Jump to content

चर्चा:शोध

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शोध या संज्ञेचे अनेक अर्थ होतील --

१. एखाद्या वस्तूचा शोध (Invention)

२. एखाद्या वस्तूचा शोध (Search)

या दोन्हींसाठी समर्पक प्रतिशब्द काय आहेत?

अभय नातू ०२:२३, ५ फेब्रुवारी २०११ (UTC)


लेखात शोध हा शब्द Invention या अर्थाने वापरला आहे, ते योग्य नाही. मराठीत हरवलेली वस्तू सापडणवण्यासाठी शोध (Search), आधी अस्तित्वात आहे पण लपली/दडली/झाकली गेली आहे अशी गोष्ट पुन्हा उघड करण्यासाठीही शोध (Discovery), आणि नसलेली वस्तू नव्याने अस्तित्वात अाणण्यासाठी अाविष्कार (Invention) हे शब्द वापरतात. एखाद्या गोष्टीचा केवळ कागदोपत्री शोध घेण्यासाठी संशोधन (Research)हा शब्द आहे. हरवलेली वस्तू एकदा सापडून परत हरवली तर तिला शोधण्यासाठी Re-search हा शब्द आहे. प्रतिशोध म्हणजे बदला/सूड. संशोधित आवृत्ती म्हणजे लिखाणाची दुरुस्त केलेली (Revised) प्रत. मुद्रितशोधन म्हणजे Proof Reading. द्रव्यशोधन म्हणजे धातू, रसायन आदी द्रव्यातून अशुद्धी दूर करणे. तेलसंशोधन, धातूशोधन, बाँबशोधन म्हणजे विशिष्ट ठिकाणी खनिज तेल, धातू, बाँब वगैरे असण्याची शक्यता तपासणे. इत्यादी इत्यादी. .... (चर्चा) १५:०७, ८ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]

discovery साठी 'अनावरणन' हा शब्द योग्य होईल काय?

-नरसीकर

नाही! Uncoverसाठी अनावरण करणे, Inaugeration,Opening Ceremonyसाठी उदघाटन, वगैरे. Discovery म्हणजे निसर्गत: लपलेली किंवा अनवधानाने लपलेली वस्तू हुडकून काढण्याची क्रिया. Uncover (अनावरण) म्हणजे हेतुत: झाकली वस्तू उघडी करणे. Recover म्हणजे पुन्हा पहिल्यासारखे होणे/करणे, परत मिळवणे.

'शोध'च्या आणखी अर्थच्छटा  :- वरसंशोधन, आत्मसंशोधन, इत्यादी..... (चर्चा) २१:५९, ८ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]

आपला आभारी आहे.--वि. नरसीकर (चर्चा) ०३:५९, ९ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]