पोप ग्रेगोरी पंधरावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रेगोरी पंधरावा (जानेवारी ९, इ.स. १५५४:बोलोन्या - जुलै ८, इ.स. १६२३:रोम) हा फेब्रुवारी ९, इ.स. १६२१ ते मृत्युपर्यंत पोप होता.

याचे मूळ नाव अलेस्सान्द्रो लुडोविसी होते. लहानपणी रोम येथे जेसुइट शिक्षण घेतल्यावर उच्चशिक्षणासाठी हा बोलोन्या विद्यापीठास गेला व तेथे धर्मग्रंथ व कायद्याची पदवी मिळवली. इ.स. १६१२मध्ये पोप पॉल पाचव्याने अलेस्सान्द्रोला बोलोन्याचा आर्चबिशप नेमला व सव्होयस्पेनमध्ये मध्यस्थी करण्यास प्रतिनिधी म्हणून पाठवले. पॉल पाचव्याच्या मृत्युनंतर अलेस्सान्द्रो रोमला पोपच्या निवडणुकीसाठी गेला. तेथे त्याला पोपपदी निवडण्यात आले. त्याने स्वतःला ग्रेगोरी पंधरावा हे नाव दिले.

पोपपदी बसल्याच्या तिसऱ्या दिवशी ग्रेगोरीने आपल्या पुतण्याला कार्डिनल केले व आपल्या भावास सेनापतीपदी नेमले.

पवित्र रोमन सम्राट फर्डिनान्ड दुसऱ्याला प्रोटेस्टंट सैन्याविरूद्ध व पोलंडच्या सिगिस्मंड तिसऱ्याला तुर्कस्तानविरूद्ध मदत करण्याव्यतिरीक्त ग्रेगोरीने युरोपच्या राजकारणात फारशी ढवळाढवळ केली नाही.

ग्रेगोरी नंतर अर्बन आठवा पोपपदी आला.

मागील:
पोप पॉल पाचवा
पोप
फेब्रुवारी ९, इ.स. १६२१जुलै ८, इ.स. १६२३
पुढील:
पोप अर्बन आठवा