पळस मैना
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
[संपादन] चित्रदालन
मराठी नाव : पळस मैना, भोरडी
हिंदी नाव : गुलाबी मैना
संस्कृत नाव : पाटल सारिका
इंग्रजी नाव : Rosy Starling, Rosy Pastor, Rosecoloured Starling
शास्त्रीय नाव : Sturnus roseus
पळस मैना हा मैनेसारखा हा मुख्यत्वे गुलाबी रंगाचा पक्षी असून याचे डोके, गळा, छाती, पंख, शेपटी काळ्या रंगाची आहे. याच्या डोक्याच्या मागील भागावर मानेकडे येणारी शेंडी असते.
पूर्व युरोप, पश्चिम व मध्य आशिया येथून पळस मैना हिवाळी स्थलांतर करून जुलै-ऑगस्ट महिन्यात भारतात येणारा पक्षी आहे. शेताचे खुले क्षेत्र ते निमवाळवंटी प्रदेश हे याचे आवडते ठिकाण आहे. शेतातील कीट, वड, पिंपळ वृक्षांच्या बिया, सेमल फुलांचे मध हे याचे प्रमुख खाद्य आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |