ब्रेनर पास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रेनर पास तथा पासो देल ब्रेनेरो हा आल्प्स पर्वतरांगेतील एक घाट आहे. इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवरील हा घाट पूर्व आल्प्समधील महत्वाचा आणि सगळ्यात कमी उंचीचा घाट आहे. या घाटाच्या एका बाजूस ऑस्ट्रियाचे इन्सब्रुक आणि दुसऱ्या बाजूस इटलीचे बोल्झानो शहर आहे. या घाटातून महामार्ग आणि रेल्वेमार्ग दोन्ही शहरांना जोडतात.

घाटमाथ्यावर ब्रेनर गाव असून येथे तुरळक वस्ती आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान १८ मार्च, १९४० रोजी जर्मनीच्या ॲडॉल्फ हिटलर आणि इटलीच्या बेनितो मुसोलिनी यांनी दोन्ही देशांमध्ये समझौता करून अक्ष राष्ट्रांची फळी निर्माण केली.