सुधा मूर्ती
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सुधा कुळकर्णी-मूर्ती | |
|---|---|
सुधा कुळकर्णी-मूर्ती |
|
| जन्म | सुधा कुळकर्णी-मूर्ती १९ ऑगस्ट, इ.स. १९५० शिगगाव,कर्नाटक. |
| इतर नावे | सुधा मूर्ती |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | सामाजिक कार्य, अभियंत्रिकी, लेखिका. |
| भाषा | मराठी, कन्नड |
| पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार (इ.स. २००६) |
| पती | एन.आर. नारायण मूर्ती |
| अपत्ये | रोहन (मुलगा), अक्षता (मुलगी). |
सुधा कुळकर्णी-मूर्ती (१९ ऑगस्ट, इ.स. १९५० ; शिगगाव, कर्नाटक - हयात) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. इन्फोसिस फाउन्डेशन या एक सामाजिक कार्य करणार्या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्या कॅलटेक (अमेरिका) ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच जयश्री कुळकर्णी-देशपांडे(प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्नी) ह्यांच्या बहीण आहेत.
अनुक्रमणिका |
पूर्वायुष्य [संपादन]
सुधा मूर्ती यांचा जन्म इ.स. १९५० साली झाला. त्यांनी एम.टेक. केले आहे. टेल्को या कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या.
प्रकाशित साहित्य [संपादन]
- महाश्वेता (कानडी व इंग्रजी)
- वाइज अॅन्ड अदरवाइज (इंग्रजी),(मराठी)
- डॉलर बहू (इंग्रजी)(मराठी)
- परिधी (कानडी)[1]
- जेन्टली फॉल्स द बकुला (इंग्रजी)
- द मॅजिक ड्रम अॅन्ड द अदर फेव्हरिट स्टोरीज (इंग्रजी)
- हाउ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अॅन्ड अदर स्टोरीज(इंग्रजी)
- द ओल्ड मॅन अॅन्ड हिज गॉड(इंग्रजी)
- बकुळा
पुरस्कार [संपादन]
- श्री राणी-लक्ष्मी फाऊंडेशन कडून १९ नोव्हेंबर, इ.स. २००४ रोजी राजलक्ष्मी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. [१]
- इ.स. २००६ - भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.
- इ.स. २०१० - भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार एम.आय.टी.कॉलेज तर्फे देण्यात आला.
- सत्यभामा विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट पदवी देण्यात आली
संदर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- सुधा मूर्ती यांचा परिचय. (इंग्लिश मजकूर)
- राजलक्ष्मी पुरस्कार. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |