ली ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ली ना (२०१० मोसमातल्या श्टुटगार्ट करंडक स्पर्धेत)
हे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे.

लि ना अथवा ली ना (चिनी लिपी: 李娜; फीनयीन: Lǐ Nà) (फेब्रुवारी २६, इ.स. १९८२; वूहान, हूपै, चीनचे जनता-प्रजासत्ताक) ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. जानेवारी, इ.स. २०११मध्ये तिने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. किम क्लिस्टर्स हिने तिला अंतिम सामन्यात हरवल्यामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र लगेचच जून, इ.स. २०११मध्ये फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटालियन टेनिसपटू फ्रांचेस्का स्क्यावोने हिला अंतिम फेरीत हरवत तिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये एकेरीचे अजिंक्यपद पटकावणारी ती पहिली आशियाई खेळाडू ठरली.

विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या इ.स. २००६ सालातील मोसमात उपउपांत्य फेरीत पोचून अशी कामगिरी करणारी पहिली चिनी खेळाडू होण्याचा मान तिने पटकावला. इ.स. २००९ सालातील अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत, तर इ.स. २०१० साली पुन्हा एकदा विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत तिने उपउपांत्य फेरीपर्यंत दौड मारली.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • ली ना. आयटीएफटेनिस.कॉम. (इंग्लिश मजकूर)



Wiki letter w.svg
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.