Jump to content

ऑट्टो रेहागेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑट्टो रेहागेल

ऑट्टो रेहागेल (जर्मन: Otto Rehhagel; ९ ऑगस्ट, १९३८ (1938-08-09), एसेन, जर्मनी) हा एक माजी जर्मन फुटबॉलपटू व फुटबॉल प्रशिक्षक आहे. तो २००१ ते २०१० दरम्यान ग्रीस राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होता. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली ग्रीसने युएफा यूरो २००४ स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले व २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

त्याने आजवर जर्मनीच्या बुंडेसलीगामध्ये खेळलेल्या वेर्डर ब्रेमन, बोरुसिया डॉर्टमुंड, आर्मिनिया बीलेफेल्ड, बायर्न म्युनिक, १. एफ.से. काइझरस्लाउटर्नहेर्था बे.एस.से. ह्या क्लबांना प्रशिक्षण दिले आहे. तो बुंडेसलीगाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक मानला जातो.

बाह्य दुवे

[संपादन]