Jump to content

चर्चा:प.वि. वर्तक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उल्लेखनीयता

[संपादन]

डॉ. प.वि. वर्तकांच्या बद्दलचा एक तर्क (’उपक्रम’वरून) या कॉपीपेस्टेड विभागातील काही मजकुराची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्रथमदर्शनी साशंकीत वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२०, ३ जून २०१५ (IST)[reply]


>>या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://www.mr.upakram.org/node/3276 येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे <<

वाटत का असावे? तसेच आहे हे मथळ्यातूनच सांगितले आहे. प.वि. वर्तकांच्या दिव्यदृष्टीबद्दल महाराष्ट्रातील अनेक विचारवंत आणि सामान्य माणसे गेल्या अनेक वर्षांपासून शंका व्यक्त करीत आहेत, त्यासाठी खरे तर ’उपक्रमा’वरील मजकुराची गरज नव्हती. पण केवळ विकिपीडियाला लेखी पुरावा लागतो, म्हणून ’उपक्रम’वरचा”तो’ मजकूर येथे नकलला-डकवला आहे. ’उपक्रमा’खेरीज अनेक लेखी पुरावे देता येतील. अर्थात कितीही पुरावे दिले तरी, प.वि. वर्तकांना खरोखरच दिव्यदृष्टी आहे की नाही, हे सिद्ध करणे मात्र कठीण आहे.

@:, आपण अलिकडे व्यक्ती विषयक लेखात टिकांचाही आंतर्भाव करण्याचा प्रयत्न करू इच्छिता हे विकिपीडियाच्या तटस्थतेच्या दृष्टीकोनास अनुसरून आणि अभिनंदनीयतच आहे. ज्ञानकोशात (विकिपीडियात) लेखी पडताळण्याजोगा संदर्भ हवा आहे, हेही खरेच आहे पण म्हणजे यथासांग नकल-डकव नव्हे ! ;
ग.वा.बेहेरे/य.ना. वालावलकर यांनी ..... शब्दात टिका केली अथवा ग.वा.बेहेरे/य.ना. वालावलकर यांचे मत .... असे आहे. (कंसात संदर्भ दुवा अथवा "फलज्योतिषाचा बोजवारा"(मनोविकास प्रकाशन) संपादक:श्री.जगदीश काबरे. त्यांत "माझा ज्योतिषावर विश्वास नाही" हा पत्रकार ग.वा.बेहेरे यांचा लेख पृष्ठ क्रमांक....परिच्छेद क्रमांक...) असे लिहिले जावयास हवे.
तुम्ही म्हणता तसे त्या दुव्यावर अथवा लेखात नाहीच आहे असा कुणी केवळ दावा केल्यास, तुमची बाजू सिद्ध करण्यासाठी नेमकी तेवढ्याच भागाची नकल-डकव करणे वेगळे आणि तसे सिद्ध करण्याचे आव्हान न येताच संपूर्ण नकल डकव करणे वेगळे. नंतर करावयाचे ते आधीच करतो असा कदाचित विचार असेल पण कायदा आणि विकिपीडिया लेखन संकेत कदाचित तसा विचार करत नसावेत.
दुसरे तर वर्तकांवरील ग.वा. बेहरे यांच्या मांडणीला सिद्धता आहे परंतु य.ना. वालावलकर यांनी तंबाखुजन्य पदार्थांचा परिणाम सांगणे हा समसमीक्षण न झालेला हवेत मारलेला बाण (व्यक्तीगत मत) आहे, य.ना. वालावलकर यांच्या मताची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता मला साशंकीत करणारी वाटते. य.ना वालावलकरांची टिका व्यक्तिलक्ष्य तर्कदोष#परिस्थितिक व्यक्तिलक्ष्य तर्कदोष या जवळ जाते का अशी शंका वाटते.
३) ओळीत संदर्भ देण्यासाठीचे. <ref> </ref> चिन्हांचा वापर न केल्यानेही प्रताधिकार विषयक गैरसमज ओढावले जाऊ शकतात असे वाटते आहे. आपण अलिकडे <br /> हे चिन्ह वापरताना दिसता मग ओळीत संदर्भ देण्यासाठीचे. <ref> </ref> चिन्हांचा वापर अद्यापही आपणास अवघड का जातो आहे हे उमगत नाहीए. थोड्याशा प्रयत्नाने आणि सरावाने <ref> </ref> चिन्हांचा वापर जमून जावयास हवा असे वाटते, किंवा यथादृष्य संपादकाचा वापर केल्यासही आपल्या बऱ्याच तांत्रिक अडचणी दूर होऊ शकाव्यात असे वाटते. पण त्या दिशेने आपण अल्पसा तरी प्रयत्न करावयास हवा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०२, ४ जून २०१५ (IST)[reply]

वर्तकांची जन्मतारीख

[संपादन]

लेखात दिलेली जन्मतारीख वर्तमानपत्रातील एका उतार्‍यावरून घेतली असली तरी ती खरी असेलच असे नाही. कारण,

१. प.वि. वर्तकांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम पुण्यात २३ मे २०१५ला झाला. सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम व्यक्तीचे वय ८० वर्षे आणि आठ महिने एवढे झाल्यानंतर होतो. म्हणजे २०१५मध्ये ते जवळपास ८१ वर्षे वयाचे परंतु ८२ वर्षांपेक्षा लहान असावेत. हे खरे असेल तर जन्मवर्ष १९३४ साल येईल.

२. वर्तकांचा अमृत महोत्सव १७ जानेवारी २००९ला झाला. म्हणजे तेव्हा त्यांचे वय ७५ होते. जर जन्मतारीख २५ फेब्रुवारी १९३३ असेल तर हा अमृत महोत्सव इतक्या उशिरा म्हणजे ७६ लागायच्या फक्त एक महिना आधी का व्हावा? हा समारंभ २५ फेब्रुवारी २००८च्या आसपास व्हायला हवा होता. .... (चर्चा) २१:५७, ३ जून २०१५ (IST)[reply]


व्यक्तिलक्ष्य तर्कदोष#परिस्थितिक व्यक्तिलक्ष्य तर्कदोष

[संपादन]

य.ना. वालावलकरांवर तर्कदोषाची टीका होणे अनाकलनीय आहे. महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजता येणारी जी तर्कशुद्ध विचार करणारी माणसे उरली आहेत, त्यांत वालावलकरांचा समावेश होतो. अफाट शब्दसंपत्ती, आधुनिक मराठी व्याकरणाचे सखोल ज्ञान, सडेतोड विचारमांडणी, शब्दकोडी आणि गणितातले कूटप्रश्न यांची निर्मिती, वाखाणण्याजोगा वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबतीत यनावालांचा हात कुणी धरू शकेल असे वाटत नाही. खरे तर त्यांच्यावरच एक लेख लिहून त्यांत त्यांनी ठिकठिकाणी मांडलेले विचार उद्धृत करायला पाहिजेत.

यनावालांचे प्रामाणिक विचार जर विकिपीडियावरील एखाद्या लेखात आले आहेत असे त्यांना समजले तर त्यांना खूप आनंद होईल. अशा छपाईला परवानगी नाकारण्याचा विचारही त्यांच्या मेंदूला स्पर्श करणार नाही.... (चर्चा) १०:५४, ४ जून २०१५ (IST)[reply]

>>अशा छपाईला परवानगी नाकारण्याचा विचारही त्यांच्या मेंदूला स्पर्श करणार नाही....<<
  • हे लक्षात घ्या: खालील प्रकारचे दृष्टिकोण विकिपीडियाच्या उद्दीष्टांशी विसंगत आहेत
" The copyright owner will not mind/should be pleased that we have disseminated his/her work. "
कॉपीराईट मालक प्रताधिकार उल्लंघन मनास लावून घेणार नाही/ त्याच्या/तीच्या कामास प्रसारीत केल्याबद्दल त्यांना आनंदच वाटेल.
उपरोक्त संदेश खरेतर आपण साईट नोटीसमधून देतो आहोत. त्यामुळे असे दृष्टीकोण टाळून संबंधीतांची अधिकृत परवानगी मागणे अधिक श्रेयस्कर ठरते.
>>विचार जर विकिपीडियावरील एखाद्या लेखात आले आहेत असे त्यांना समजले तर अबकड यांना खूप आनंद होईल.<<
हा ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेचा निकष होऊ शकत नाही. वर म्हटल्या प्रमाणे प्रताधिकार उल्लंघनाचे समर्थनही होऊ शकत नाही.
>>यनावालांचे ...... विचार जर विकिपीडियावरील एखाद्या लेखात...<<
व्यक्तींच्या विचार आणि विधानांची दखल घेण्यासाठी विकिक्वोट हा विकिपीडियाचा बंधूप्रकल्प आहे. तेथेही केवळ उल्लेखनीय विचार आणि विधानांची संक्षीप्त दखल घेता येते; प्रताधिकार उल्लंघन अथवा लेखच्या लेख नकल-डकव करणे विकिक्वोट बंधू प्रकल्पातही अभिप्रेत नाही.
>>'य.ना. वालावलकरांवर तर्कदोषाची टीका होणे अनाकलनीय आहे......<<
व्यक्ती श्रेष्ठ आहे म्हणून शब्द प्रमाण आहेत, ह्यात व्यक्ती प्रामाण्यही आले आणि शब्द प्रामाण्यही आले; व्यक्ती प्रमाण्य आणि शब्द प्रामाण्य स्विकारायचे असेल तर डॉ. पद्माकर विष्णू वर्तकांचेही अतींद्रीय दावेही ते MBBS डॉक्टर होते अमूक एवढी पुस्तके लिहिली इत्यादी कारणांनी वर्तकांचे शब्दही स्विकारावे लागतील का ? (ताकही फुंकावे तसे सर्वच प्रामाण्यांना, मी हलकीशी फुंकर घालत असतो :); मला आपला उपरोक्त तर्क उणीवपूर्ण वाटतो आहे कारण en:Appeal to authority (argumentum ab auctoritate) – where an assertion is deemed true because of the position or authority of the person asserting it. हि एक तार्कीक उणीव आहे.


जिथेपर्यंत य.ना. वालावलकरांच्या >>तंबाखूचे सूक्ष्म कण नाकावाटे आत जाऊन जाऊन त्यांच्या मेंदूच्या विशिष्ट केंद्रावर काही परिणाम झाला असेल का? त्यामुळे भ्रम निर्माण होत असतील का?<< या विधानाचा संबंध आहे. तो en:Anecdotal fallacy - using a personal experience or an isolated example instead of sound reasoning or compelling evidence. या तार्कीक उणीवेतसुद्धा मोडत असावा असे वाटते.


  • परिस्थितिक व्यक्तिलक्ष्य तर्कदोष
यह किसी की परिस्थितियों के आधार पर उसके तर्क तोड़ने की कोशिश होता है। इसमें कहा जाता है कि बोलने वाला अपने परिस्थितियों की वजह से कोई तर्क दे रहा है। यह एक मिथ्या तर्क है क्योंकि किसी का अपनी परिस्थितिवश कोई तर्क देना चाहना उस तर्क को ग़लत नहीं साबित करता:[]

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:११, ४ जून २०१५ (IST)[reply]

मूळ लेखात असलेला आणि नंतर गाळलेला मजकूर

[संपादन]

३. ऑगस्ट १९७६ मध्ये डॉ. वर्तकांनी ध्यानातून गुरुभ्रमणाचा प्रयोग केला व एकूण २० नोंदी त्यांनी मासिकात व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केल्या. यापैकी नऊ मुद्दे नंतर ‘नासा’ने केलेल्या परीक्षणामध्ये बरोबर आले. १० वा मुद्दा जुळण्यासारखा आहे. इतर १० मुद्दे ‘नासा’च्या परीक्षणामध्ये नव्हते व अजून शास्त्रज्ञांनी ते विचारात घेतलेले नाहीत. पुढे कधीतरी हे मुद्देही सिद्ध होतील, अशी वर्तकांना आशा आहे.

३. ऑगस्ट १९७६ मध्ये डॉ. वर्तकांनी ध्यानातून गुरुभ्रमणाचा प्रयोग केला व एकूण २० नोंदी त्यांनी मासिकात व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केल्या. यापैकी नऊ मुद्दे नंतर ‘नासा’ने केलेल्या परीक्षणामध्ये बरोबर आले. १० वा मुद्दा जुळण्यासारखा आहे. इतर १० मुद्दे ‘नासा’च्या परीक्षणामध्ये नव्हते व अजून शास्त्रज्ञांनी ते विचारात घेतलेले नाहीत. पुढे कधीतरी हे मुद्देही सिद्ध होतील, अशी वर्तकांना आशा आहे.

४. ध्यानधारणेच्या मार्गाने ज्ञात झालेली शनी ग्रहाची माहिती वर्तकांनी त्यांच्या आत्मचरित्रात प्रसिद्ध केली आहे. शनीभोवतीच्या कड्यांमध्ये तरंगणारे खडक असल्याचे त्यांनी सांगितले. तेही नंतर खरे ठरले आहे. आणखी विशेष गोष्ट म्हणजे दुसर्‍या सूर्यमालेतील मानवाच्या अस्तित्वाचा उल्लेख करून तेथील मानवाचे वर्णनही त्यांनी करून ठेवलेले आहे. आधुनिक विज्ञान याबद्दल आजही अनभिज्ञ आहे.

४. ध्यानधारणेच्या मार्गाने ज्ञात झालेली शनी ग्रहाची माहिती वर्तकांनी त्यांच्या आत्मचरित्रात प्रसिद्ध केली आहे. शनीभोवतीच्या कड्यांमध्ये तरंगणारे खडक असल्याचे त्यांनी सांगितले. तेही नंतर खरे ठरले आहे. आणखी विशेष गोष्ट म्हणजे दुसर्‍या सूर्यमालेतील मानवाच्या अस्तित्वाचा उल्लेख करून तेथील मानवाचे वर्णनही त्यांनी करून ठेवलेले आहे. आधुनिक विज्ञान याबद्दल आजही अनभिज्ञ आहे.

डॉ. प.वि. वर्तकांच्या बद्दलचा एक तर्क (’उपक्रम’वरून ’उपक्रम’च्या सौजन्याने)

[संपादन]

कॉपीपेस्ट|दुवा=http://www.mr.upakram.org/node/3276

"फलज्योतिषाचा बोजवारा"(मनोविकास प्रकाशन) या पुस्तकात चौदा लेख संकलित केले आहेत. (संपादन:श्री.जगदीश काबरे). त्यांत "माझा ज्योतिषावर विश्वास नाही" हा पत्रकार ग.वा. बेहेरे यांचा लेख आहे. त्या लेखातील काही भाग असा :

"पुण्यातले डॉ.प.वि.वर्तक हे आपल्याजवळ अतीन्द्रिय शक्ती आहे, आपण अचूक भविष्य सांगतो.असा दावा करतात. एकदा त्यांच्या दवाखान्यात मी बसलो होतो. वेळ सायंकाळ सहाची होती. त्याकाळी गाजलेली एक कुस्ती बेळगावमध्ये चालू होती. मी विचारले नसताही त्या कुस्तीतला कोणता पैलवान कोणत्या डावावर किती वेळात जिंकणार हे आपल्या अतीन्द्रिय शक्तीने त्यांनी मला सांगितले.

गमतीची गोष्ट अशी की नेमके त्याच्या विरुद्ध घडले. आम्ही तिथे बसलो असतानाच आम्हाला हे सारे रेडिओवृत्तातून कळले.(त्याकाळी टी.व्ही.नव्हते.) आपण त्या घटनेकडे पाहाण्यासाठी लावलेली दृष्टी चुकीच्या कोनावर लागल्यामुळे असे झाले असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. अर्थातच ते खोटे होते यांत शंका नाही."

पत्रकार .बेहेरे यांनी न विचारता डॉ.वर्तकांनी त्यांना कुस्तीभविष्य का सांगितले त्याचे कारण उघड आहे.

"फलज्योतिषाचा बोजवारा" या पुस्तकातील हा लेख वाचण्यापूर्वी डॉ. वर्तकांची दिव्यदृष्टी, त्यांची अतीन्द्रिय शक्ती, अचूक भविष्यकथन, त्यांचे सूक्ष्म देहाने अंतराळभ्रमण याविषयींच्या बातम्या अधूनमधून वाचल्या होत्या. डॉ. वर्तक वैद्यकशास्त्राचे पदवीधर आहेत. त्यांचा पुण्यात दवाखाना होता.(आता आहे की नाही कल्पना नाही.ते आता वयाच्या पंचाहत्तरीत असतील.) अतीन्द्रिय शक्तीचा दावा ते करीत हे खरे. पण त्यांनी बुवाबाजी केली नाही; लोकांना नादी लावून फसविले नाही. त्यांच्याविषयी असला कोणताच प्रवाद ऐकला/वाचला नाही. मग ते अतीन्द्रिय शक्ती, सूक्ष्मदेहाने मंगळग्रहावर भ्रमण असे दावे का करीत? हेतू काय? केवळ प्रसिद्धीसाठी कोणी हे करील असे वाटत नाही. आपल्यापाशी अलौकिक शक्ती आहेत असे डॉ.वर्तकांना प्रामाणिकपणे वाटत होते असे म्हणावे लागेल. शेवटच्या दहा बारा वर्षांत ते अतीन्द्रिय शक्तीविषयी काही बोलल्याचे ऐकिवात नाही. पण असा दावा ते पूर्वी करत होते तेव्हा त्यांना तसे काही भास, भ्रम होत असावेत.

अशा भ्रमाचे कारण काय बरे असेल? यावर विचार करीत असता मला माझी शाळा (इ.८वी) आठवली. शाळा पुण्यातील मेहुणपुऱ्यात होती. शाळेचा रस्ता वर्तकाश्रमाजवळून होता. वर्तक घराण्यात तपकीर निर्मितीचा व्यवसाय पूर्वापार आहे. वर्तकी तपकीर नावाजलेली होती. तिची निर्मिती वर्तकाश्रमात होई. शाळेत जाता येता तपकिरीचा वास येई. क्वचित शिंकाही येत. कुतूहल म्हणून मी एकदा वाड्याच्या आत जाऊन पाहिले. तिथे चौकात दळलेली तंबाखूपूड वाळत घातली होती. हे दृश्य डोळ्यापुढे आल्यावर वाटले की लहानपणी डॉक्टर इथे भावंडांबरोबर, मित्रांबरोबर खेळले असतील, तेव्हा तंबाखूचे सूक्ष्म कण नाकावाटे आत जाऊन जाऊन त्यांच्या मेंदूच्या विशिष्ट केंद्रावर काही परिणाम झाला असेल का? त्यामुळे भ्रम निर्माण होत असतील का? मला वैद्यकीय ज्ञान नाही, पण अशी एक शक्यता असावी असा आपला एक तर्क आहे एवढेच....य.ना. वालावलकर, २४ एप्रिल, २०११. [व्यक्तिलक्ष्य तर्कदोष]

  1. ^ Ad Hominem ArgumentsStudies in Rhetoric and Communication, Douglas N. Walton, pp. 18–21, University of Alabama Press, 1998, ISBN 9780817309220