बिल गेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बिल गेट्स
जन्म २८ ऑक्टोबर १९५५
सिऍटल, वॉशिंग्टन, यु.एस.ए.
राष्ट्रीयत्व अमेरिकन
भाषा इंग्लिश
वडील विल्यम्स एच. गेट्स
आई मॅरी मॅकसवेल गेट्स
पत्नी मेलिंडा गेट्स

विल्यम हेनरी "बिल" गेट्स ३रे (ऑक्टोबर २८, इ.स. १९५५- हयात) हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. अमेरिकन व्यवहारिक जगतात त्यांचा मोठा वाटा आहे तसेच परोपकरी (मदत करणारे) म्हणुनसुद्धा ते प्रसिद्ध आहेत. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी पॉल एलीन आणि बिल गेट्स यांनी अस्तित्वात आणली. इ.स. २००९ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून त्यांची ख्याती होती. इ.स. २०११ मध्ये बिल गेट्स यांचे जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत दुसरे स्थान व अमेरिकेच्या श्रीमंत लोकांच्या यादीत पहिले स्थान होते. मायक्रोसॉफ्टमधे असताना ते सॉफ्टवेअर बांधणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. तसेच, गेटस् यांच्याकडे कंपनीचे सर्वाधिक वैयक्तिक शेअर्स (८ टक्के) आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही प्रकाशित केलेली आहेत.

बिल गेट्स यांचा जन्म सीटल, वॉशिंगटन येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम्स ऐच. गेट्स व आईचे नाव मॅरी मॅकसवेल गेट्स आहे.त्याचे आईवडील इंग्लिश,जर्मन,स्कॉट-आयरिश वंशाचे आहेत.बिल गेट्स यांच्या मोठ्या बहिणीचे नाव क्रिस्टी व छोट्या बहिणीचे नाव लिबी आहे.

विकिक्वोट
बिल गेट्स हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.Speech in Cultural Progarmme::::

बिल गेट्स मित्रहो, बील गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी १० नियम सांगीतल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत. या भाषणात बील साहेबांनी आपल्या रुढ शिक्षण पद्धतीवर चांगलेच आसुड ओढलेत, सतत आदर्शवादाचा पुरस्कार करणारी आपली शिक्षण पद्धती मुलांना वास्तवापासुन दूर नेते आणि त्यामुळेच आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात अशा काही पिढ्या मागे सरत चालल्यात असे बील गेट्स यांचे मत आहे.

नियम १ - आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
नियम २ - जग कधीच
तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
नियम ३ - कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आ़कडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात . 
नियम ४ - आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
नियम ५ - तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय ह सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा. 
नियम ६ - तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे. 
नियम ७ - उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात
हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
नियम ८ - आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
नियम ९ - टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.
नियम १० - सतत अभ्यास करणारया आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल .