टंग्स्टन
(W) (अणुक्रमांक ७४) रासायनिक पदार्थ. टंग्स्टन म्हणजे वजनदार दगड, तर जर्मन शब्द वोल्फ्रॅम म्हणजे कोल्ह्याचे भक्ष्य असाही याचा अर्थ आहे.
|
||||||
| सर्वसाधारण गुणधर्म | ||||||
|---|---|---|---|---|---|---|
| नाव, चिन्ह, अणुक्रमांक | , , | |||||
| दृश्यरूप |
|
|||||
| अणुभार | ग्रॅ·मोल−१ | |||||
टंग्स्टनचा वितळणबिंदू ३४००° से. असून याचा उकळणबिंदू ५५००° से. आहे. अतिउच्च वितळणबिंदूमुळे विद्युत अभियांत्रिकीमध्ये टंग्स्टनचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. शुद्ध टंग्स्टन अतिउच्च ताण सहन करू शकतो; दर चौ. सें. मी. ला ४० टन पर्यंत, तर अतिशय बारिक केलेली १०० कि. मी. लांबीची टंग्स्टनची तार फक्त २५० ग्रॅम एवढी भरते. अशी अतिशय बारिक तार विद्युत दीपांमध्ये (बल्ब) वापरली जाते व अशी तप्त तार प्रकाश देते. टंग्स्टनचा या कामी उपयोग होण्यापूर्वी कार्बन, टांटालम किंवा ओस्मियमच्या तारा वापरल्या जात पण यापैकी कोणतीही तार टंग्स्टन एवढी विश्वसनीय सेवा देत नाही.
अतिउच्च कठीणता असणारे आधुनिक मिश्रधातू हे टंग्स्टन कार्बाइड व इतर मूलद्रव्ये जसे टायटॅनियम, नायोबियम व टांटालम कार्बाइड यांचे मिश्रण असते. या पदार्थांना सर्मेट पदार्थ असे म्हणतात व हे पदार्थ १०००° से. पर्यंत स्वतःची कठीणता टिकवून ठेवतात. टंग्स्टिक आम्लासह लोखंड तापवून फेरोटंग्स्टन हा अतिशय कठीण मिश्रधातू तयार केला जातो.
शोध [संपादन]
फार पूर्वी धातूशास्त्रज्ञांच्या ध्यानी आले की खनिजापासून कथिल वेगळे करतांना कधीकधी त्याचे अत्यल्प प्रमाण मिळते आणि याचे कारण तपकिरी किंवा पिवळसर-करड्या रंगाचे दगड हे होते. या खनिजातील दगड शील यांनी वर्गिकृत केले. १८७१ साली कार्ल विल्हेम शील या जर्मन-स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाने टंग्स्टनचा सोध लावला. शील हे व्यवसायाने औषधविक्रेता होते आणि रसायनशास्त्र हे त्यांचे विशेष आवडीचे क्षेत्र होते. टंग्स्टनचे वेगळे अस्तित्व शील यांनी १८७१ साली जरी सिद्ध केले तरी १८७३ साली त्यांचेच विद्यार्थी डेलह्युजर या रसायनशास्त्रज्ञाने खनिजापासून वोल्फ्रॅम वेगळे काढले.
| आवर्त सारणी | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| H | He | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| Li | Be | B | C | N | O | F | Ne | ||||||||||||||||||||||||||||||||||
| Na | Mg | Al | Si | P | S | Cl | Ar | ||||||||||||||||||||||||||||||||||
| K | Ca | Sc | Ti | V | Cr | Mn | Fe | Co | Ni | Cu | Zn | Ga | Ge | As | Se | Br | Kr | ||||||||||||||||||||||||
| Rb | Sr | Y | Zr | Nb | Mo | Tc | Ru | Rh | Pd | Ag | Cd | In | Sn | Sb | Te | I | Xe | ||||||||||||||||||||||||
| Cs | Ba | La | Ce | Pr | Nd | Pm | Sm | Eu | Gd | Tb | Dy | Ho | Er | Tm | Yb | Lu | Hf | Ta | W | Re | Os | Ir | Pt | Au | Hg | Tl | Pb | Bi | Po | At | Rn | ||||||||||
| Fr | Ra | Ac | Th | Pa | U | Np | Pu | Am | Cm | Bk | Cf | Es | Fm | Md | No | Lr | Rf | Db | Sg | Bh | Hs | Mt | Ds | Rg | Cn | Uut | Uuq | Uup | Uuh | Uus | Uuo | ||||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||