विल्यम शेक्सपियर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शेक्सपियर हा इंग्रजी भाषेतला जगप्रसिध्द लेखक आहे. त्याचे साहित्य अजरामर व अभिजात आहे. शेक्सपियरच्या शोकांतीका विशेष नावाजलेल्या आहेत.
जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपियर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपियर यांच्या नाटकांचे भाषांतर झाले आहे. गेली चार शतके शेक्सपियर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.
विल्यम शेक्सपियर यांचा जन्म इंग्लंड देशातील वार्विकशायर भागाच्या (काऊण्टी)एव्हन नदीच्या किनार्यावरील स्ट्रॅटफोर्ड-ऑन-एव्हन या गावात १५६४ साली झाला. त्यांचे वडील जॉन हे स्ट्रॅटफोर्ड गावातील एक व्यापारी होते तर रॉबर्ट आर्डेन नामक एका जमीनदाराची कन्या मेरी ही विल्यमची आई.
वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात लॅटीन भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटीन, फ्रेंच आणि इटालियन भाषा शिक्षणासह चर्च मधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खुप असे समाधान करून घेत, मोठ्या कष्टाने विल्यमने देवाचे भक्ती गिते आणि चर्च मधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.
१५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे वडील असलेल्या अॅन हॅथ्वे नावाच्या मुलीशी लग्न केले. १५८५ साली विल्यमने आपले गाव सोडून लंडन गाठले. तेथे लॉर्ड चेंबरलिन यांच्या नाटक कंपनीत एका कलाकाराऐवजी विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले. हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणार्या नाटकात बदल करायला सुरूवात केली तसेच नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली.
विल्यमने स्वतःची नाटके लिहून ती सादर करायला सुरूवात केली आणि लोकांना ती आवडायलाही लागली. त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रत तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्यांच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरूवात केली. या काळात विल्यम शेक्सपियर यांनी ३६ नाटके, १५४ सुनिते लिहिली.
हळूहळू नाटकांची प्रसिद्धी वाढत गेली, विल्यमचे उत्पन्न वाढत गेले. ग्लोब थिएटर नावाच्या थिएटर मध्ये ते भागीदार झाले. नाटकांना व्यवसायाचे साधन मानणारे विल्यम शेक्सपियर स्वतःची नाटके या थिएटर मध्ये करू लागले, मिळणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढले.
१६१० साली शेक्सपियर पुन्हा आपल्या स्ट्रॅटफोर्ड गावात येऊन राहू लागले, ते कामापुरतेच लंडनला जातयेत असत. १६१६ साली स्ट्रॅटफोर्ड या गावातच विल्यम शेक्सपियर यांनी शेवटचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला.
नाटके
शेक्सपियर यांनी ३६ नाटके स्वतंत्रपणे आणि एक नाटक Pericles संयुक्तपणे लिहिले. त्यांच्या नाटकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते
Pure Romantic Plays : The Two Gentlemen of Verona, Love's Labours Lost, A Midsummer Night's Dream, As You Like It, Twelfth Night.
Serious Plays : Much Ado About Nothing, All's Well That Ends Well, The Merchant Of Venice, Measure For Measure.
Realistic or Farcical Plays : The Taming Of The Shrew, The Merry Wives Of Windswor.
Tragedies : Hamlet, King Lear, Othello, Macbeth, Romeo & Juliet.
Romances : Cymbeline, The Tempest, The Winter's Tale
Histories : Richard II, Richard III, Henry IV, Henry V, Henry VIII.
Roman Plays : Julius Caesar, Antony & Cleopatra, Coriolanus.