आहेत. ते आधी तरुण भारत आणि पुणे वर्तमान या दैनिकांचे सहसंपादक होते. ते संगीताचे जाणकार आहेत. त्यांना हा वारसा त्यांचे वडील प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम यांच्याकडून मिळाला. 'लोकसत्ता'त त्यांनी संगीतविषयक सदरलेखन केले आहे.

कौटुंबिक माहिती[संपादन]

मुकुंद संगोराम यांचे वडील प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम हे महाराष्ट्रातील उत्तम संगीत समीक्षक, जाणकार होते. ते पुणे विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. मुकुंद संगोराम यांचा मुलगा गंधार संगोराम हाही संगीतकार असून त्यास एकूण एकोणीस वाद्ये वाजविता येतात. [१] पुण्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट (दिवंगत) आणि अर्थशास्त्र व अकाउंटन्सीविषयक लेखन करणारे सदरलेखक मिलिंद संगोराम हे मुकुंद संगोराम यांचे धाकटे बंधू होत.

शिक्षण[संपादन]

व्यावसायिक कारकीर्द[संपादन]

लेखन[संपादन]

  • समेपासून... समेपर्यंत, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे किंमत: रु १००
  • ख्यालिया : मुकुंद संगोराम (चित्रकार : सतीश पाकणीकर), मनोविकास प्रकाशन, पुणे (पं. भीमसेन जोशी यांचे जीवन चरित्र), किंमत:रु.४००/-

पुरस्कार[संपादन]

सन्मान[संपादन]

  • विश्वस्त : आर्य संगीत प्रसारक मंडळ, पुणे

हेही वाचा[संपादन]

बाह्यदुवा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ मानबिंदू : आम्ही सितारे उद्याचे, http://www.maanbindu.com/marathi-composer-gandhaar Archived 2016-03-05 at the Wayback Machine.