Jump to content

चर्चा:पिंपरी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिंपरी जिल्हा?

[संपादन]

हा लेख पिंपरी शहराविषयी आहे. पिंपरी जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

मला वाटते पिंपरी हा वेगळा जिल्हा नाही.

अभय नातू १९:०९, ९ जानेवारी २०११ (UTC)

दुरुस्त केले...

प्रताधिकार भंग शंका अहवाल

[संपादन]

उद्योगनगरीचिये भाळी साहित्य संमेलनांची मांदियाळी या नावाने - पीतांबर लोहार यांनी सकाळमध्ये रविवार, 26 फेब्रुवारी 2017 रोजी लिहीलेला लेख नेहमीप्रमाणे "ज"-शाच्या तसा उतरवलेला आहे. [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80&type=revision&diff=1589487&oldid=1542509&diffmode=source या वेळी ज यांनी हे नकल-डकव केल्याचे इतिहासात स्पष्ट दिसत आहे. @अभय नातू: प्रचालकांनी पुढील कारवाई करावी, धन्यवाद WikiSuresh (चर्चा) ०८:१०, २५ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@:,

यावर स्पष्टीकरण द्याल?

अभय नातू (चर्चा) १९:२३, २५ एप्रिल २०१८ (IST)[reply]


@अभय नातू:

अगदी नकल-डकव नाही, पण त्या लेखातील काही मजकूर संपादित करून 'पिंपरी'त टाकला आहे. संमेलनांसंबंधी ही दुर्मीळ माहिती द्यायला दुसरे पान सापडले नाही. ... (चर्चा) २१:३८, २५ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: मुळातच पिंपरी असा वेगळा लेखच अस्तित्त्वात असणे किती रास्त आहे कारण, पिंपरी-चिंचवड हे नेहमीच एकत्र उल्लेखले जाते आणि प्रशासन, भुगोल, इतिहास सगळ्याच बाबतीत ह्या शहराचा जोड-शहर म्हणुनच उल्लेख होतो. मला पिंपरी ह्या लेखाचे वेगळे असणे औचित्यपुर्ण वाटत नाही. आता नव्याने @: यांनी जी माहिती ह्या लेखात जोडली आहे त्यामूळे मी ह्या लेखाकडे जास्त बारकाईने पाहिले शिवाय हे पान आधीच अस्तित्त्वात असल्याचे मला लक्षात आले. फ़ारतर पिंपरी-चिंचवड ह्या लेखात नसलेली आणि पिंपरी मध्ये असलेली जर काही माहिती असेल तर ती सहभागी करुन दोन्हींचे एकत्रिकरण करायला हरकत नाही. WikiSuresh (चर्चा) २३:०२, २५ एप्रिल २०१८ (IST)[reply]

पिंपरी-चिंचवड हे महानगर काही दशकांपूर्वी अस्तित्त्वात आले. त्यापूर्वी पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही गावांना वेगळे अस्तित्त्व होते.
असे असताही येथील मजकूर पिंपरी-चिंचववडमध्ये विलीन करण्यास हरकत नाही. त्या लेखात पिंपरी आणि चिंचवड असे वेगळे विभाग करुन त्या त्या गावाबद्दलची विशिष्ट माहिती तेथे लिहावी किंवा वेगळी करावी.
अभय नातू (चर्चा) २२:१३, २७ एप्रिल २०१८ (IST)[reply]

मी चिंचवड येथील बिजलीनगरचा गेली तीस वर्षे रहिवासी आहे, त्यामुळे मला जे दिसले ते चिंचवड आणि पिंपरी ह्या दोऩी पानांवर सारखाच मजकूर टाकला गेला आहे. पुढील काही दिवसांत वेगळी पाने म्हणून मी ही सुधारीन मग पुढे त्याचे विलीनीकरण किंवा वेगळे ठेवणे ठरवता येईल. --Sureshkhole (चर्चा) २२:२२, २७ एप्रिल २०१८ (IST)[reply]