आत्माराम सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आत्माराम कृष्णाजी सावंत (७ मार्च, इ.स. १९३३: हुमरस अण्हेरी, कुडाळ तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक मराठीतले लेखक, नट, नाटककार, दिग्दर्शक, पत्रकार होते. ते कामगार रंगभूमीवरून व्यावसायिक नाटकांत आले.

बालपण कोकणात गेल्यामुळे आत्माराम सावंतांना लहानपणापासून कीर्तनाचीगणपतीत होणाऱ्या मेळ्यांची आवड होती. त्यांचेवडील सामान्य शेतकरी होते. त्यांनी आत्मारामला मॅट्रिकपर्यंत शिक्षण देऊन चाकरीसाठी मुंबईला धाडले. मुंबईत आल्यावर आत्माराम सावंत नव्यानेच सुरू झालेल्या कामगार नाट्यस्पर्धेत सहभागी होऊ लागले. इ.स. १९५३ ते इ.स. १९६० या काळात त्यांनी कामगार नाट्यस्पर्धांसाठी अनेक कौटुंबिक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आणि काही पारितोषिकेही मिळवली.

पत्रकारिता[संपादन]

१९६० ते १९७० या काळात सावंत दैनिक नवाकाळ आणि दैनिक मराठामध्ये पत्रकारिता करत होते. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी आपले अनुभवांवर बेतून शब्दबद्ध केलेली ’चौथा अंक’ आणि खुर्चीचा खेळ’ ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. नवशक्ती, नवाकाळ, मराठा आणि मुंबई सकाळ या विविध वृत्तपत्रांत आत्माराम सावंत यांनी उपसंपादक, सहसंपादक मुख्य संपादक आदी विविध पदांवर काम केले आहे, आणि ते करताना बरेच स्फुट लेखन केले आहे.

१९७०मध्ये आत्माराम सावंत ते परत रंगभूमीकडे वळले. याच काळात त्यांना नाटककार म्हणून अपार लोकप्रियता मिळाली.

आत्माराम कृष्णाजी सावंत यांनी लिहिलेली नाटके[संपादन]

  • आगपेटीतील राक्षस (नाट्यदर्पण पुरस्कारप्राप्त व्यावसायिक नाटक, १९७७)
  • आई म्हणोनी कोणी (व्यावसायिक नाटक)
  • जन्माची गाठ (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
  • ताठ मानेचा माणूस (व्यावसायिक?)
  • तेथे पाहिजे जातीचे (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
  • दरोडा (व्यावसायिक नाटक)
  • माझं कुंकू (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
  • मुजरा घ्या सरकार (व्यावसायिक नाटक)
  • मुलगी (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
  • वरचा मजला रिकामा (व्यावसायिक नाटक)
  • राजकारण गेलं चुलीत (व्यावसायिक नाटक)
  • सत्तेवरचे शहाणे (नाट्यदर्पण पुरस्कारप्राप्त व्यावसायिक नाटक, १९८८)
  • सासरेबुवा जरा जपून (व्यावसायिक नाटक)
  • सूनबाई (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)

आत्माराम सावंत यांचे अन्य लेखन[संपादन]

  • चौथा अंक (अनुभवकथन)
  • खुर्चीचे खेळ (अनुभवकथन)

आत्माराम सावंत यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]