Jump to content

चर्चा:जव्हार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखातील नविन भाग मशिनने भाषांतरीत केल्यागत वाटत आहे.--वि. नरसीकर १७:३३, १४ डिसेंबर २०१३ (IST)

होय मलाही अशी शंका होती. मशिन ट्रांशलेशनची शंका असलेल्या लेख विभागावर लावण्या करता काही साचे उपलब्ध आहेत. जसे साचा:गूगलमट्रा अनुवादीत,साचा:मट्रा, साचा:ओळीतमट्रा.
दुसरे असेकी या लेख विभागातील बहुतांश मजकुर पर्यटन विषयक आहे.विवीध लेखातील पर्यटन विषयक मजकुर विकिव्हॉयेज या सहप्रकल्पात जावयास हवा. तसा मजकुर वर्गीकृत व्हावा म्हणून मथळा साचा बनवून हवा आहे.किंवा मलाही सवड झाल्यास मीही करेन.विकिव्हॉयेज प्रकल्पात अंशत: स्वैर वर्णनात्मक लेखनास वाव असल्यामुळे तो सहप्रकल्प मराठी विकिपीडियातील नियम जाचक वाटणाऱ्या मंडळींमध्ये लोकप्रीय व्हावयास हवा. मथळा साचे बनवून लावल्यास लोक आपोआप त्या प्रकल्पाकडे जाऊ लागतील असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:१६, १४ डिसेंबर २०१३ (IST)[reply]

  • तूर्तास 'विकिव्हॉयेजमध्ये स्थानांतरीत करण्याजोगे लेख' असा वर्ग बनवून त्यात टाकावयास हवे असे वाटते.यावर प्रशासकांचे काय मत आहे?

--वि. नरसीकर ०९:२३, १५ डिसेंबर २०१३ (IST)

मला वाटते सदस्य @संतोष दहिवळ: यांनी त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने काही काम केले आहे त्यांचेही मत उपयूक्त ठरू शकेल असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२७, १५ डिसेंबर २०१३ (IST)[reply]

जव्हार आणि जव्हार संस्थान

[संपादन]

मला वाटतं सदरील लेख जव्हार आणि जव्हार संस्थान हे दोन्हीं पानं एकाच विषयावर आधारित आहेत. कृपया अवलोकन व्हावे आणि जर तसे असेल तर दोन्ही पानं विलिन करावीत.

जव्हार तालुका हा तिसरा आणि वेगळा लेख आहे.

संतोष गोरे 💬 १८:४९, १४ जानेवारी २०२१ (IST)[reply]