फिराक गोरखपुरी
| 'रघुपति सहाय' | |
| पूर्ण नाव | रघुपति सहाय |
| टोपणनाव | फिराक गोरखपूरी |
| जन्म | ऑगस्ट २८, इ.स. १८९६ गोरखपूर |
| मृत्यू | मार्च ३, इ.स. १९८२ नवी दिल्ली |
| कार्यक्षेत्र | उर्दू साहित्य |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| साहित्यप्रकार | गझल, नज्म, रूबाई |
| प्रसिद्ध साहित्यकृती | गुल-ए-नग्मा |
| पुरस्कार | नेहरू पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार |
| पत्नी | किशोरी देवी |
रघुपती सहाय (उर्दू: فراق گورکھپوری (ऑगस्ट २८, इ.स. १८९६ गोरखपूर, उत्तरप्रदेश - मार्च ३, इ.स. १९८२ नवी दिल्ली) हा उर्दू साहित्यिक होता. फिराक गोरखपूरी या नावाने प्रसिद्ध.
अनुक्रमणिका |
जीवन [संपादन]
फिराक गोरखपूरी यांचा जन्म उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे २८ ऑगस्ट इ.स. १८९६ साली झाला होता. त्यांचे शिक्षण अरबी, फारसी आणि इंग्रजी भाषेतून झाले. यांचा विवाह किशोरी देवी यांच्याबरोबर २९ जून इ.स. १९१४ साली झाला. इ.स. १९२० मध्ये आय.सी.एस. ची नोकरी सोडून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्यासाठी त्यांना दिड वर्षाचा तुरूंगवासही भोगावा लागला होता. तुरुंगवास संपल्यावर पंडित नेहरूंनी त्यांना भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात सचिवपद दिले होते. हे पद सोडल्यानंतर फिराक गोरखपूरी यांनी इ.स. १९३० पासून इ.स. १९५९ पर्यंत अलाहाबाद विश्वविद्यालयात अध्यापक म्हणून काम केले.[१]
साहित्य [संपादन]
उर्दू कवितासंग्रह
|
|
कादंबरी
- साधु और कुटिया
पुरस्कार [संपादन]
- साहित्य अकादमी पुरस्कार गुल-ए-नग्मासाठी
- ज्ञानपीठ पुरस्कार गुल-ए-नग्मासाठी
- पद्मभूषण पुरस्कार
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ रघुपति सहाय फ़िराक़’ गोरखपुरी. २७ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. (हिंदी मजकूर)