Jump to content

नूरजहान (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नूर जहॉं हा इ.स. १९६७मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट होता. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. सादिक यांचे तर संगीत दिग्दर्शन रोशन यांचे होते. नूर जहॉंमध्ये मीना कुमारी, प्रदीपकुमार, रहमान आणि जॉनी वॉकर यांच्या प्रमुख भूमिका होता.

नूर जहॉं चित्रपटातली शकील बदायुनी यांनी लिहिलेली गाणी अतिशय लोकप्रिय होती. ती गाणी आणि त्यांचे गायक/गायिका अशा :-

१) आ गया लब पे अफ़साना (आशा भोसले, उषा मंगेशकर)
२) आप जब से करीब आयें हैं (मोहम्मद रफी, आशा भोसले)
३) कितने प्यारे दिन आ गये (सुमन कल्याणपूर)
४) किसी सेना कहना (आशा भोसले)
५) मोहब्बत हो गयी है (आशा भोसले)
६) रात की महफ़िल सूनी सूनी (लता मंगेशकर)
७) वोह मुहब्बत वोह वफ़ाएॅं (मोहम्मद रफी)
८) शराबी शराबी येह सावन का मौसम (सुमन कल्याणपूर) (राग कामोद)