राधानगरी धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राधानगरी धरण

धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
भोगावती नदी
स्थान फेजीवडे, राधानगरी तालुका, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस ५५७० मि.मी.
लांबी १०३७ मी.
उंची ३८.४१ मी.
बांधकाम सुरू १९०९
उद्‍घाटन दिनांक १९५४

1st Stage : १९०९-१९१८ 2nd Stage : १९३९-१९५४

ओलिताखालील क्षेत्रफळ १७२३ हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता २३६.७९ दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ १८.१३ वर्ग कि.मी.
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या
स्थापित उत्पादनक्षमता १० मेगावॉट

राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यातील एक धरण आहे. हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी व वीज निर्मितीसाठी होतो.

राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. एका छोट्या संस्थानाच्या बचतीमधून इ.स. १९०७ मध्ये शाहू महाराजांनी राधानगरी या धरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी धरणाची योजना पुढे आणली. ९ फेब्रुवारी १९०८ला गाव नव्याने वसवून त्या गावाचे नाव "राधानगरी' ठेवण्यात आले. १९०९ मध्ये धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. १९१८ पर्यंत धरणाचे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले. पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी ओळखले जाते.

कोल्हापूरची तहान भागवणारी राधानगरी तालुक्यातील मुख्य धरणे :

1) लक्ष्मी तलाव: कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील लक्ष्मी तलाव म्हणजेच राधानगरी धरण. बरोबर 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराची तहान ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर या धरणाची निर्मिती केली. देशात कोणत्याही धरणाला स्वयंचलीत दरवाजांची सुविधा नसेल असं तंत्र इथं वापरण्यात आलं. तब्बल 7 टी.एम.सी क्षमता असलेल्या धरणाच्या या भिंती आजही भक्कमपणे उभ्या आहेत. या धरणाचं बांधकाम हे दगडांमध्ये करण्यात आलंय. या विशिष्ट बांधकाम प्रकारावरूनच या धरणाचं बांधकाम किती भक्कम आहे याची प्रचिती येते. चुना आणि शिसे यांचं मिश्रण करून या धरणाची बांधणी केली. ती इतकी भक्कम आहे की 100 वर्षानंतरही धरण धिप्पाड उभं आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी 1908 साली या धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. हे धरण बांधण्यासाठी महाराजांनी दगडी बांधकामाचा प्रकार निवड लाया धरणाची उंची 38.41 मीटर आहे, तर लांबी 1037 मीटर आहे .धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी 7 स्वयंचलीत दरवाजे बसवले आहेत धरण पूर्ण क्षमतेने भरताच यापैकी एक-एक दरवाजा उघडला जातो. ज्यावेळी राधानगरी धरण 100 टक्के भरेल, त्यावेळी याच दरवाजातून पाण्याचा विसर्ग होतो. अशा पद्धतीचं तंत्र अजून तरी देशातील कोणत्याही धरणावर बसवण्यात आलं नाही.

धरणाची माहिती[संपादन]

बांधण्याचा प्रकार : दगडी
उंची  : ३८.४१ मीटर (सर्वोच्च)
लांबी  : १०३७ मीटर

दरवाजे[संपादन]

प्रकार : स्वयंचलित
लांबी : १०६.६८ मीटर.
सर्वोच्च विसर्ग : सेकंदाला २८३ घनमीटर
संख्या व आकार : ७( १४.४८ X १.५२ मी)

पाणीसाठा[संपादन]

ओलिताखालील क्षेत्र

क्षेत्रफळ  : १८.१३ चौरस कि.मी.
क्षमता  : २३६८ लक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २२०० लक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : १७२३ हेक्टर
ओलिताखालील गावे  : ८

कालवा[संपादन]

या धरणातून कालवा काढण्यात आलेला नाही.

ओलिताखालील क्षेत्र  : ५९११० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ४७२८८ हेक्टर

वीज उत्पादन[संपादन]

जलप्रपाताची उंची  : 27 मी
जास्तीतजास्त विसर्ग  : २७.३० क्युमेक्स
निर्मिती क्षमता  : ४.८ मेगा वॅट
विद्युत जनित्र  : ४ X १.२ मेगा वॅट

२) तुलसी धरण :