विश्वनाथन आनंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विश्वनाथन आनंद
AnandWM2008.Presse.Konf.jpg
पूर्ण नाव विश्वनाथन आनंद
देश भारत
जन्म डिसेंबर ११, इ.स. १९६९ (1969-12-11) (वय ४२)
चेन्नई, तमिळनाडू, भारत
पद ग्रँडमास्टर -१९८८
विश्व अजिंक्यपद २०००-२००२ (फिडे), २००७, २००८, २०१०-सद्य (अविवादीत)
फिडे गुणांकन २८०४
(क्र. १, नोव्हेंबर इ.स. २०१० फिडे गुणांकन यादी)
सर्वोच्च गुणांकन २८०४ (नोव्हेंबर इ.स. २०१०)

विश्वनाथन आनंद (तामिळ: விசுவநாதன் ஆனந்த்) हा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे व तो सध्याचा जगज्जेता आहे. FIDE फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता.

अनुक्रमणिका

[संपादन] जगज्जेतेपद

[संपादन] २०००

आनंदने २००० मध्ये फिडेचे जगज्जेतेपद क्नॉक-आऊट स्पर्धेमध्ये जिंकले. अंतिम सामन्यात त्याने स्पेनच्या अलेक्सी शिरोवला ३.५ - ०.५ अशी मात दिली.

[संपादन] २००७

मेक्सिको शहरात झालेली जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून तो २९ सप्टेंबर २००७ रोजी जगज्जेता झाला. आनंदने ह्या स्पर्धेत १४ पैकी ९ गुण मिळविले. तो ह्या स्पर्धेत एकही सामना हरला नाही. त्याने इतर स्पर्धकांपेक्षा एक पूर्ण गुण अधिक मिळवला.

[संपादन] २००८

२००८ मधे आनंदने रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकला ६.५ - ४.५ असे हरवुन जगज्जेतेपद आपल्यापाशीच ठेवले. क्रॅमनिक व आनंद हे आजपर्यंत ६४ सामने खेळले आहेत.

[संपादन] २०१०

२०१० मध्ये आनंदने बुल्गेरियाच्या टोपोलोवला बुल्गेरियामध्ये ६.५ - ५.५ असे हरवून पुन्हा एकदा जग्गजेतेपद आपल्यापशिच ठेवले.

[संपादन] २०१२

२०१२ मध्ये आनंद पुन्हा एकदा जगज्जेतेपद आपल्याजवळ राखण्यासाठी लढेल.

[संपादन] पुरस्कार

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये