वड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र
वटवृक्ष
वडाची पाने व फळे

वड (मराठी नामभेद: वटवृक्ष ; शास्त्रीय नाव: Ficus benghalensis, फायकस बेंगालेन्सिस ; इंग्लिश: banyan, बन्यान ;) हे भारतीय उपखंडात आढळणारे एक मोठे झाड आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. याच्या खोडांतून फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या मुळ्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातून या झाडाच्या मुख्य खोडाभोवती मुळ्यांतून उपजलेल्या खोडांचा विस्तार वाढत दिसतो.

सांस्कृतिक महत्त्व [संपादन]

वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण याच वटवृक्ष झाडाशी संबंधित आहे. हा मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

बाह्य दुवे [संपादन]


"http://mr.wikipedia.org/w/index.php?title=वड&oldid=1164207" पासून मिळविले