सांवर
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.हा ज्येष्ठा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.हे एक मोठे झाड असुनही याचे खोडास कांटे असतात. म्हणुन याला कांटेसांवर असेही म्हणतात.
| सांवर |
|---|
|
जीवचौकट (संपादन)
वनस्पती प्रकल्प (संपादन)
|
वर्णन [संपादन]
सांवर, यांस Bombax कुळातील इतर झाडांप्रमाणेच,कापसाचे झाड म्हणुनच ओळखले जाते. या झाडाचे खोड सरळ व उंच असते.५ पाकळ्यांची लाल फुले लागणारे हे झाड आहे.हिवाळ्यात याची पाने गळतात व वसंत ऋतु मध्ये नव्या पालवीपुर्वी त्याला फुले येतात.त्यास नंतर फळे येतात.ही पिकल्यानंतर यात कापसासारखे तंतु असतात.जनावरांच्या पाठ घासण्यापासुन वाचण्यासाठी याच्या खोडास काटे असतात.त्याचे खोड बघुन असे वाटते की यापासुन चांगले लाकुड मिळु शकते परंतु, याचे लाकुड फारच नरम असते.
लागवड [संपादन]
हे झाड मलय राज्यात लावले जाते. इंडोनेशिया, दक्षिणचिन, हाँगकाँग व तायवान इत्यादी ठिकाणी आढळते.भारतात बंगालमध्ये आणि हिंदी भाषा भागात याला सेमल म्हणुन ओळखतात.याच्या सुंदर दिसणाऱ्या फुलांमुळे यास अनेक ठिकाणी लावले जाते. हे ६० मिटर उंचीपर्यंतसुद्धा वाढू शकते.
वापर [संपादन]
यातुन निघणारा कापुस हा साध्या कापसास पर्याय म्हणुन वापरता येतो.तो अत्यंत मउ असतो.या झाडाचे संस्कृत नाव "शाल्मली" आहे.ऋग्वेदात,(ऋग्वेद-१०.८५.२०) यापासून यापासून रथ बनवित असत असा उल्लेख आहे.
बाह्य दुवे [संपादन]
चित्र दिर्घा [संपादन]
-
जयंती ,जलपैगुडी जिल्हा पश्चिम बंगाल, भारत येथिल वृक्षाची नवीन पाने व फळे .
-
जयंती ,जलपैगुडी जिल्हा पश्चिम बंगाल, भारत येथिल वृक्षाचे खोड .
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल एक कोवळे झाड.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल एक जूने झाड.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल एका झाडाची पाने.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल एका झाडाची पाने(मागील बाजु).
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल एका झाडाची पाने.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल दृश्य.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल सांवर.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल सांवरीच्या झाडाची फुले.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल सांवरीचे फुले येत असलेले झाड.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल सांवरीची फुले.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल सांवर.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल सांवरीची पडलेली फुले.
-
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथिल सांवरीचे खोड.