तारिक अन्वर
Appearance
तारिक अनवर ( जानेवारी १६,इ.स. १९५१) हे भारतीय राजकारणी आहेत.ते शरद पवार आणि पी.ए. संगमा यांच्याबरोबर सोनिया गांधींच्या विदेशी मूळ प्रश्नावरून इ.स. १९९९ मध्ये काँग्रेस पक्षाबाहेर पडले. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील कटिहार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. २०१४ पासून ते लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा नेते होते. अलीकडे त्यांनी खासदारकी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला व राहुल गांधींच्या नेतृत्वात परत काँग्रेसमध्ये सामील झाले.