विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गप्पा[संपादन]

कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित । म्हणुनी व्यर्थ गप्पात, कालक्षेप करु नये ॥

वि. नरसीकर (चर्चा) ०६:५८, १९ मार्च २०१० (UTC)


चावडीवर हलवाहलव केल्यानंतर कुठे काय नेऊन ठेवलंय याची स्पष्ट सूचना दर्शनी भागात लावावी. नाहीतर नवीन संपादकांचा गोंधळ उडण्याची आणि ही मुद्दाम ढवळाढवळ केल्याची त्यांची भावना होण्याची शक्यता असते. विकीपीडिया हा सार्वजनिक मंच आहे, खासगी दिवाणखाना नव्हे, हे नम्रपणे सुचवावेसे वाटते. - मनोज २०:३४, २४ मार्च २०१० (UTC)

नवीन सदस्यांनी कळले नाही तर इकडेतिकडे बघून, थोडेसे संशोधन करून मग येथील चालीरीतींना नावे ठेवावी. आत्तापर्यंत कोणत्याही नवीन सदस्याचा चावडीवरील (दर्शनी भागातच ठेवलेल्या आणि मराठीतच लिहिलेल्या) चौकटी वाचून गोंधळ झालेला नाही. विकिपीडिया कोणाची खाजगी मालमत्ता नाही हे लक्षात ठेवावे. आपल्याला न कळलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला समजावून देण्यासाठी कोणी बसलेले नाही. प्रश्न विचारल्यास उत्तरे मिळतील. अर्थात हे सगळे नम्रपणेच.
अभय नातू ००:३६, २५ मार्च २०१० (UTC)
मनोजराव,
जर गोंधळ उडत असेल तर जरूर प्रश्न विचारा, पण भाषा थोडी सौम्य ठेवण्यास हरकत नसावी. वाचल्या वाचल्या लोकांच्या डोक्यात तिरीप जाईल असे लिहीले तर लोकांचा वेळ वाया जाऊन विकिपीडियाचाच तोटा होणार आहे हे लक्षात असुद्या. - कोल्हापुरी ०३:५८, २५ मार्च २०१० (UTC)


१) खासगी दिवाणखान्यात आपण स्वतःला हवी तशी हलवाहलव केली तरी चालते, पण कुठल्याही सार्वजनिक व्यवस्थेत जर असे करायचे तर त्याबाबतच्या सूचना संबंधितांपर्यंत तरी पोहोचतील अशा पद्धतीने लिहायला नकोत? माझ्या पहिल्या पोस्टमधून हाच अर्थ निघत नाही का? विकीपीडियावरही सर्व बदल, संपादने करताना त्या बदलाचे स्वरूप आणि कारणे लिहीण्यासाठी व्यवस्था आहे, ती मूळ कर्त्यांनी कशासाठी केली असावी? कोल्हापुरी म्हणतात तसे डोक्यात तिरीप जाणारे त्यात काय आहे? ते खरोखरच तिरीप जाणारे आहे असे वाटत असेल तर अधिक सौम्य असे कसे लिहायचे याचे सोदाहरण मार्गदर्शन करावे असे, कोल्हापुरीजी, आपल्याला आणि आपल्या माध्यमातून इथल्या सर्व सदस्यांना आवाहन.

२) माझी भाषा स्पष्ट, थेट, संयमित आणि सार्वजनिक मंचाला सुयोग्य अशीच आहे. ती तशी नाही किंवा विकिपीडियावर अशी भाषा चालत नाही, अशी माहिती असणारांनी कृपया माझ्या चर्चापानावर येऊन मार्गदर्शन करावे. योग्य पद्धतीने पटवून दिलेले बदल करण्यासाठी मी - न रागावता, डोक्यात तिरीप न घालून घेता - नेहमीच तयार असतो.

३) मला स्वतःलाच चावडीवरच्या आधीच्या पोस्ट शोधायला सुमारे दहा ते तेरा मिनीटे लागली (प्रत्येकाचीच कुशाग्र आणि तैलबुद्धी नसते मंडळी). त्यानंतरच वरील पोस्ट मी लिहीली. आत्तापर्यंत कोणत्याही नवीन सदस्याचा चावडीवरील (दर्शनी भागातच ठेवलेल्या आणि मराठीतच लिहिलेल्या) चौकटी वाचून गोंधळ झालेला नाही. - हे वाक्य आपले श्रीमान प्रबंधक कोणत्या आधारावर लिहितात? आजपर्यंत कुणी लिहिले नाही, याचा अर्थ असे झालेलेच नाही असा घेतला जात आहे की काय? कुणी लिहीले नसेल तर लोक अशा गोष्टी मोकळेपणी का लिहीत नसावेत?

४) महाजालावरच्या बीटा टेस्टींगमध्ये किंवा वाहनांच्या प्रोटोटाईप टेस्ट करताना वापर करणारांच्या हातात देऊन त्यांची मते का घेतली जातात? कारण त्यामुळे त्या यंत्रणा वापर करणारांना किती सोयीच्या आहेत हे तपासता येते. अधिकारी आणि डिझायनरांच्या नजरेतून सुटलेल्या गोष्टी आणि अडचणी ही नवी मंडळीच सांगू शकतात. त्याने सिस्टीम व्यवस्थित बनवता येते, त्रुटी दूर करता येतात, वाढ न होण्याची कारणे आणि वाढ होण्यासाठीचे उपाय सापडू शकतात, हे जगभरात मान्य प्रबंधनाचे तत्व आहे. इथेही नव्यांचा उपयोग अशा पद्धतीने करता येणे शक्य आहे. पण तसे होत आहे, मराठी विकिपीडियावरचे प्रबंधक हे करीतच आहेत, अशी सर्वांची खात्री आहे का? का विधायक सूचनांनाही नावे ठेवणे म्हटले जाते, चालिरीती अशाच आहेत ( अपरिवर्तनीय आहेत ) हे सूचित केले जाते? इंग्रजीसह एकूण विकिपीडियाची वाढ झाली आहे त्यामागे परिवर्तनशील लवचिक तंत्र, वापर करणारांचा मुक्त सहभाग, आणि मुद्द्यांवरची निकोप चर्चा(फक्त भाषेबाबतचीच नव्हे) हीच कारणे आहेत असे माझे मत आहे. अशा तत्वांकडे आकर्षुनच मी इथे आलो आहे. आणि वरीलप्रमाणे विधायक सूचना मी यापुढेही करीत राहणार आहे, वैयक्तिक रागालोभांची पर्वा न करता. - मनोज ०६:२४, २५ मार्च २०१० (UTC)

हे वाक्य आपले श्रीमान प्रबंधक कोणत्या आधारावर लिहितात? आजपर्यंत कुणी लिहिले नाही, याचा अर्थ असे झालेलेच नाही असा घेतला जात आहे की काय?
रा.रा. मनोजराव,
हे वाक्य गेल्या ४-५ वर्षांच्या अनुभवावरुन लिहिले. जोपर्यंत लिहिले जात नाही तोपर्यंत काही होते कि नाही हे कसे कळणार, आँ? सगळेच काही मनकवडे नसतात बुवा.
मला स्वतःलाच चावडीवरच्या आधीच्या पोस्ट शोधायला सुमारे दहा ते तेरा मिनीटे लागली (प्रत्येकाचीच कुशाग्र आणि तैलबुद्धी नसते मंडळी).
आता काय बोलणार? उद्या कोणी येउन म्हणले की मला टंकलेखन करायला शिकवा, माझी तैलबुद्धी नाही तर मग? वाचकांच्या बुद्धीचा लसावि बघून मगच एखादी प्रणाली तयार करावी हे बरोबर, पण प्रत्येक प्रणालीला आपल्या वापर करणार्‍यांत काहीतरी लघुत्तम बुद्धिमत्ता गृहित धरलीच पाहिजे नाहीतर मग अवघड आहे हेसुद्धा हे जगभरात मान्य प्रबंधनाचे तत्व आहे.
तुमचा नव्यांचा उपयोग अशा पद्धतीने करता येणे शक्य आहे या सूचनेचेच स्वागतच आहे पण नवीन मंडळींनी स्वतः situate होईपर्यंत थोडा धीर धरणे आवश्यक आहे नाहीतर फुकट वादावादी होण्याची शक्यता असते, जी आपल्या अनुभवावरुनच सिद्ध झाले.
पण तसे होत आहे, मराठी विकिपीडियावरचे प्रबंधक हे करीतच आहेत, अशी सर्वांची खात्री आहे का
येथे अनेक प्रबंधक आहेत (कोल्हापुरीसुद्धा प्रबंधक आहेत). माझ्या माहिती व अनुभवानुसार जवळजवळ सगळ्यांच नवोदितांच्या सूचनांचे आम्ही (प्रबंधकच नव्हे तर इतर सदस्य सुद्धा) स्वागतच करीत असतो. तुम्ही अपवाद असल्याचे तुम्हाला वाटत असले तर थोडेसे (अगदी किंचित) आत्मपरीक्षण करावे.
का विधायक सूचनांनाही नावे ठेवणे म्हटले जाते, चालिरीती अशाच आहेत ( अपरिवर्तनीय आहेत ) हे सूचित केले जाते?
कोल्हापुरींनी म्हणल्याप्रमाणे सूचना करताना भाषा सौम्य ठेवावी. तुमच्या सूचनेत दिवाणखाना वगैरे भाषा नसती तर अगदी बरे झाले असते. चालीरीती का आहेत हे विचारलेत? की सरळ त्यावर हल्लाच चढवलात? असलेल्या परंपरांना तुम्ही स्वतः विकल्प सुचवा, prototype करून दाखवा आणि मग आपण तोसुद्धा चालवून बघू या. आहे हे असेच राहणार असे असते तर आत्तापर्यंत मराठी विकिपीडिया कधीच बाराच्या भावात गेला असता.
वरीलप्रमाणे विधायक सूचना मी यापुढेही करीत राहणार आहे
दिवाणखान्यात न शिरता सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच आहे.
माझी भाषा स्पष्ट, थेट, संयमित आणि सार्वजनिक मंचाला सुयोग्य अशीच आहे....वरीलप्रमाणे विधायक सूचना मी यापुढेही करीत राहणार आहे
!!! ठीक.
अभय नातू ०६:५५, २५ मार्च २०१० (UTC)

वाचकांच्या बुद्धीचा लसावि बघून मगच एखादी प्रणाली तयार करावी हे बरोबर,ठीक. -मनोज ०७:४४, २५ मार्च २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर लेख कौल आठवण[संपादन]

नमस्कार,

गेले ३-४ महिने मुखपृष्ठ सदर बदलले गेलेले नाही. कौलपानावर तुमचे मत जरुर नोंदवा. सध्या कारगिल युद्ध या लेखाला तीन सदस्यांनी पाठिंबा दिलेला आहे. हा लेख सदर करण्याआधी त्यात शुद्धलेखन, व्याकरण, सत्यतापडताळणी/fact-check, इ.च्या संदर्भाने योग्य ते बदल करावे लागतील. एप्रिल नाही तरी मे महिन्याचे (युद्धाला सुरुवात) किंवा जुलै महिन्याचे (विजयदिन) सदर करण्यासाठी मदत करावी.

अभय नातू ०१:२०, २५ मार्च २०१० (UTC)

निबंधाची पाने[संपादन]

हे इंग्रजी विकिपिडियावरचे पान पहा

Wikipedia:Ten things you may not know about Wikipedia

हा निबंध आहे असे त्यात वर म्हटले आहे. ही निबंधाची कल्पना मराठी विकिपीडियावर दिसली नाही. हे आणि अशी पाने यावीत असे वाटते मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने सारखे पानही निबंधाचे पान म्हणून ट्रीट करता येईल. काय म्हणता? -मनोज ०८:२३, २५ मार्च २०१० (UTC)

इंग्रजी विकिपीडियावरील निबंधसुद्धा विकिपीडियाच्या स्वतःबद्दल माहिती देण्या संदर्भापर्यंत मर्यादित आहेत. विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय प्रकल्पात Wikipedia:Ten things you may not know about Wikipedia प्रमाणे काही मुद्दे घेतल्याचे आठवते पण नेमके पान शोधून निर्देशकरणे कार्य बाहूल्यामूळे जमेल असे दिसत नाही.
मूळ लेखन किंवा स्वतःच्या विचारांचे माहिती देणारे लेखन विकिपीडियास अभिप्रेत नाही कारण कोशांचा आधार विश्वासार्हता असावयास हवा म्हणजे आपण येथे लिहितो त्यास सहसा दुजोरा हवा.117.195.39.8 ०७:०२, २८ मार्च २०१० (UTC)
मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने हा विषय अनेक थोरा-मोठ्यांनी अनेकदा हाताळला असताना संदर्भांची वानवा भासण्याचे कारण नाही तो कोशिय स्वरूपात राहू शकतो.आपला स्वतःस निबंध किंवा व्यक्तिगत लेखना करिता असंख्य इतर मराठी संकेतस्थळे उपलब्ध आहेतच.117.195.39.8 ०७:०२, २८ मार्च २०१० (UTC) ~


Wikipedia:Ten things you may not know about Wikipedia येथील निबंध आपण आणत असाल तर ते स्वागतार्हच आहे.इंग्रजी विकिपीडियावरुन आणण्यालायक अजुनही बर्‍याच गोष्टी आहेत त्याचाही जरुर विचार करावा ही विनंती.आपल्या विकिपीडियावर महाराष्ट्रीय छायाचित्रांचीपण गरज आहे.त्यातही योगदान करता आले तर बघावे.

>मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने सारखे पानही निबंधाचे पान म्हणून ट्रीट करता येईल.<

मला वाटते हे प्रचालकाच्या कार्यक्षेत्रात येते. त्यांना वाटेल तर ते करतील.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:५६, २५ मार्च २०१० (UTC)


विकिकरणात सहकार्य हवे[संपादन]

मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश हा चेतना प्रधान (विभागीय साहाय्यक संचालक, भाषा संचालनालय यांनी आपला हा निबंध "कोश वाङमय ज्ञानप्राप्तीचे प्रभावी साधन" या ऐक्यभारती संशोधन संस्था आणि पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयूक्तपणे आयोजित कार्यशाळेत दिनांक १७ जानेवारी रविवार २०१० रोजी वाचला गेला.सभेतच हा निबंध प्रताधिकार मुक्त स्वरूपात आंतरजालावर प्रसिद्धीस उपलब्ध करावा अशी विनंती केली होती ती त्यांनी मान्य केली.मराठी टंलकलेखीत मुद्रणाची आवृत्ती विजय पाध्ये यांनी utf8 यूनिकोडीत केली आंतरजालीय व इतरत्र मुक्त प्रकाशनास मान्यता पुन्हा एकदा नक्की केल्याचे कळवले. लेखाच्या प्राथमिक विकिकरणास श्री विजय नरसिकरयांनी हात भार लावला.

हा लेख मराठी विकिपीडीयावर विकिपीडिया:धूळपाटी२४ येथे उपलब्ध आहे.हा दुवे सांधणीनंतर मराठी विकिबूक्स(सध्या आपण मूळलेखन स्रोत विकिबुक्सवर ठेवत आहोत) आणि इतर मराठी संकेतस्थळांवर जसाच्या तसा लावावा असा मानस आहे.

यातील मंडळाचे परिभाषा निर्मितीचे काम कसे चालते हि माहिती विश्वकोशिय असल्यामुळे संबधीत विकिपीडिया लेखात घेण्या जोगी आहे.
पारिभाषिक शब्द का केव्हा आणि कसे योजावेत याबद्दलची लेखिकेची भूमिका समतोल विचाराची आहे त्यामूळे त्यातील काही चांगले मुद्दे मराठी विकिपीडियाची निती म्हणून स्विकारण्या संदर्भाने साधबाधक चर्चेनंतर सहमती घ्यावी असेही वाटते.
मी कार्य बाहूल्यामुळे व्यस्त आहे हे खरे आहे , विकिपीडिया:धूळपाटी२४ येथे लेखातील लाल दुव्यात नवे लेख बनवून मिळतील व अधिक चांगले विकिकरणात सगळ्यंनी थोडा थोडा हातभार लावल्यास इतर मराठी संकेतस्थळांवर ह लेख प्रकाशित करणे सोपे जाईल.माहितगार १८:४७, ३० मार्च २०१० (UTC)

नविन्[संपादन]

मि नविन आहे मला च्रर्चा पान वाचता येत नाहि

  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
  1. ...
  2. ...





धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
INTARFELL १३:००, २८ एप्रिल २०१० (UTC)~~

महाराष्ट्रच्या जिल्हा[संपादन]

There is a very good collection of articles related to the districts of Maharashtra in Marathi at DES website. The files in pdf can be converted using webdunia conversion tool to convert CDAC (DVB TT Surekh) to unicode. I think these are very good reference materials to elaborate articles about the districts of Maharashta. --Eukesh १३:३३, ५ मे २०१० (UTC)

  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
  1. ...
  2. ...





धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:prakash kulkarni mi aaj navin sabhasad zalo aahe pratham sarvana maza namskar
{{{1|Prakash kulkarni ०५:५३, ७ मे २०१० (UTC)~~}

लेखात लेखन योगदान हवे[संपादन]

आपल्या सवडीने अभिव्यक्त होणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या आणि संबधीत लेखात लेखन/संपादन/भाषांतर योगदान हवे आहे.माहितगार ०८:४५, २० मे २०१० (UTC)


माहितगार १२:४५, २१ डिसेंबर २००९ (UTC)

मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने[संपादन]

मराठी विकिपीडीयावरील मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने लेखात संदर्भ रहित आणि मराठी विकिपीडीयाच्या सदस्यांचे स्वतःचे व्यक्तीगत मतांचे प्रतिबिंब अपेक्षीत नसूनही ते टाळण्याचा मागील संपादनातून प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.लेख अजूनही अविश्वकोशिय स्वरूपात आहे. हा लेख मी पूर्णपणे नव्याने लिहू इच्छितो. सद्य स्थितीतील बराच मजकुर वगळला जाण्याची शक्यता आहे. ज्यांना कुणाला सध्याचा मजकूर हवा असेल त्यांनी तो इतरत्र हवा असेल त्यानी तसे लौकरात लवकर करून घ्यावे ही नम्र विनंती.
माहितगार ०९:१२, २५ मे २०१० (UTC)